xSEO

जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि उपयोग (Panfuti Plant Uses In Marathi)

Trupti Paradkar  |  Jul 29, 2021
Panfuti Plant Uses In Marathi

आजारपणातून आराम मिळण्यासाठी बऱ्याचदा घरगुती उपचार केले जातात. आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतीचीं माहिती आढळते ज्यामुळे तुम्ही  घरच्या घरी उपचार करून बरे होऊ शकता. पानफुटी ही देखील एक अशीच औषधी वनस्पती आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे पानफुटीच्या पानाला जादूचे पान (Miracle Leaf) आणि वैद्यकीय भाषेत  ब्रायोफिलम पिनॅटम (Bryophyllum pinnatum) असं म्हणतात. ही वनस्पती उष्ण कटिबंधीय भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. पानफुटीच्या पानांचा वापर अनेक आरोग्य समस्यांवर केला जातो. पोटासंबधी विकार, मूत्राशयासंबधी समस्या, किडनीस्टोन, मुळव्याध, जखमा बऱ्या करण्यासाठी पानफुटीच्या पानांचा वापर केला जातो. पानफुटी वनस्पती तुम्ही तुमच्या घरी कुंडीत देखील लावू शकता. ज्यामुळे कधीही या वनस्पतीचा वापर तुम्हाला करता येईल. यासाठीच जाणून घ्या पानफुटी औषधी वनस्पती माहिती मराठीतून (Panfuti Plant Benefits In Marathi).

पानफुटी फायदे आणि उपयोग (Panfuti Plant Uses And Benefits In Marathi)

पानफुटी वनस्पतीच्या पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि व्हायरल, अॅंटि फंगल, अॅंटि मिक्राबियल गुणधर्म असतात. ज्यामुळे ते अनेक आजारांवर उपचारांसाठी वापरले जाते. आयुर्वेद शास्त्रात आरोग्य समस्यांवर पानफुटी वनस्पतीचा उपयोग (Panfuti Plant Uses In Marathi) कसा करावा याबाबत अनेक संदर्भ आढळतात. प्रत्येक आजारावर पानफुटीचा वापर निरनिराळ्या पद्धतीने केला जातो. काही आरोग्य समस्यांमध्ये पानफुटीची पाने चावून खाण्याचा सल्ला  दिला जातो. तर जखमा बऱ्या करण्यासाठी पानफुटीचा वापर बॅंडेजप्रमाणे करता येतो.

Panfuti Plant Benefits In Marathi

किडनी स्टोन( Kidney Stones)

पानफुटी वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की या वनस्पतींच्या पानांमुळे तुमचा किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा निघून जातो. यासाठीच जाणून घ्या किडनीस्टोनसाठी पानफुटी वनस्पतीच्या पानांचा कसा वापर करावा (Panfuti Plant Uses In Marathi). 

कसा  कराल वापर –

पानफुटीचे पान घ्या आणि ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा.एक चमचाभर पानफुटीच्या पानाच्या रसामध्ये एक थेंब मध मिसळा. हा रस दिवसातून दोनदा घ्यावा किडनीस्टोन, मूत्राशयाचे विकार या रसाने बरे होतात. मूतखडा विरघळून मूत्रावाटे बाहेर पडण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

ह्रदयाचे आरोग्य (Heart Health)

पानफुटी वनस्पतीच्या पानांमधील अर्कामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशनचा त्रास असतो अशा लोकांना ह्रदयरोग होण्याची शक्यता असते. यासाठी ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला पानफुटी वनस्पतीचा वापर (Panfuti Plant Uses In Marathi) नक्कीच करता येईल.

कसा कराल वापर –

पानफुटीची पाने पाटावरंवट्यावर अथवा मिक्सरमध्येय वाटून घ्या. या पानांचा अर्क दररोज चार ते पाच थेंब घ्या. दिवसातून दोन वेळा तुम्ही हा रस घेऊ शकता. ज्यामुळे काहीच दिवसांमध्ये तुम्हाला रक्तदाबाची समस्या कमी झाल्याचा अनुभव मिळेल.

रक्त शुद्ध करण्यासाठी (Purifies Blood)

शरीरातील रक्त अशुद्ध असते तेव्हा शरीराला अनेक आरोग्य समस्यांचा आणि त्वचेच्या समस्यांचा धोका निर्माण होतो. आजारपणापासून दूर राहण्यासाठी आणि  प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रक्त शुद्ध असणे गरजेचे आहे. पानफुटीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.

कसा कराल वापर –

दररोज सकाळी उपाशी पोटी पानफुटीची कच्ची पाने चावून खा. ज्यामुळे तुमच्या रक्तातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातील आणि रक्त शुद्ध होईल.

डोकेदुखी (Headache)

ज्या लोकांना सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो अशा लोकांसाठी पानफुटी वनस्पती पाने फारच उपयुक्त आहेत. कारण या पानांमुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते. 

कसा  कराल वापर –

पानफुटीची पाने तोडा आणि ती तुमच्या कपाळावर ठेवा. या पानांचा लेपदेखील तुम्ही तुमच्या कपाळावर लावू शकता. ज्यामुळे काही मिनीटांमध्ये तुम्हाला डोके शांत झाल्याचे वाटू लागेल. 

फोड अथवा पुळी (Boils)

बऱ्याचदा उष्णतेमुळे अथवा इतर काही कारणांमुळे अंगावर फोड अथवा पुळ्या येतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पानफुटीच्या पानांचा वापर (Panfuti Plant Uses In Marathi) करू शकता. 

कसा कराल वापर –

पानफुटीची पाने गरम करा आणि कोमट झाल्यावर फोड आलेल्या जागी लावा. फोड आलेल्या त्वचेवर तुम्ही पानफुटीचा अर्कदेखील लावू शकता. दोन ते तीन चार दिवस सातत्याने हा उपचार केल्यास तुमच्या अंगावरील फोड आणि पुळ्या कमी होतात. 

मधुमेह (Diabetics)

पानफुटीच्या पानांचा वापर (Panfuti Plant Uses In Marathi) तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करू शकता. पानफुटींच्या पानांमधील अर्क मधुमेहींच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी आहे.

कसा कराल वापर –

यासाठी दिवसातून दोनदा मधुमेहींनी पानफुटीची पाने चावून खावी अथवा त्याचा रस प्यावा. ज्यामुळे मधुमेहींच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहिल. 

Panfuti Plant Benefits In Marathi

व्हजायनल समस्या (Vaginal Problems)

महिलांना बऱ्याचदा व्हजायनल समस्या अथवा इनफेक्शन होत असते. ज्या महिलांना सतत असा त्रास होतो त्यांनी पानफुटीच्या पानांचा अवश्य वापर करावा. व्हजायन इनफेक्शनमुळे बऱ्याचदा हा भाग सैल पडण्याची अथवा सतत या भागावर इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. 

कसा कराल वापर –

पानफुटीची ताजी पाने काढून त्याचा रस काढा आणि त्या अर्कामध्ये थोडं मध घालून दिवसातून दोन वेळा हा रस प्या. हा उपाय केल्यामुळे व्हजानयाचे आरोग्य सुधारेल आणि तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.

जखमा (Wounds)

दररोजच्या धावपळीच्या जगात कापणे, चिरणे, पडणे, खरचटणे अशा प्रकारच्या जखमा होत असतात. मात्र या जखमा तुम्ही पानफुटीच्या मदतीने बऱ्या करू शकतात. कारण जखमा तशाच ठेवल्या तर इनफेक्शनचा धोका वाढतो शिवाय नंतर त्या जखमांचे व्रण त्वचेवर दिसू लागतात.

कसा कराल वापर –

पानफुटीची पाने आगीवर थोडी गरम करून घ्या. गरम पानफुटीचे पान थोडे कोमट झाल्यावर चुरघळून तुमच्या जखमेवर लावा. स्वच्छ कापड गुंडाळून जखम सैलसर बांधून ठेवा. हा उपाय केल्याने जखम लवकर भरून निघेल. 

डायरिया (Diarrhea)

दूषित पाणी आणि दूषित खाद्यपदार्थांमुळे अतीसार अथवा डायरिआचा त्रास होतो. जुलाब झाल्याने तुम्ही अशक्त होता ज्यामुळे बऱ्याचदा सौचावाटे रक्त पडण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही पानफुटीचा वापर औषध म्हणून करू शकता.

कसा कराल वापर –

अशा वेळी पानफुटीच्या पानांचा रस जिरे आणि तूपासोबत घ्या. ज्यामुळे तुमचे जुलाब थांबतील आणि थकवा कमी होईल. 

मूत्राशयाच्या समस्या (Urinary Problems)

पानफुटी वनस्पतीचे फायदे अनेक आहेत. जसं मूत्राशयाच्या आरोग्यासाठी पानफुटी खूपच लाभदायक आहे. त्यामुळे किडनी स्टोनप्रमाणेच तुम्ही मूत्राशयाच्या इतर समस्यांवरही पानफुटीचा वापर करू शकता.

कसा कराल वापर –

पानफुटीच्या ताज्या पानांचा रस काढा आणि तो गुळ अथवा मधासोबत दिवसातून दोनदा घ्या. ज्यामुळे तुमचा मूत्रमार्ग स्वच्छ आण निंर्जतूक होईल. मूत्र मार्ग स्वच्छ झाल्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या कमी होतील. 

Panfuti Plant Benefits In Marathi

पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि निवडक प्रश्न – FAQs

पानफुटीचे पान चावून खाणे योग्य आहे का ?

आयुर्वेदामध्ये अनेक आरोग्य समस्यांवर पानफुटीचे पान कच्चे चावून खाण्याचा तसेच पानफुटीच्या पानांचा अर्क पिण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे पानफुटीचे पान कच्चे असताना चावून खाणे नक्कीच योग्य आहे.

पानफुटीचे झाड कसे लावावे ?

पानफुटी वनस्पतीचे पान ओलसर जमिनीवर ठेवून ते एक दिवस घरात  आणि नंतर एक दिवस सौम्य सुर्यप्रकाशात ठेवल्यास त्या पानांच्या प्रत्येक कडेला पानफुटी वनस्पतीची मुळे उगवू लागतात. एका पानापासून अनेक पानफुटी वनस्पतीची रोपे तुम्ही घरी कुंडीत निर्माण करू शकता. 

पानफुटीचे पान चवीला कडू असते का ?

पानफुटी वनस्पतीचे पान चवीला कडूसर आणि आंबट असते. मात्र त्यामध्ये अनेक  औषधी गुणधर्म असल्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या बऱ्या होऊ शकतात.

Read More From xSEO