DIY सौंदर्य

नव्या नवरीने मिळवा अशी चमकदार त्वचा

Dipali Naphade  |  Jan 31, 2022
post-wedding-beauty-tips-for-glowing-skin

आपल्या लग्नात आपणच सर्वाधिक सुंदर दिसावं असं प्रत्येक नवरीला वाटतं. त्यामुळे अनेक महिन्यांपासून आपल्या त्वचेची काळजी घ्यायला लागते. विशेषतः त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. होणारी नवरी आपल्या लग्नाच्या दिवसांपर्यंत अगदी किती वेळा पार्लरमध्ये जाऊन त्वचेची ट्रिटमेंट अथवा घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घेत असते. पण लग्न झाल्यावर अनेक कामांमध्ये नवरी व्यस्त होते आणि अगदी बेसिक उपाय करूनही त्वचा वा केसांची काळजी घेऊ शकत नाही. त्वचा आणि केसांची योग्य काळजी घेतली नाही तर मग त्वचेवर सुरकुत्या येणे अथवा मुरूमं येणे अशा अनेक समस्या होऊ लागतात आणि नव्या नवरीची त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे लग्नानंतरही नव्या नवरीला आपल्या चेहऱ्यावर तशीच चमक राखायची असेल तर काही टिप्सचा करा वापर. 

त्वचेला मेकअप फ्री ठेवा 

आपल्या लग्नादरम्यान आपण साधारण महिनाभर आधीपासूनच मेकअप करत असतो. पण आता लग्नानंतर ती वेळ आलेली असते,  जेव्हा तुम्ही काही दिवस त्वचेला मेकअप फ्री ठेवा. वास्तविक तुमच्या त्वचेला ताज्या हवेत श्वास घेण्याची गरज असते. तुमचे नवे लग्न झालेले असते तेव्हा तुम्ही त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तुम्ही काही दिवस त्वचेला मेकअप लाऊ नका आणि त्वचेतील रोमछिद्रांना श्वास घेऊ द्या. यामुळे चेहऱ्यावरील तजेलदारपणा हा टिकून राहातो. तुम्हाला कुठेही बाहेर जायचे असेल अथवा पटापट तयार व्हायचे असेल तर अगदी बेसिक लिपस्टिक, काजळचा वापर करा. तसंच तुम्ही झोपण्यापूर्वी क्लिन्झिंग मिल्कने त्वचा स्वच्छ करा. 

चांगली झोप आहे गरजेची 

लग्नाची तयारी आणि लग्नानंतर दुसऱ्या घरात जाणार या विचारांनी नवरीची झोप कमी होऊ लागते. पण त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं मात्र जमू लागतात. पण लग्नानंतर त्वचेवरील तजेलदारपणा आणि चमक टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला झोप पूर्ण करणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास, तुमच्या चेहऱ्यावर अधिक निस्तेजपणा दिसून येतो. त्यामुळे तुम्ही किमान रात्री 6 तास झोप घ्यावी. ज्यामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत होईल. 

सनस्क्रिन लावा 

तुम्ही नवी नवरी असाल आणि त्वचेवरील चमक टिकून ठेवायची असेल तर कोणत्याही हंगामामध्ये आणि घरातून बाहेर पडताना अथवा अगदी घरातही तुम्ही नेहमी त्वचेवर योग्य प्रमाणात सनस्क्रिन लावणे गरजेचे आहे. सनस्क्रिन हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. सनस्क्रिन आपल्या शरीराला अधिक काळ हायड्रेट राखण्यास मदत करते आणि सनस्क्रिनचा नियमित उपयोग हा एक सुंदर स्किन टोन राखून ठेवण्यास मदत करतो. याशिवाय तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुमच्या त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचविण्याचे कामही सनस्क्रिन करते. 

डाएटची घ्या काळजी 

लग्नानंतर त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी आहार अर्थात आपण आपल्या डाएटची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळ आणि हिरव्या भाज्या समाविष्ट करून घ्या. लिक्विड डाएटचा वापर अधिक करा. तसंच आहारामध्ये टरबूज, स्ट्रॉबेरी, पपई, गाजर आणि काकडी या पाणीयुक्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करून घ्या. यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास अधिक मदत मिळते. 

शरीराला हायड्रेट ठेवा 

लग्नानंतर त्वचा अधिक हायड्रेट ठेवायची असेल दर सर्वाधिक तरल पदार्थांचा आहारात समावेश हे उत्तम. विशेषतः जास्त पाणी प्यावे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ताजी राहाते. तसंच आपल्या डाएटमध्ये नारळपाणी, फळांचा ताजा रस, डिटॉक्स वॉटर आणि हर्बल ग्रीन टी यांचा समावेश करून घ्यावा. योग्य प्रमाणात तुम्ही तरल पदार्थांचा समावेश केल्यास, मुरूमं, पिगमेंटेशन आणि त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते. जास्त पाण्याचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. 

व्यायाम आहे गरजेचा 

जेव्हा आपण चमकदार त्वचेबाबत बोलतो तेव्हा व्यायाम करणे आणि घाम गाळणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. तुमच्याकडे व्यायामासाठी नियमित वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या कामात किमान अर्धा तास साधारण व्यायामासाठी अथवा वर्कआऊटसाठी वेळ काढू शकता. तुम्ही डान्स करून अथवा इंटरनेटवरून सोपे व्यायाम शोधून आपल्या रोजच्या आयुष्यात त्याचा समावेश करून घेऊ शकता. असं केल्याने शरीर निरोगी राहाते आणि त्वचाही तजेलदार होते.  

बेसिक स्किन केअर आहे महत्त्वाचे 

चांगल्या आहाराच्या सवयीप्रमाणेच नवविवाहित नवरीला लग्नानंतर आपल्या चेहऱ्याची चमक ठेवण्यासाठी नियमित स्वरूपात क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईजिंग करणेदेखील गरजेचे आहे. यासाठी तुम्ही घरगुती फेसपॅक वापरू शकता. तसंच मधाचा चेहऱ्यावर वापर करू शकता. याशिवाय हळद, बेसन आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्याला वापरून चेहऱ्यावर तेज कायम राखण्यास मदत करू शकता. चेहरा नेहमी थंड पाण्याने धुवा. 

या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही लग्नानंतर आपल्या त्वचेवरील चमक कायम ठेऊ शकता आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य