Budget Trips

नवीन वर्षात देशभ्रमंती करण्यासाठी असं करा प्लॅनिंग

Leenal Gawade  |  Jan 1, 2020
नवीन वर्षात देशभ्रमंती करण्यासाठी असं करा प्लॅनिंग

माझ्याप्रमाणे तुम्ही जर 2020 मध्ये देशभ्रमंती करण्याचे ठरवले असेल तर तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला आहे. नव्या वर्षात तुम्ही काहीतरी नवीन नक्कीच करायला हवे. फिरणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण तुम्ही जितके फिराल तितका आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून जातो. तुमच्या मनातील नकारात्मक उर्जा काढून तुम्हाला सकारात्मक उर्जेने भरण्याचे काम फिरणे करु शकते. या शिवाय तुम्ही न पाहिलेली ठिकाणेही पाहून होतात. आता फिरण्याचं म्हणाल तर थेट परदेशाचे प्लॅन करण्यापेक्षा आपला देश आधी पाहा. वेगवेगळ्या संस्कृतीने नटलेल्या आपल्या देशाचे इतर पर्यटकांना आकर्षण आहे. मग तुम्ही का मागे राहता. आजपासून पुढे वर्षभर फिरण्याचे छान प्लॅन करा. आम्ही तुम्हाला थोडी मदत करणार आहोत. पाहुयात देशात फिरण्यासाठी तुम्ही नेमकं कसं प्लॅनिंग करायला हवं ते

वेकेशनवर असताना ‘या’ टिप्स फॉलो करून राहा फिट

Instagram

आता तुम्ही लगेचच जानेवारी महिन्यात जाण्याचे ठरवत असाल तर तुम्हाला खूप ठिकाणी फिरता येईल. कारण आता अनेक ठिकाणी खूप छान थंडी असेल. तुम्हाला या थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आग्रा, जयपूर, वाराणसी,उदयपूर, मनाली,  ऋषिकेश, दार्जिलिंग, हम्पी, लेह-लडाख, बंगळुर, अमृतसर, म्हैसुर या ठिकाणी जाऊ शकता. 

असं करा प्लॅनिंग: आता तुम्ही जसा फिरण्याचा विचार करता तसेच खूप जण या क्षणाला करत असतील. त्यामुळे तुम्ही लोक जास्त जातील अशी ठिकाणी निवडू नका. कारण तुम्हाला त्या ठिकाणी गर्दी मिळेल. शिवाय तिकिटं महाग मिळतील. त्यामुळे लोकांची कमी पसंती असलेली ठिकाणं तुम्हाला विमानाच्या तिकिटावरुन कळेल. (आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की, तुम्ही 26 जानेवारीला कुठेही जाणं किंवा येणं टाळा. कारण त्यावेळी रेट आणि सिक्युरिटी अधिक असते) 

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

Instagram

तुम्ही वर्षाच्या थोड्या मध्यावर किंवा मे- जून दरम्यान सुट्ट्यांमध्ये कुटुंबाला बाहेर घेऊन जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला जानेवारी- फेब्रुवारीपासून बुकींग करायला हवं. तरचं तुम्हाला सगळी बुकींग अगदी सहज मिळतील. या दरम्यान जाण्याचा विचार नक्की झाला असेल तर गरम होणार नाही अशी ठिकाणी निवडा. तुम्हाला या दरम्यान जाण्यासाठी खूप ठिकाणं आहेत. जिथे तुम्हाला थोडा गारवा मिळू शकेल. मुन्नार, नैनिताल,गंगटोक,बिकानेर, मसुरी, अंदमान- निकोबार, कोची, अल्पुझा,जोधपूर,फतेहपूरसिक्री, जैसलमेर,मनाली, गोवा.. यातील काही ठिकाणी तुम्हाला मे महिन्यात भयंकर गरम जाणवेल पण तरीही तुम्ही ही ठिकाणं एन्जॉय करु शकता.

असं करा प्लॅनिंग: या दिवसात साधारण लहान मुलांना सुट्ट्या असल्यामुळे अनेक पालकं मुलांना घेऊन बाहेर जातात म्हणून तुम्ही थोडं आधीच बुकिंग केलं तर फार उत्तम.  मनाली, गोवा अशी काही ठिकाणं सोडून तुम्ही काही इतर ठिकाणं पाहण्याचा प्रयत्न या दिवसात केला तर उत्तम

#foodie असाल तर मग तुम्ही अहमदाबादला जायलाच हवं

Instagram

आता दिवाळी आणि इयरएंड असा विचार करत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळीच ठिकाणी जाता येतं. कारण ज्या ठिकाणी थंडी असते किंवा बर्फ असतो. तिथे ऑक्टोबर दरम्यान उन्हाळा सुरु असतो. त्यामुळे तुम्ही त्यानुसारही प्लॅनिंग करु शकता. इयएंडचा प्लॅन तुम्हाला खूप प्रसिद्ध अशा ठिकाणी करायचा असेल तर साधारण ऑक्टोबर महिन्यापासून तुम्ही याचं बुकिंग करु शकता. 

आता बुकिंग करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. 

मग आता आजपासूनच घ्या देशभ्रमंतीचं प्लॅनिंग करायला.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा. https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From Budget Trips