Fitness

जाणून घ्या न्यूमोनिया लक्षणे व उपचार (Pneumonia Symptoms In Marathi)

Leenal Gawade  |  Jun 4, 2021
Pneumonia Symptoms In Marathi

‘न्यूमोनिया’ हा आजार आता आपल्याला नवा राहिलेला नाही. न्यूमोनिया हल्ली वरच्या बर अनेकांना होताना ऐकल असेल. आताच्या या महामारीच्या काळात कोव्हिड होऊन गेलेल्या अनेक रुग्णांना देखील न्यूमोनिया होतो असे देखील स्पष्ट झाले आहे. न्यूमोनिया हा आजार संसर्गातून होतो हे आपण सगळेच जाणतो. हा आजार जरी फारसा काळजी करण्यासारखा नसला तरी देखील याकडे दुर्लक्ष करणे हे देखील चांगले नाही. वेगवेगळ्या आजारांना ग्रासलेल्या लोकांना हा आजार होतो. त्या प्रत्येकांवर त्याचे विपरित असे परिणाम जाणवू लागतात. पण आताच्या काळात न्यूमोनियाची उपचार पद्धती अगदी सहजगत्या उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे फारच कमी झालेले आहे. योग्य वेळी उपचार घेतल्याने न्यूमोनिया (Pneumonia Information In Marathi) झालेली व्यक्ती बरी होऊ शकते. तुम्हाला अद्यापही न्यूमोनिया म्हणजे काय? हे माहीत नसेल तर तुम्हाला त्याची इत्यंभूत माहिती हवी. यासाठीच आम्ही न्यूमोनिया लक्षणे (Pneumonia Causes In Marathi) आणि न्यूमोनिया उपचार (Pneumonia Upchar In Marathi) शोधून काढले आहेत.चला करुया सुरुवात.

न्यूमोनिया म्हणजे काय? (What Is Pneumonia In Marathi)

Pneumonia In Marathi

सगळ्यात आधी न्यूमोनिया म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे असते. न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग असलेला आजार आहे. आपल्या शरीरात श्वसनसंस्थेच्या बारीक बारीक नलिका असतात. ज्यांचे काम फुफ्फुसांमध्ये  वायूंचे हस्तांतरण करणे असते. पण जर तुमच्या शरीरात न्यूमोनियाकोकस जीवणू गेला असेल तर ते या कार्यात अडथळा आणण्याचे काम करतात. परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव्य साठून राहतो. या द्रव्यामुळे फुफ्फुसांचे कार्य मंदावते. त्यामध्ये कफसारखा द्रव्य साचून राहतो. हा त्रास दोन्ही फुफ्फुसांना होऊ शकतो. न्यूमोनिया हे त्या आजाराचे नाव नाही तर हे आजाराचे लक्षण आहे. फुफ्फुसांच्या वायूनलिकेत द्रव्य साचून राहिल्यामुळे या आजारातही श्वसनास अडथळा निर्माण होतो. अपुऱ्या ऑक्सिजनमुळे पेशींचे कार्य नीट होत नाही.  जर यामध्ये योग्यवेळी उपचार केले नाही तर रुग्णावर मृत्यूची वेळ ओढावते. डबल न्यूमोनिया हे देखील तुम्ही नक्कीच ऐकले असेल. दोन्ही फुफ्फुसांना झालेल्या संसर्गाला असे म्हटले जाते. न्यूमोनिया झाला की नाही हे तपासण्यासाठी वेगळी चाचणी करावी लागते. न्यूमोनियाचे प्रकारही आहेत त्यानुसार त्यांची लक्षण बदलतात. पण या आजारामध्ये काही ठराविक लक्षण सर्वसाधारणपणे एखाद्या फ्लू सारखी असतात. आता विस्तृतपणे न्यूमोनियाची लक्षणे कोणती ते जाणून घेऊया.

कावीळची लक्षणे – घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती

न्यूमोनियाची लक्षणे कोणती? (Pneumonia Symptoms In Marathi)

न्यूमोनिया लक्षणे

न्यूमोनिया हा आजार एखाद्या फ्लू प्रमाणे आहे. या आजारांची लक्षणे ही काही अंशी एखाद्या फ्लू सारखी जरी असली तरी देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया न्यूमोनिया लक्षणे.

ताप (Fever)

ताप हे कोणत्याही फ्लूचे प्राथमिक लक्षण असते. अगदी त्याचप्रमाणे न्यूमोनिया झाला असेल तरी ताप येऊ लागतो. हा ताप अचानक वाढतो आणि कमी होतो. साधारण 24 ते 48 तासांहून अधिक काळ हा ताप शरीरात राहिला की काही आणखी त्रासही शरीराला होऊ लागतात. सुरुवातीला हा ताप अगदी सर्वसाधारण वाटू लागतो. पण नंतर मात्र हा अधिक वाढू लागतो. कारण तापाने अंग फणफणलेले असताना काही अन्य परिणामही होऊ लागतात. जे शरीरासाठी हानिकारक ठरु लागतात.

जाणून घेऊ या अर्धांगवायूची लक्षणे

अस्वस्थपणा (Restlessness)

आजारी वाटू लागल्यावर एका जगी बसणे हे शक्य नसते. सतत आपल्याला पडून राहावेसे वाटू लागते. शरीरात आलेला ताप हा ज्यावेळी तुम्हाला अस्वस्थ करु लागतो. त्यावेळी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष मुळीच करु नका. तुम्ही लगेचच डॉक्टरांना गाठा कारण तापामुळे देखील यामध्ये अस्वस्थपणा जाणवू शकतो.

हर्नियाची लक्षणे आणि उपाय

खोकला (Cough)

फुफ्फुसांशी निगडीत असा हा त्रास असल्यामुळे खोकल्याचा त्रास देखील न्यूमोनियामध्ये होतो. खोकल्यामुळे शरीरात जास्तीत जास्त कमजोरी येऊ लागते. जर तुम्हाला ताप- खोकला अशीही काही लक्षण असतील तर ती न्यूमोनियाची आहेत हे समजावे. त्याच योग्य तपासणी करुन घ्यावी. या आजारांमध्ये खोकल्यातून लाल, हिरवा, पिवळा असा कफ पडतो.

श्वसनास अडथळा (Breathing Problem)

कोरोना या आजाराच्या लक्षणामध्ये श्वसनास अडथळा निर्माण होणे हे एक लक्षण आहे. अगदी त्याचप्रमाणे न्यूमोनियामध्ये देखील श्वसनास अडथळा निर्माण होते. हा संसर्ग फुफ्फुसांना झाल्यामुळे श्वसननलिकेला अडथळा निर्माण होतो. परिणामी न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीला मोठ्याने श्वास घ्यावा लागतो. शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी झाली तरी देखील न्यूमोनियाचा त्रास संभवू शकतो. जर तुम्हाला वरील काही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच न्यूमोनियाची चाचणी देखील करुन घेणे गरजेचे असते.

छातीत दुखणे (Chest Pain)

सतत खोकल्यामुळे आणि शरीरामध्ये ताकद न राहिल्यामुळे शिवाय श्वसनासाठी जास्तीची एनर्जी वापरल्यामुळे छातीत दुखण्याचा त्रास हा हमखास या न्यूमोनियामध्ये होतो. यावेळी छातीतच नाही तर पोटात देखील दुखू लागते.

थकवा (Fatigue)

न्यूमोनियाचे आणखी एक लक्षण म्हणजे थकवा. जर तुम्हाला तापामध्ये प्रमाणापेक्षा जास्त थकवा येत असेल तर ते न्यूमोनियाचे एक लक्षण आहे. जर तुम्ही सतत थकत असाल. तुमच्या शरीरात अजिबात त्राण नसेल तर तुम्हाला न्यूमोनिया झालेला असू शकतो. त्यामुळे सतत आलेल्या थकव्याकडे दुर्लक्ष करु नका.

डोकेदुखी (Headache)

सतत खोकल्याचा परिणाम हा डोकेदुखीतून दिसू लागतो. जर तुम्हाला मोठ्याप्रमाणात डोकेदुखी होत असेल तर हे देखील न्यूमोनियाच्या एका लक्षणांपैकी आहे. अशी डोकेदुखी तुम्हाला होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

आजारी असल्यासारखे वाटणे (Dizziness )

न्यूमोनियामध्ये शरीराची सगळी ताकद निघून जाते. तुम्हाला इतका प्रचंड थकवा येतो की, त्यामुळे सतत चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे वाटते.हा त्रास तुमच्या शरातील थकवा वाढल्यामुळे आणि आहार न घेतल्यामुळे होऊ शकतो.

भूक न लागणे (Loss Of Appetite)

बरेचदा आजारात भूक लागत नाही. न्यूमोनिया या आजारामध्ये सुद्धा भूक लागत नाही. बरेचदा अशावेळी काहीही खाण्याची इच्छा होत नाही. मंदावलेली भूक ही प्रतिकार शक्तीवर मोठ्याप्रणात परिणाम करते. भूक न लागल्यामुळे आणि योग्य आहार न घेतल्यामुळे अचानक वजन कमी होते. शरीर जर्जर झाल्यामुळे खाण्याची इच्छा मरुन जाते. जर तुम्हाला अशी काही लक्षण जाणवत असतील तर तुम्हाला न्यूमोनिया असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ह्रदय जोरात धडधडणे (Fast Heart Rate)

एखाद्या गोष्टीला घाबरल्यानंतर किंवा काहीतरी झाल्यानंतर जरी धडधड होऊ लागते. अगदी तशीच धडधड ही न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीला होऊ लागते. छातीत सतत धडधड होणे हे न्यूमोनियाच्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे. 

न्यूमोनिया घरगुती उपचार पद्धती (Pneumonia Treatment At Home In Marathi)

Pneumonia Home Remedies In Marathi

न्यूमोनिया झाल्यानंतर पटकन घाबरुन जाऊ नका डॉक्टरांचा योग्य सल्ला वेळीच घ्या. अंगावर एखादा त्रास काढण्याऐवजी पटकन उपचार सुरु केले तर त्याचा अधिक फायदा होतो. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासही मदत मिळते. औषधांचे उपचार झाल्यानंतरही तुम्ही काही घरगुती उपचार (Pneumonia Home Remedies In Marathi) सुरु ठेवले तर तुम्ही त्यातून पूर्णपणे बरे होऊ शकता.

न्यूमोनिया होऊ नये म्हणून काय करावे (Prevention of Pneumonia In Marathi)

न्यूमोनिया होऊ नये म्हणून काय करावे?

न्यूमोनिया (Pneumonia In Marathi) हा गंभीर आजार नसला तरी या आजारापासून सध्याच्या घडीला दोन ते चार हात दूर राहणेच चांगले. न्यूमोनिया होऊ नये म्हणून तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)

1. न्यूमोनियाची सर्वसाधारण कारणे कोणती ?

न्यूमोनिया हा संसर्गजन्य आजार आहे. शरीरात मोठ्या प्रमाणात सर्दी झाली की हा त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही हा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

2. न्युमोनिया झाल्यावर काय खावे ?

न्यूमोनिया झाल्यानंतर चांगला आहार घेणे गरजेचे असते. जर तुम्ही चौकस आहार घेतला तर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे आहारात भाज्या, फळ यांचा जास्तीत जास्त समावेश करावा.

3. तापाशिवाय न्यूमोनिया होऊ शकतो का ?

हो पण हे दुर्मिळ लक्षण आहे. तापाशिवाय न्यूमोनिया येणारा प्रकार हा फारच कमी पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हे लक्षण सगळीकडेच दिसून येईल असे नाही.

4. न्यूमोनिया आपोआप बरा होतो का ?

हो, न्यूमोनिया हा आपोआप बरा होऊ शकतो. पण तरीदेखील तुम्ही त्याची काळजी घेणे गरजेचे असते. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे हे देखील गरजेचे असते. जर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही अँटीबायोटिक्स घ्या. तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.

Read More From Fitness