भविष्य

ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती नक्की असतात तरी कशा, जाणून घ्या

Dipali Naphade  |  Sep 29, 2021
ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती नक्की असतात तरी कशा, जाणून घ्या

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म, वेळ आणि स्वभावदेखील वेगवेगळे असतात. प्रत्येक महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारची असतात. प्रत्येकाची एक खासियत असते. याच आधाराव त्याचा स्वभाव, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, चांगुलपणा आणि वाईटपणा हे सर्व अवलंबून असतं. आपण यावेळी जाणून घेणार आहोत ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि या व्यक्ती नक्की कशा  असतात. ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची रास ही तूळ असते. ज्याचा स्वामी शुक्र असतो. या व्यक्ती आपल्या ग्रेस आणि स्टाईलसाठी ओळखण्यात येतात. नेहमी द्विधा मनस्थितीत असल्याच्या स्वभावामुळे या व्यक्तींंना चलाख समजण्यात येतं. पण त्याचबरोबर या व्यक्ती इमानदारदेखील असतात. या व्यक्तींना काही येत असो वा नसो, पण कोणत्याही माणसांना फॉलो करणं या माणसांना जमत नाही. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी जर कोणी ऑक्टोबर महिन्यात करत असेल वाढदिवस साजरा…तर वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत नक्की जाणून घ्या या व्यक्तींंचा स्वभाव. 

जाणून घेऊया ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव

1 – या व्यक्तींची नजर पारखी असते. कोणतीही गोष्ट बघून त्याची योग्य किंमत या व्यक्ती सांगू शकतात. त्यांची इतकी क्षमता आहे. तसं तर या व्यक्ती कोणाहीबद्दल आपलं मत पटकन बनवत नाहीत. तसंच ना कोणाबद्दल या व्यक्ती लवकर चांगला विचार करत ना वाईट विचार करत. कोणत्याही व्यक्तीला आधी पारखून मगच त्यांच्याबद्दल आपलं मत बनवतात.  

2 – ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती हा खूपच सिक्रेट राखून ठेवणाऱ्या असतात. या व्यक्ती आपल्या आसपास कोणतंही वातावरण निर्माण करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. कारण या व्यक्ती कधी कोणत्या वेळी काय करून बसतील याचा कोणीच अंदाज लावू शकत नाही.

3 –  यांच्या करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर या व्यक्ती एक उत्तम राजकारणी, कलाकार, उद्योगपती आणि डॉक्टर बनू शकतात. तसं तर तूळ राशीच्या व्यक्ती या राजकारणामध्ये अत्यंत कुशल असतात. कोणतीही गोष्ट अगदी खोलपर्यंत जाणून घेण्याची क्षमता या व्यक्तींकडे असते. 

4 – यांच्या सोशल लाईफबद्दल तर काय बोलावं? …बाप रे बाप. भरपूर मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी… या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं वैशिष्ट्य यांच्य्ा स्वभावात असतं. इतक्या साऱ्या नात्यांमध्ये व्यवस्थित सर्वांना जोडून ठेवण्याचं आणि सर्वांना सारखंच चांगलं फील करून देण्याचं कसब या व्यक्तींमध्ये असतं. लोकांनादेखील त्यांच्या या स्वभावाचं नक्कीच आश्चर्य वाटतं. या व्यक्तींसारखं आपणही बनावं असं बऱ्याच जणांना वाटतं. 

5 – या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत संवेदनशील असतो. या व्यक्ती मनातील गोष्टी अगदी पटकन बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे या व्यक्तींना त्या गोष्टी दर्शवण्यासाठी अनेक संधी मिळतात. 

6 –  प्रेमाच्या बाबतीत तर या व्यक्ती एकदम परफेक्ट लव्ह मटेरियल आहेत. यांच्या लव्ह लाईफमध्ये केवळ शारीरिक रिलेशनशिपला महत्त्व नसतं तर आपल्या प्रेमासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने सरप्राईज अॅड करत रोमान्स करत राहणं या व्यक्तींना अधिक आवडतं. या व्यक्ती आपलं प्रेम अतिशय विश्वासाने निभावतात. कधी कधी तुमच्यावर हक्क गाजवतात पण तो त्यांचा स्वभाव आणि तुमच्यावरील प्रेम आहे. 

7 –  शांतता आणि एकमेकांवरील विश्वास हा आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या व्यक्तींमध्ये भांडण आणि वादावादी करणं अजिबात आवडत नाही. या व्यक्तींना नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवायला आवडतं. आपल्या जवळच्या व्यक्ती रागावणार तर नाहीत ना याची त्यांना जास्त काळजी लागून राहाते आणि त्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा सौम्य वागतात. 

8 – या व्यक्ती बऱ्याच अंशी किरकिऱ्या स्वभावाचे असतात. ड्रेस असो अथवा पार्टनर, यांची निवड अगदी सिलेक्टिव्ह असते. या व्यक्ती अतिशय संतुलित आयुष्य जगणाऱ्या असतात. त्यामुळे तसाच लाईफ पार्टनर या व्यक्तींना हवा असतो. या व्यक्तींना ना एखाद्यावर हक्क गाजवायला आवडत ना कोणी त्यांच्यावर हक्क दाखवलेला आवडत. 

9 – या व्यक्ती सुंदरतेला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या या दृष्टीकोनाकडे लोक चुकीच्या दृष्टीने पाहतात. याचं सौंदर्य कितीही नॉर्मल असलं तरीही या व्यक्ती स्वतःला कोणत्याही राजकुमार अथवा राजकुमारीपेक्षा कमी समजत नाहीत. या व्यक्ती अशा तऱ्हेने समोरच्याशी बोलतात की, समोरचा व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित झालाच पाहिजे. 

10 – या व्यक्तींना स्वच्छता आणि साफसफाई तसंच डेकोरेशन करणं खूपच आवडतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी त्यांच्यासमोर आल्यास, या व्यक्ती लगेच बरोबर करण्याच्या मागे लागतात. कारण यांना अस्तव्यस्त राहणं आवडत नाही. प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट यांना हवी असते.

भाग्यशाली क्रमांक – 4, 7, 20, 55, 35

भाग्यशाली रंग – गुलाबी, पिवळा

भाग्यशाली दिवस –  बुधवार

भाग्यशाली खडा – पोवळं

ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती –

महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, अब्दुल कलाम, रेखा, हेमा मालिनी, रवीना टंडन, इंदिरा नुयी, मलिष्का इत्यादी

हेदखील वाचा

जाणून घ्या जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From भविष्य