DIY फॅशन

आऊटडेटेट जीन्सचे हे प्रकार आताच काढून टाका वॉर्डरोबमधून

Leenal Gawade  |  Mar 2, 2021
आऊटडेटेट जीन्सचे हे प्रकार आताच काढून टाका वॉर्डरोबमधून

जुनी फॅशन नव्याने परतून येते… हे जरी खरे असले तरी काही  फॅशन ही नेहमीच आऊटडेटेड होत असते. आता जीन्सच घ्या ना प्रत्येकाकडे वेगवेगळ्या  प्रकारच्या आणि रंगाच्या जीन्स मिळतात. एखादी फॅशन निघून गेली  तर ती पुन्हा येईल म्हणून आपण काही जीन्सचे प्रकार तसेच कपाटात ठेवून देतो. तुम्हीही कपाटात तुमच्याकडे असलेल्या सगळ्या जीन्स शोधून काढा. त्यामध्ये असे कितीतरी प्रकार असतील जे तुम्ही पुन्हा कधीही वापरु शकत नाही. आम्ही अशा काही जुन्या जीन्सचे प्रकार शोधून काढले आहेत जे तुम्ही आताच तुमच्या कपाटातून बाहेर काढा.

शॉपिंग करताना करू नका या चुका आयुष्यभर भोगावे लागतील परिणाम

मंकी वॉश

Instagram

एक काळ होतो जेव्हा या मंकी वॉश प्रकारातील जीन्सची फारच चलती होती. पण आता या प्रकाराला थोडा वेगळा टच देण्यात आलेा आहे. मंकी वॉश प्रकारातील जीन्स तुम्ही यापुढे मुळीच घालू नका. कारण त्या मुळीच चांगल्या दिसणार नाहीत. या पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला लाईट केलेल्या असायच्या त्यामुळे या प्रकारातील जीन्स तुम्ही काढून टाका. या जीन्स पुन्हा अशा पद्धतीने फॅशनमध्ये येणार नाहीत.

झुमका गिरा रे…नक्की ट्राय करा झुमक्याचे हे प्रकार

प्रिटेंड किंवा फ्लोरल प्रिंटच्या जीन्स

Instagram

फ्लोरल आणि प्रिंट डिझाईन्स असलेल्या जीन्स या देखील काही काळासाठी फॅशनमध्ये होत्या.  पण आता अशा प्रकारच्या जीन्स या फारशा घातल्या जात नाहीत. जर तुमच्याकडे पॅचवर्क किंवा खूप काही भरतकाम केलेल्या अशा जीन्सच्या पँट असतील तर तुम्ही अशा पँच आताच काढून टाका. या पँटच्या मदतीने तुम्हाला नक्कीच काही पाऊच आणि बँग्ज बनवता येतील. याचा पुर्नवापर करण्यासाठी तुम्ही थोडे क्रिएटिव्ह असायला हवे. 

जाड मटेरिअलच्या जीन्स

Instagram

पूर्वी जाड मटेरिअच्या जीन्स मिळायच्या. ज्यांची फिटिंग एक दोन वापरातच सैल होऊन जायची. जर तुमच्याकडेही असा प्रकारच्या पँट असतील तर त्या पँट आता आऊटडेटेड झालेल्य आहेत. अशा पँट्स आता मुलीच चांगल्या दिसत नाही. आता या पँट घातल्यानंतर त्या फारच जुन्या काळातल्या आहेत अशा दिसतील. त्यामुळे तुम्ही या अशा पँटस काढून टाका. सध्या बॉयफ्रेंड जीन्स नावाच एक प्रकार नक्कीच बाजारात मिळतो. पण तो असा मुळीच नाही. 

स्टायलिश दिसायचं आहे मग वापरा या अॅक्सेसरिज

रंगीबेरंगी जीन्स

Instagram

एक काळ होता ज्यावेळी कलरफूल जीन्स ट्रेंडमध्ये होत्या. लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा रंगाच्या जीन्स त्यावेळी खूप वापरल्या जात होत्या. खूप जणांकडे अशा कलरफूल जीन्स असतील. या जीन्स तुम्ही वापरणे टाळा. कारण या जीन्स मुळीच चांगल्या दिसत नाहीत. जरी त्या नॅरो बॉटम असल्या तरी देखील 

आता तुमच्याकडे हे प्रकार असतील तर तुम्ही अशा जीन्स आताच तुमच्या वॉर्डरोबमधून काढून टाका.

 

 

Read More From DIY फॅशन