खाणंपिण आणि नाइटलाईफ

जाणून घ्या पितृपक्षात केल्या जाणाऱ्या आमसुलाच्या चटणीविषयी

Leenal Gawade  |  Sep 24, 2021
आमसुलाची चटणी

 गणपती बाप्पांचे विसर्जन झाले की, पितृपंधरवडा सुरु होतो. या पितृपंधरवड्यात पित्र ही पृथ्वीवर येत असतात. असा समज आहे. त्यामुळे घरातील गेलेल्या व्यक्तिला किंवा आपल्या पूर्वजांना  या काळात ताट दाखवले जाते. यामध्ये काही खास पदार्थ आणि बघायला गेले तर अगदी टीपिकल असे पदार्थ असतात. आता बऱ्याच ठिकाणी पदार्थांमध्ये व्हरायटी ही असू शकते. पण ज्या भागात कोकम जास्त मिळतात त्या ठिकाणी आमसुलाची चटणी अगदी हमखास केली जाते. या दिवसात घरी जेवायला येणाऱ्याने पोटभर जेवावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठीच पानावर आमसुलाची चटणी वाढली जाते. जाणून घेऊया पितृपक्षात वाढल्या जाणाऱ्या आमसुलाच्या चटणीविषयी

लिंबू, मिरची आणि आल्याचे सोपे हॅक्स, करा उपयोग

का वाढली जाते आमसुलाची चटणी

Instagram

आमसुलाची चटणी हा फार काही नवा प्रकार नाही. खूप जणांनी तो आधीही खाल्ला असेल. पण पितृपंधरवड्यात अगदी हमखास ही चटणी करण्यावर भर दिला जातो. याचे कारण खालीलप्रमाणे 

  1. कोकमामध्ये पाचक रस असतात. ज्याच्या सेवनामुळे अपचनाचा त्रास होणाऱ्यांना आराम मिळतो. 
  2. पितृपक्षात पानभरुन जेवण वाढले जाते. अनेक पदार्थांचा त्यामध्ये समावेश असतो. अशावेळी काहीतरी जिरवणी हवी म्हणून पानात ही चटणी वाढतात. ती चवीला वाढली जाते. कारण ती जास्त खाता कामा नये. जेवताना थोडी थोडी लावून खाल्ली की जेवण छान जिरण्यास मदत मिळते. त्याच प्रमाणे आमसूल खाण्याचे फायदे देखील आहेत.
  3. ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे अशांसाठी आमसुलाची चटणी एकदम रामबाण उपाय आहे. 
  4. पितृपक्षात अनेकदा जेवणास उशीर होतो. अनेक ठिकाणी कावळ्याने जेवल्याशिवाय जेवले जात नाही. उशीरा जेवल्यानंतर पचनाचा वेग मंदावतो. हा वेग वाढवण्यासाठी आमसुलाची चटणी केली जाते. 

अशी करतात पितृपक्षातील आमसुलाची चटणी

आमसुलाची चटणी तुम्ही करत नसाल आणि तुम्हाला ती करायची असेल तर तुम्ही ही कृती करु शकता. 

साहित्य : 10-12 आमसुले, ½ वाटी किसलेला गुळ, 1 मोठा चमचा ओलं खोबर, 1 चमचा जीरं, 3-4 मिरी, मीठ 

कृती : 

अती प्रमाणात टॉमेटो केचप खाणं पडेल महागात, जाणून घ्या दुष्परिणाम

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ