Fitness

कॉफी पिण्याची वेळ पाळा, नाहीतर या नुकसानाला सामोरं जा

Dipali Naphade  |  Mar 17, 2020
कॉफी पिण्याची वेळ पाळा, नाहीतर या नुकसानाला सामोरं जा

 

आजकाल बऱ्याच जणांना चहापेक्षा कॉफी (Coffee) जास्त आवडते. बरेच जण आपल्या दिवसाची  सुरूवात एक कप गरम कॉफीने करतात. कॉफीचे फायदे तर आहेतच पण कॉफी पिण्याची एक योग्य वेळ आहे. काही जणांना कॉफी प्यायल्यानंतर अतिशय ताजेतवाने वाटते तर काही जणांना याचा फ्लेवर खूप चांगला वाटतो. बऱ्याचदा ऑफिसमध्ये काम करताना अथवा अभ्यास करताना बरीच कॉफी प्यायली जाते. घरी काम करताना अथवा थंडीमध्ये  कोणी कॉफी पिणार का? विचारल्यावर तुम्ही नक्कीच त्यांना नकार देऊ शकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? कॉफी पिण्याची एक योग्य वेळ असते आणि ही वेळ पाळली नाही तर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. कोणत्याही वेळी उठसूठ कॉफी प्यायल्यास तुम्हाला नक्कीच नुकसान होऊ शकते. त्यामुळे नक्की कोणत्या वेळी कॉफी प्यावी आणि त्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत.  तुम्हीही कॉफी लव्हर असाल तर ही गोष्ट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

कोणत्या वेळी कॉफी पिणं ठरू शकतं नुकसानकारक

Shutterstock

 

कॉफी नक्की कोणत्याही वेळी प्यायली तर नुकसानकारक ठरू शकतं याची कारण आपण पाहूया 

1. रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नका

 

रिकाम्या पोटी कॉफी पिणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात सकाळी नाश्ता करण्याची वेळ मिळत नाही त्यामुळे बरेचसे लोक हे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिऊन घरातून निघतात.  पण तुम्ही जर बऱ्याच काळापासून काही खाल्लं नसेल तर कॉफी पिऊ नका. यामुळे तुम्हाला अॅसिडिटी, अल्सर, बद्धकोष्ठ आणि पोटासंबंधी आजार होण्याची शक्यता असते. रिकाम्या पोटी कॉफी पिण्याने अॅसिडचे प्रमाण वाढते आणि मग तुम्हाला सतत छातीत जळजळ जाणवू लागते. 

2. संध्याकाळी उशीरा कॉफी प्यायल्याने होतं नुकसान

Shutterstock

 

संध्याकाळी कॉफी आणि त्याबरोबर काही स्नॅक्स खाण्याची मजाच वेगळी आहे. पण आपण जर संध्याकाळी उशीरा कॉफी पिणार असू तर तसं करू नये. संध्याकाळी उशीरा कॉफी प्यायल्यास नंतर जेवणाच्या वेळी भूक लागत नाही.  त्यामुळे बऱ्याचदा रात्रीचं जेवण घशाखाली उतरत नाही. तसंच संध्याकाळी उशीरा कॉफी प्यायलाने झोप न येण्याचाही त्रास होतो. 

सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने होऊ शकतं ‘हे’ नुकसान

3. झोपण्यापूर्वी कॉफी पिऊ नका

 

तुम्हाला जर झोपण्यापूर्वी कॉफी प्यायची सवय असेल तर ती बदला. कारण असं करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. झोपण्यापूर्वी कॉफी पिऊ नये. कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण असतं जे तुमची झोप घालवण्याचं काम करतं. त्यामुळे कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊन तुम्हाला त्याचा दुसऱ्या दिवशीही त्रास होऊ शकतो. 

4. सकाळीच उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय सोडा

Shutterstock

 

बऱ्याच जणांना अगदी सकाळी उठल्यानंतर दातही न घासता कॉफी पिण्याची सवय असते. पण असं केल्याने शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाण वाढते.  यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो. तसंच मेटाबॉलिजम आणि स्ट्रेस रिस्पान्स नियमित करण्यावरही त्याचा परिणाम होतो. तुम्ही सकाळी उठल्यावर लगेच कॉफी प्यायलात तर तुमच्या शरीरातील तणावाची पातळी वाढण्याचं प्रमाण अधिक होतं आणि  त्याशिवाय तुमचे मूड स्विंग्जही वाढतात. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते (Black Coffee Benefits In Marathi)

कॉफी केव्हा प्यावी ज्याचा होईल फायदा

Shutterstock

 

कॉफी नक्की कोणत्या वेळी प्यायली तर त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी होऊ शकतो हे आपण पाहूया 

1. नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधल्या वेळात

 

सकाळी नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधी जो वेळ असतो त्या वेळात तुम्ही कॉफी पिऊ शकता. ही अशी वेळ असते जेव्हा तुम्हाला थोडीशी भूक असते आणि शरीराला एनर्जीची गरज असते. या वेळी तुम्ही कॉफी प्यायल्यास, तुम्ही दिवसभर व्यवस्थित काम करू शकता. 

त्वरीत वजन कमी करण्यासाठी कॉफी आणि मधाचा होईल उपयोग

2. वर्कआऊटच्या आधी प्या कॉफी

Shutterstock

 

वर्कआऊट करण्यापूर्वी कॉफी पिणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कॅफिन एनर्जी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे वर्कआऊटपूर्वी साधारण अर्धा तास आधी कॉफी प्यायली तर तुमचे मेटाबॉलिजम बूस्टअप होते. यातील कॅफिनमुळे तुमच्या शरीरातील एनर्जी वाढून तुमचे वर्कआऊटही चांगले होते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Fitness