बॉलीवूड

पुन्हा एकदा धर्मेंद्र-राखीच्या ‘पल-पल दिल के पास’ गाण्याची जादू

Aaditi Datar  |  Mar 26, 2019
पुन्हा एकदा धर्मेंद्र-राखीच्या ‘पल-पल दिल के पास’ गाण्याची जादू

दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि राखी यांच्या ‘ब्लॅकमेल’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘पल-पल दिल के पास’ आजही लोकांच्या मनात बसलेलं आहे. हे गाणं देओल परिवाराच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं जितकं धरमजींना आवडतं, तेवढंच सनी देओल आणि बॉबी देओललाही आवडतं. निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता सनी देओल याने आपला मुलगा करण देओलला लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. म्हणूनच आपल्या मुलाला लाँच करण्याचं जेव्हा सनीने ठरवलं तेव्हा चित्रपटाची कहाणी आणि नाव फायनल करताना ‘पल-पल दिल के पास’ हे नाव द्यायचं ठरवलं.

‘पल-पल दिल के पास’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः सनी देओल करणार आहे. सूत्रानुसार, आपल्या मुलाला लाँच करण्यासाठी सनी कोणंतीही रिस्क घ्यायला तयार नाही. सनी स्वतः शूटींगदरम्यान प्रत्येक फ्रेमवर मेहनत घेत आहे आणि अनेकांचा सल्लाही घेत आहे.

करण हा दिसायला फारच हँडसम असून आपल्या आजोबा आणि बाबांप्रमाणेच बॉडी बिल्डर आहे. या चित्रपटात करण देओलसोबत सहर बंबा ही नवीन अभिनेत्री दिसणार आहे. या निमित्ताने बॉलीवूडला अजून एक फ्रेश जोडी मिळणार आहे.

या चित्रपटात ‘पल-पल दिल के पास’ गाण्याला पुन्हा एकदा रिक्रिएट करण्यात येणार आहे. हे ओरिजिनल गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं.

‘पल-पल दिल के पास’ ही एक प्रेम कहाणी असून याचं जास्तकरून मनाली आणि दिल्ली येथे शूट करण्यात आलं आहे. तर या चित्रपटाचं शेवटचं शेड्यूल सध्या मुंबईमध्ये शूट करण्यात येत आहे. ज्यासाठी खास सेटही उभारण्यात आला आहे.

या चित्रपटातील अनेक सीन्स हे बर्फाच्छादित डोंगरावर शूट करण्यात आले आहेत. हा चित्रपट 19 जुलैला संपूर्ण देशभरात रिलीज करण्यात येणार आहे.

हेही वाचा –

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल

सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस

सारा का ओरडत होती कार्तिकच्या नावाने, व्हिडिओ झाला व्हायरल

Read More From बॉलीवूड