बॉलीवूड

प्रेगनन्सीमध्ये अनुष्का करतेय शिर्षासन, विराटची घेत आहे मदत

Trupti Paradkar  |  Dec 1, 2020
प्रेगनन्सीमध्ये अनुष्का करतेय शिर्षासन, विराटची घेत आहे मदत

शरीराला सुदृढ आणि मनाला निवांत ठेवणारी साधना म्हणजे योगसाधना. योगाभ्यासात विविध कठीण आणि शरीरासाठी अतिशय लाभदायक अशी आसने आहेत. शीर्षासन हे त्यापैकीच एक आसन आहे. या आसनामध्ये फक्त हाताचे मनगट आणि डोक्यावर शरीराचा संपूर्ण तोल सांभाळावा लागतो. सहाजिकच हे आसन करण्यासाठी साधकाची मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम असावी लागते, तरंच हे आसन तुम्हाला जमू शकतं. फार पूर्वीपासून योग चाहत्यांमध्ये हे आसन सर्वात जास्त लोकप्रिय आहे. नुकतंच योगा फ्रीक अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क गरोदरपणाच्या सातव्या- आठव्या महिन्यात हे आसन केलं आहे. अर्थात यासाठी तिने तिचा पती आणि भारतीय क्रिकेट टिमचा कर्णधार विराट कोहलीची मदत घेतली आहे. जाणून घ्या याबाबत

अनुष्का गरोदरपणात का करतेय शीर्षासन

अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. ज्यामध्ये ती गरोदरपणात शीर्षासन करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये  तिने शेअर केलं आहे की, हा हात खाली आणि पाय वर करून केला जाणारा व्यायाम आहे. हा व्यायाम करणं खूप कठीण आहे. योग माझ्या जीवनाचा एक मोठा भाग आहे. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यावरून मी गरोदरपणातही ती सर्व आसने करू शकते जी मी गरोदरपणाआधी करत होते. ( काही काळापुरती) शरीराला झेपतील इतपत आणि इतरांच्या काळजीपूर्वक केलेल्या मदतीचा आधार घेत. शीर्षीसन मी गेले अनेक वर्ष करत आहे. पण यासाठी मी आता भिंतीचा आणि माझ्या पतीची मदत घेतली आहे. ज्यामुळे मी जास्त सुरक्षित आहे. शिवाय हे आसन करताना वर्च्युअली सेशनद्वारे मी माझी योगा टीचर @eefa_shrof च्या देखरेखी खाली होती. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे की मी गरोदरपणातही माझी योगा प्रॅक्टिस करू शकत आहे.”

शीर्षासनाचे फायदे –

शीर्षासन हे योगासनांमधील एक महत्त्वाचे आसन आहे. शीर्षासन केल्यामुळे पोटाच्या संबधित असलेल्या अनेक तक्रारी आपोआप दूर होतात. यामुळे गॅस अथवा अपचन होत नाही. गरोदरपणात बऱ्याचदा महिलांना या समस्या जाणवत असतात. त्यामुळे याकाळात इतरांच्या मदतीने, तज्ञ्जांच्या देखरेखीखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने शीर्षासन केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. शीर्षासनामुळे मानसिक ताणतणाव हाताळणं सोपं जातं. त्याचप्रमाणे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. या सर्व समस्या गरोदरपणात महिलांना जाणवत असतात. त्यामुळे सर्व काही नीट असेल आणि डॉक्टरांची परवानगी असेल तर या काळातही योगासने करण्यास काहीच हरकत नाही. 

अनुष्का आणि विराटच्या घरी कधी हलणार पाळणा –

अनुष्का  शर्मा आणि विराट कोहली यांनी काही महिन्यापूर्वीच चाहत्यांना ते आई-बाबा होणार हे जाहीर केलं होतं. अनुष्काला आता सातवा -आठवा महिना सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या घरात त्यांच्या बाळाचं आगमन होणार आहे. अनुष्का गरोदरपणातही तिची राहिलेली कामे पूर्ण करत आहे. आठवड्यातून एकदा ती तिच्या प्रोजेक्टच्या शूटसाठी घराबाहेर पडते. जानेवारी 2021 मध्ये ती तिच्या बाळाला जन्म देणार असं त्यांनी सोशल  मीडियावर जाहीर केलं होतं. अनुष्का आणि विराट हे बॉलीवूडची एक हॉट कपल असल्यामुळे त्यांच्या होणाऱ्या बाळाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींनी करा फॉलो

प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात

गौहर – झेद करणार 25 डिसेंबरला लग्न, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन

Read More From बॉलीवूड