Fitness

शरीरातील चरबी होते व्यायामने कमी, कशी असते प्रक्रिया

Dipali Naphade  |  Oct 12, 2019
शरीरातील चरबी होते व्यायामने कमी, कशी असते प्रक्रिया

आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलनुसार आपल्या शरीरामध्ये खूपच बदल होत असतो. खाण्याची योग्य वेळ नसल्यामुळे शरीरामध्ये चरबी साठते. अशावेळी आपण नेहमी आधार घेतो तो म्हणजे व्यायामाचा. शरीरातील चरबी नियमित व्यायामाने कमी होते. पण चरबी कमी होते म्हणजे नेमकं काय होतं? बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की, चरबीचं रूपांतर हे ऊर्जेमध्ये होतं अथवा त्याचं रूपांतर हे उष्णतेमध्ये होत असतं. तर काही जणांच्या मते चरबीचं रूपांतर हे स्नायूमध्ये होतं. तर काहींना वाटतं व्यायाम केल्यानंतर चरबी ही पाणी स्वरूपात अथवा कार्बनडाय ऑक्साईड स्वरूपात शरीराबाहेर पडते. तर पहिल्या दोन गोष्टी चूक असून तिसरी गोष्ट ही परफेक्ट आहे. तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुमची चरबी ही शरीराबाहेर पाणी अथवा कार्बनडाय ऑक्साईड स्वरूपामध्येच बाहेर पडते आणि हे अभ्यासातून सिद्ध झालं आहे. 

बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

काय असते नक्की ही प्रक्रिया?

Shutterstock

शरीरामध्ये चरबी साठल्यानंतर ती बाहेर पडणं हे व्यायामाद्वारे शक्य होतं. पण नक्की चरबी विरघळते म्हणजे काय होतं? तर ही प्रक्रिया बऱ्याच जणांना माहीत नसते. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या शरीरातील फुफ्फुसाची. कारण श्वसनक्रियेची महत्त्वाची प्रक्रिया होत असते ती फुफ्फुसामुळे. व्यायाम करत असताना प्रचंड प्रमाणात घाम येतो. चरबी ही घाम आणि लघवीद्वारे पाण्याच्या स्वरूपात बाहेर पडते. पण ही चरबी जास्त प्रमाणात बाहेर पडते ती कार्बनडाय ऑक्साईड स्वरूपात. तुम्ही जर तुमचं वजन 10 किलो कमी केलंत तर त्यापैकी साधारण 8 किलो चरबी ही कार्बनडाय ऑक्साईड स्वरूपात बाहेर पडते आणि पाण्याच्या स्वरूपात साधारण 1.6 किलो इतकी बाहेर पडते. चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असतो हे सर्वांनाच माहीत असतं. पण व्यायाम करून ती चरबी कमी होते म्हणजे नेमकी काय प्रक्रिया असते याची माहिती नसते. 

हातावरची चरबी महिनाभरात करा कमी, जाणून घ्या

चरबी वाढ होण्यामध्ये असतो ऑक्सिजनचाही समावेश

Shutterstock

तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की, शरीरामध्ये चरबीची वाढ होण्यात तुमच्या जेवणातून जाणाऱ्या ऑक्सिजनचाही समावेश असतो. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरातील जास्तीत जास्त कार्बनडाय ऑक्साईड काढून टाकण्याची गरज भासते. तुम्ही घेतलेला ऑक्सीजन हा शरीरामध्ये पचनप्रक्रियेनंतर कार्बनडाय ऑक्साईडमध्ये बदलतो. त्यामुळे त्याची चरबी होण्यास मदत मिळते. अशावेळी आपण नक्की काय पदार्थ खात होत याकडे लक्ष द्यायला हवं. चरबी कमी होण्यासाठी तुमच्या शरीरातील स्नायूंच्या नियमित हालचाली होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असल्यास, व्यायाम करण्याची सर्वात जास्त गरज असते. पण त्यासाठी तुम्ही केवळ जिममध्येच  जायला हवं असं नाही. तर तुम्ही नियमित एक तास चालल्यानेदेखील तुमची शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. तसंच दिवसभरात तुम्ही घरातील केरकचरा अथवा कपडे धुणं, स्वयंपाकघरामध्ये उभं राहून काम करणं यामधूनदेखील तुमची चरबी कमी होण्याची प्रक्रिया होऊ शकते. खरं तर घरकामात तुमची ही चरबी घटवण्याची प्रक्रिया तिपटीने जास्त होते. तसंच योग्य प्रमाणात खा आणि जास्त घाम गाळा. यातून तुम्हाला सोप्या पद्धतीने चरबी कमी करता येते. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या नियमित व्यायाम करून चरबी कमी करू शकता. 

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness