बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण लवकरच प्रियांकाचे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती शेअर केली आहे. प्रियांकाने तिचे आत्मचरित्र नुकतेच लिहून पूर्ण केले असून त्याचा कव्हरपेज फोटो चाहत्यांसाठी तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे मुखपृष्ठ युनिक असून तिच्या पुस्तकाचे नावही हटके आहे.
प्रियांकाने शेअर केलं आत्मचरित्राचे कव्हरपेज –
प्रियांकाने या फोटोसोबत शेअर केलं आहे की, “पूर्ण झाले…पहिल्यांच या शब्दांना कागदावर छापलेलं पाहणं किती अद्भूत भावना आहे. #Unfinished लवकरच येत आहे” या भावनेसोबतच प्रियांकाने या ट्विटमध्ये पेंग्विन रॅंडम हाऊसला टॅग केलं आहे. ज्यामुळे प्रियांकाचे आत्मचरित्र पेंग्विन पब्लिकेशन प्रकाशित करणार असं वाटत आहे. कारण आतापर्यंत अनेक कलाकारांची पुस्तके पेंग्विनेच प्रकाशित केली आहेत. यापुर्वी एका ट्विटमधुन प्रियांकाने शेअर केलं होतं की, “Unfinished आताच लिहून पूर्ण झालं आहे. लवकरच फायनल मॅन्युस्क्रिप्ट पाठवण्याच्या मनस्थितीत आहे. तुमच्यासोबत ते शेअर करण्यासाठी वाट पाहणं खरंच खूप कठीण आहे”
काय असणार प्रियांका च्या आत्मचरित्रामध्ये
प्रियांका च्या मते तिच्या आत्मकथेत ते सर्व काही असेल जे तिने जगलं, आचरणात आणलं आणि तिला प्रेरणादायी ठरलं. त्यामुळे ते इतरांसाठीही प्रोत्साहन देणारं ठरेल. तिच्या मते तिच्या आयुष्यात असं बरंच काही घडलं आहे जे चाहत्यांना सविस्तर वाचायला आवडेल. कारण प्रियांकाने वयाच्या सतराव्या वर्षीच मनोरंजन विश्वात आपलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ती मिस इंडिया झाली आणि तिचा प्रवास बॉलीवूड पासून पार सातासमुद्रापार हॉलीवूडपर्यंत झाला. या क्षेत्रात नवीन येणाऱ्या लोकांसाठी हा प्रवास आत्मचरित्राच्या माध्यमातून अनुभवणं हे नक्कीच प्रेरणादायी असू शकतं. मात्र यात तिने नेमके काय आणि कोणते खुलासे केले आहेत ते पुस्तक प्रकाशित झाल्यावरच समजेल. कारण तिच्याही आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्याचा परिणाम तिच्यासोबत अनेकांच्या आयुष्यावर झाला होता. सहाजिकच चाहत्यांना प्रियांकाचे आत्मचरित्र वाचण्याची घाई झाली आहे.
प्रियांकाने मनोरंजन विश्वात केली वीस वर्षे पूर्ण
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांकाने या प्रवासात एक महत्वाचा आणि यशस्वी टप्पा गाठला आहे. तिने नुकतीच मनोरंजन विश्वात तब्बल वीस वर्षे पूर्ण केली आहेत. काही दिवसांपुर्वीच तिने तिच्या या वीस वर्षांचा प्रवास दर्शवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये प्रियांकाच्या केवळ मॉडलिंग, अभिनयावर प्रकाश टाकलेला नसून तिची सामाजिक कार्याची एक अनोखी बाजूही यातून जगासमोर दाखवण्यात आली होती. प्रॉडक्शन कंपनी @ozzyproduction ने हा व्हिडिओ प्रियांकासाठी तयार केला होता. प्रियांकाने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्ये स्वतःची हटके ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर प्रियांका आता हॉलीवूडमध्ये तिच्या सुखी संसारात नक्कीच गुंतली आहे. 2018 साली डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता. प्रियांका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ज्यामुळे प्रियांका आणि निक सध्या बॉडीवूडप्रमाणेच हॉलीवूडचं एक हॉट कपल आहे. या दोघांच्या फोटो आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. प्रियांका निकपेक्षा मोठी आहे तरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही. प्रियांका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. प्रियांका आणि निक त्यांच्या वैवाहिक जीवनात फार खुश आहेत. त्यामुळे या लव्हस्टोरीचा खुलासाही या आत्मचरित्रात नक्कीच असेल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
पार्थ समथानने घेतला ‘कसौटी जिंदगी की’ सोडण्याचा निर्णय
खऱ्या आयुष्यातही पंकज त्रिपाठी यांना व्हायचे गुंजन सक्सेनाचे बाबा
संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje