Festive

ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा तोराच वेगळा, तरूणाईला पाडतोय भुरळ

Dipali Naphade  |  Dec 24, 2020
ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा तोराच वेगळा, तरूणाईला पाडतोय भुरळ

सध्या ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा (Oxidized Jewellery) चा ट्रेंड चालू आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये असो अथवा फोटोशूट असो साड्यांवर ऑक्सिडाईज्ड दागिने घालणं सध्या जास्त प्रमाणात वाढलं आहे. फॅशन ही नेहमीच बदल असते. सोन्याच्या अथवा इमिटेशन ज्वेलरीच्या ट्रेंडनंतर आता पुन्हा एकदा ऑक्सिडाईज्ड दागिन्यांकडे कल वाढू लागला आहे. अगदी लग्न, मुंजीतही आता हे दागिने जास्त प्रमाणात घातले जाऊ लागले आहेत. विशेषतः काठापदराच्या साड्या सोडून आता खणाच्या साड्या आणि तत्सम साड्यांचा कल वाढल्यामुळे याला साजेसे असे ऑक्सिडाईज्ड दागिने आता पुन्हा बाजारात आणि कार्यक्रमांना जास्त दिसू लागले आहेत. मात्र इतर दागिन्यांपेक्षा ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा तोराच काही वेगळा आहे. सध्याच्या तरूणाईला याची चांगलीच भुरळ पडत आहे. 

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

नेहमीपेक्षा हटके लुक

तुम्हाला नेहमीपेक्षा हटके लुक हवा असेल तर तुमच्यासाठी ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा पर्याय हा उत्तम पर्याय आहे. सणांसाठीच नाही तर कोणत्याही खास कार्यक्रमासाठीही तुम्ही हा लुक करू शकता. मुळात स्वस्त आणि मस्त असा हा पर्याय असून हे दागिने अधिक आकर्षक दिसतात आणि तुमच्या लुकसाठी हे उत्तम आहेत. कोणाचंही लक्ष वेधून घेण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक असा मेळ असणारे हे ऑक्सिडाईज्ड दागिने नक्कीच हटके आहेत. यामध्ये अमाप पर्याय आणि डिझाईन्स तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळेच सध्या तरूणाईला याची भुरळ पडत आहे. नेहमीच्या दागिन्यांपेक्षा वेगळं काहीतरी हवं असेल तर याचा वापर करता येऊ शकतो. यासह हलकासा मेअकप केला की लुक पूर्ण. 

कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका

बाजारात आहे वेगवेगळी व्हरायटी

आता दागिने म्हटल्यानंतर अनेक व्हरायटी तर हव्यातच आणि ऑक्सिडाईज्ड दागिन्यांमध्येही तुम्हाला ही व्हरायटी हमखास पाहायला मिळते. विशेषततः नेकपीस, कानातले आणि नथ या दागिन्यांनी अधिक लक्ष वेधून घेतलं आहे. ऑक्सिडाईज्ड दागिने जास्त चर्चेत आहेत त्याच्या विविध व्हरायटीमुळे. यातील अनेक डिझाईन्स तुमचे लक्ष वेधून घेतात. साडी असो वा कुरता, इंडो वेस्टर्न लुक कोणत्याही लुकसाठी हे दागिने तुम्हाला वापरता येतात. तसंच या दागिन्यांनी तुमच्या लुकमध्ये कमालीचा फरक पडतो हे वेगळं सांगायला नको. ऑक्सिडाईज्ड दागिन्यांमध्ये चोकर, मोठे नेकपीस आणि कानातले, नथ यासाठी कमालीची मागणी सध्या वाढली आहे. लग्नांमध्ये तुम्ही अगदी कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ, अफगाणी, गळसरी, पुतळी हार, टेम्पल हार इथपासून हे दागिने घालू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारामध्ये पाहायला मिळतात. तर नथीचा तोराही वेगळाच आहे. यामध्येही वेगवेगळ्या खड्याच्या रंगाच्या आणि डिझाईन्सच्या नथी तुम्हाला मिळतात.

नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

कस्टमाईज करून घेण्याचाही ट्रेंड

ऑक्सिडाईज्ड दागिने हल्ली कस्टमाईज करून घेण्याचाही ट्रेंड आला आहे. तुम्ही तुमची नथ, अंगठी अथवा कानातले कस्टमाईज करून घेऊ शकता. इतकंच नाही तर तुमचा बाजूबंद आणि बांगड्यांवरही तुम्हाला तुमचे नाव कोरता येते. याशिवाय सध्या कुरत्यांना ऑक्सिडाईज्ड बटणं लावण्याचा ट्रेंड आला आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासह मॅच करायचे असेल तर त्याच्या कुरत्यांना तुम्ही कस्टमाईज्ड ऑक्सिडाईज्ड बटणं लाऊ शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या पायामध्येही वेगवेगळे कस्टमाईज्ड अँकलेट्स वापरू शकता. तुम्ही जर विवाहीत असाल तर तुम्ही मंगळसुत्रासाठी कस्टमायझेशन करून घेऊ शकता. ऑक्सिडाईज्ड दागिन्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक दागिना हवा तसा मनासारखा मिळू शकतो. तुमच्या मनाप्रमाणे डिझाईन्सही मिळू शकतात. सध्याच्या ट्रेंडनुसार तुम्ही बाजारात गेल्यानंतर इतकी व्हरायटी आहे की नक्की हे घेऊ की ते घेऊ इतकी मनाची अवस्था होते. 

कशी घ्यावी काळजी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिडाईज्ड दागिने हे इतर दागिन्यांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. तुम्ही त्याची योग्यरित्या काळजी घ्यायला हवी. नक्की ही काळजी कशी घ्यायची पाहूया. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Festive