Festival

प्रियांका चोप्राचं ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू, भेट स्वरूपात मिळालं जिंजरब्रेड हाऊस

Trupti Paradkar  |  Dec 16, 2020
प्रियांका चोप्राचं ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू, भेट स्वरूपात मिळालं जिंजरब्रेड हाऊस

ख्रिसमस आणि न्यु एअर जवळ आल्यानं सर्वांची सेलिब्रेशनला जोरदार सुरूवात झाली आहे. प्रियांका चोप्रा लग्नानंतर तिचा पती निक जोनाससोबत अमेरिकेत राहत आहे. अमेरिकेत ख्रिसमस आणि न्यु एअर मोठया धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे त्यांच्याकडे या सणाचं सेलिब्रेशन आतापासून सुरू देखील झालं आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून नाताळानिमित्त तिला मिळालेलं पहिलं गिफ्ट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

प्रियांकाला नाताळ निमित्त मिळालं जिंजरब्रेड हाऊस

ख्रिसमसनिमित्त अमेरिकेत घरांची खास सजावट केली जाते. तिथल्या खाद्यसंस्कृतीमध्येही ख्रिसमसच्या सजावटीचा प्रभाव दिसून येतो. ख्रिसमसच्या आधी घरात खास स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थ तयार करून जवळच्या लोकांना गिफ्ट केले जातात. या सर्व पदार्थांमध्ये जिंजरब्रेड हाऊस हा पदार्थ खास प्रसिद्ध आहे. आल्याचं फ्लेवर असलेल्या ब्रेड अथवा बिस्किटांपासून हे घर तयार केलं जातं. या घराला सजवण्यासाठी फ्रोस्टिंग कॅंडी आणि क्रिमचा वापर केला जातो. प्रियांकाला नुकतंच हे जिंजरब्रेड हाऊस गिफ्ट स्वरूपात मिळालं आहे. तिने त्याचा फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. हे गिफ्ट तिला  तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच निक जोनसच्या एका जवळच्या मित्राकडून म्हणजेच पिंकेट स्मिथ या अभिनेत्याकडून मिळालं आहे. या जिंजर हाऊससाठी प्रियांकाने पिंकेट स्मिथचे विशेष आभार मानले आहेत. “या सुंदर फॅमिली जिंजर ब्रेड हाऊससाठी धन्यवाद पिंकेट स्मिथ” अशा शब्दात तिने त्याचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत. 

कसं आहे हे जिंजरब्रेड हाऊस

प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही हे जिंजर ब्रेड हाऊस नक्कीच पाहू शकता. या घरावर चॉकलेटने हॅप्पी हॉलिडे असं लिहिलेलं आहे आणि त्याशेजारी निक आणि प्रियांकासह घरातील इतर मंडळींची नावेदेखील लिहिली आहेत. ही घरातील इतर मंडळी दुसरी कोणीही नसुन प्रियांका आणि निकचे तिन कुत्रे आहेत. ज्यांची नावे डायना, पांडा आणि गिनो अशी आहेत. प्रियांकाने या तिन कुत्र्यांना दत्तक घेतलेलं आहे. प्रियांका आणि निक या तिघांचीही त्यांच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. त्यामुळे सर्वजण त्यांना प्रियांकाच्या कुटुंबातील घटकच समजतात. या जिंजरब्रेड हाऊसशेजारी क्रिमचे छोटे छोटे ख्रिसमस ट्री आहेत शिवाय घर क्रिमच्या बर्फाने आच्छादलेलं आहे.

प्रियांकाचा नववर्षाचा प्लॅन

प्रियांका नवीन वर्षी राजकुमार रावसोबत ‘व्हाईट टायगर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांकाने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर नुकतीच तिने तिच्या  करिअरची वीस वर्षे यशस्वीपणे पूर्ण देखील केली आहेत. विश्व सुंदरी ते हॉलीवूडपर्यंतचा प्रियांकाचा प्रोफेशनल प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.या प्रवासाचं वर्णन करणारं प्रियांकाचं बहुचर्चित आत्मचरित्रदेखील नवीन वर्षी प्रकाशित केलं जाणार आहे काही दिवसांपूर्वीच तिने तिचं पुस्तक अनफिनिश्ड लवकरच प्रकाशित होणार असून त्याचं प्री बुकिंग सुरू असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर पहिल्या बारा तासातच प्रियांकाच्या पुस्तकाला प्रंचड मागणी येऊ लागली. सध्या त्याचं प्री बुकिंग सुरू असून मोठ्या प्रमाणावर या आत्मचरित्राची विक्री झालेली आहे. प्रियांकाने  तिच्या आत्मचरित्राची जॅकेट कॉपी हातात घेत एक फोटो तिच्या अकाऊंटवरून शेअर केला होता ज्याला कॅप्शन दिली होती की, “जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचं पुस्तक हातात घेता तेव्हाच्या भावना, मी मस्करी करत आहे, कारण आता माझ्या हातात फक्त माझ्या पुस्तकाचं जॅकेट आलं आहे. जे काही दिवसांमध्ये माझ्या आत्मचरित्रावर गुंडाळलं जाईल. मी फक्त अनुभवत होती की पुस्तक हातात घेतल्यावर मला नेमकं कसं वाटेल. खरंतर आता वाट पाहणं खूप कठीण झालं आहे, माझं पुस्तक पुढच्या महिन्यात लॉंच होत आहे. मात्र तुमची कॉपी तुम्ही आधीच बूक करून ठेवू शकता” 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नाताळानिमित्त अशी करा घराची सजावट (How To Decorate Your Home For Christmas)

ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, स्टेटस आणि कोट्सनी (Christmas Quotes In Marathi)

भारतातील काही प्रसिद्ध चर्च, जिथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता ख्रिसमस

Read More From Festival