Budget Trips

यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणांना द्या भेट

Leenal Gawade  |  Mar 13, 2021
यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणांना द्या भेट

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की, फिरण्याचे बेत आखले जातात. पण यंदा कोरोना काळ पाहता उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांसाठी परदेशात किंवा राज्याबाहेर जाणे फार शक्य होईल असे वाटत नाही. शिवाय ‘आपले कुटुंब आपली जबाबदारी’ म्हणत अनेकांनी यंदा महाराष्ट्रातील काही खास स्थळांना भेट देणे पसंत केले आहे. यंदाच्या सु्ट्टीत तुम्हाला कदाचित हिमालयातील काही थंड प्रदेशांना भेट देता येणार नाही. पण महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत जी तुम्हाला रणरणत्या उन्हाळ्यात काही दिवसांचा आनंद नक्कीच देऊन जातील. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच काही सुंदर ठिकाणं

नाशिकमधील बेस्ट पर्यटन स्थळे (Best Tourist Places To Visit In Nashik)

महाबळेश्वर

Instagram

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हटले की, महाबळेश्वरचे नाव पहिले घेतले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून येथे कायमच पर्यटकांची ये- जा सुरु असते. महाबळेश्वर हे किमान दोन ते तीन दिवस तरी फिरण्यासारखे ठिकाण आहे. जर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल आताचा काळ हा याठिकाणी जाण्यासारखा आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर प्रतापगड, मॅप्रो गार्डन, वाई, महाबळेश्वर बाजार, स्ट्रॉबेरी फार्म अशी ठिकाण पाहण्यासारखी आहेत.

साधारण खर्च : 10 ते 15 हजार प्रत्येकी

सांदण दरी (Sandan Valley) एक थरारक अनुभव

माथेरान

Instagram

मुंबईपासून अगदी जवळ असलेलं पर्यटनाचं ठिकाणं म्हणजे ‘माथेरान’. सेंट्रल रेल्वेच्या नेरळ स्टेशनला उतरुन मिनी ट्रेनने माथेरानला जाता येते. माथेरानला हॉटेलमध्ये जाण्यासाठी थेट अशी गाडी मिळत नाही. निसर्गसौंदर्य जपण्यासाठी त्यांनी येथील प्रदूषण कमीत कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडे नक्कीच चालावे लागते. माथेरानमध्ये फिरण्यासारखे बरेच पॉईंट असले तरी तुम्ही दोन दिवस राहून  माथेरान फिरु शकता. फोटो काढण्यासाठी माथेरान हे एकदम उत्तम ठिकाण आहे. फक्त प्रवासाचा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. 

साधारण खर्च : 2 ते 5 हजार 

लोणावळा

Instagram

मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेले आणखी एक हिल स्टेशन म्हणजे लोणावळा. लोणावळामध्ये फिरण्यासारखे बरेच काही आहे. आता लोणावळा हे बरेच कर्मशिअल झाले आहे. पण आजही अनेकांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी हे एक आवडीचे ठिकाण आहे. लोणावळा म्हटले की, चिक्की ही आवर्जून घेतली जाते. या ठिकाणी तुम्हाला ठिकठिकाणी चिक्कीची दुकानं दिसतील. लोणावळामध्ये वर्षभर पर्यटकांची ये- जा सुरु असते. त्यामुळे तुम्ही अगदी कोणत्याही सीझनमध्ये या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही गाडी घेऊन जात नसाल तर तुम्हाला रिक्षाही फिरण्यासाठी मिळू शकते. येथील सनसेट पॉईंट, वॅक्स म्युझिअम, भुशी डॅम अशी काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

साधारण खर्च : 2 ते 5 हजार

समुद्र आवडत असेल तर कोकणातील देवबाग आहे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण

नाशिक

Instagram

महाराष्ट्रातील नाशिक हे देखील आता पर्यंटकांच्या आवडीचे होऊ लागले आहे. नाशिकमध्ये असलेले द्राक्षांचे मळे, वायनरीज आणि उत्तम जेवण यामुळे हल्ली पर्यटक या ठिकाणांनाही भेट देतात. तुम्हालाही थोडं फिरण्याची आणि तुमचा वेळ थोडा शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा असेल तर तुम्ही नाशिकला नक्की भेट द्या. 

साधारण खर्च : 5ते  7 हजार 

आता येत्या महाराष्ट्र दिवसाला एकमेकांना शुभेच्छा द्या आणि लॉकडाऊन शिथील झाल्यावर कोरोनाची काळजी घेऊन तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी.

Read More From Budget Trips