Fitness

कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

Dipali Naphade  |  May 10, 2021
कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा

कोव्हिड संसर्गाच्या घटनांची शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येणारी तिसरी लाट लहान मुलांकरिता अधिक धोकादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया बालरोगतज्ज्ञांनी दिली आहे. खराडी पुणे येथील मदरहुड हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारेख यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले आहे. बहुतेक मुलांमध्ये सौम्य तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आली असून अशा मुलांवर देखील यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत.दुस-या लाटेपेक्षा तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असण्यामागचे एक कारण असे देखील आहे. प्रौढांमध्ये लसीकरण झालेले असून लहान मुलांमध्ये लस देण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. लसीकरणामुळे प्रौढांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते तर लहानांमध्ये हे प्रमाण वाढू देखील शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

एक वर्षापर्यंत लहान मुलाला नक्की काय द्यायचे खायला, अन्यथा होतील वाईट परिणाम

मागील वर्षाशी तुलना

Freepik

जर आपण या वर्षाची तुलना मागील वर्षाशी केली तर यावर्षी अधिक मुलांना त्रास होतो. कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेत  ताप, अतिसार, सर्दी आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसून आली. घरातल्या प्रौढ व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणे असल्याने, मुलांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. जरी लहान मुलांना जास्त त्रास होत नसला तरीदेखील ते संसर्गाचे वाहक ठरू शकतात. बालरोगतज्ञांच्या म्हणण्यानुसार 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते. 12 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लस मिळावी याकरिता असलेल्या प्रस्तावाला अजून मान्यता मिळालेली नाही. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंधांत्मक उपायांचा अवलंब करूने अधिक उत्तम ठरते त्याकरिता खाली दिलेस्या टिप्सचा नक्की अवलंब करा.

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला

खालील दिलेल्या टिप्सचा नक्की अवलंब करा

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Fitness