ADVERTISEMENT
home / xSEO
बाळाच्या वाढीचे टप्पे

बाळाच्या वाढीचे टप्पे | Step By Step Baby Growth In Marathi

बाळ जन्माला येणे ही काही सोपी गोष्ट नाही. नव्या आईचे शरीर या दरम्यान अनेक स्थित्यंतरांतून जात असते. बाळंतपण हा खरोखर स्त्री चा दुसरा जन्म असतो. जगात सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग मिळते पण आई होण्याचे ट्रेनिंग कुठेही कोणीही देऊ शकत नाही. या सर्वात कठीण पण सुंदर प्रवासात जसजसे अनुभव येतील तसे तसे बाळ व आई देखील अनेक नव्या गोष्टी शिकत जातात. प्रेग्नंसीच्या लक्षणांपासून ते प्रसूती होईपर्यंत नव्या आईला तिच्या बाळाची चिंता सतावते. बाळाची काळजी कशी घ्यायची, आपले बाळ ठीक आहे ना, त्याची भूक भागतेय ना, त्याला काही त्रास तर होत नसेल, त्याची वाढ तर व्यवस्थित होतेय ना या आणि अशा हजारो विचारांनी नव्या आईची झोप उडते. पण काळजी करू नका. या लेखात आपण जाणून घेऊया बाळाच्या वाढीचे सगळे टप्पे! म्हणजेच जन्माला आल्यापासून ते बाळ एक वर्षांचे होईपर्यंत बाळाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote) हे अगदी तपशीलवार दिलेले आहे. हे वाचून तुमच्या मनातली चिंता नक्कीच दूर होईल व तुमच्या मनातील शंकांचेही निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रत्येक बाळ वेगळे असते. एक बाळ जर काही ठराविक आठवड्यात एखादा टप्पा गाठत असेल तर दुसरे बाळ देखील तेव्हाच तो टप्पा गाठेल असे होत नाही. पण ढोबळमानाने काही ठोकताळे दिलेले आहेत की बाळ कुठल्या आठवड्यात वाढीचा साधारणपणे कुठला टप्पा गाठू शकेल. तुमच्या बाळाला जर एखादा महिना वेळ लागला तरी फार चिंता करू नका.  बाळ त्याच्या त्याच्या वेगाने व्यवस्थित सगळे टप्पे गाठेल. बाळाची वाढ होण्यासाठी उपाय (Balachi Vadh Honyasathi Upay) करण्याआधी व तुमच्या मनात काही शंकाकुशंका असल्यास तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी याबाबतीत मनमोकळेपणाने चर्चा करा. 

सर्व पालकांप्रमाणे तुमच्याही मनात तुमच्या बाळाबद्दल अनेक प्रश्न असतील. येत्या काळात तुमच्या बाळाची वाढ कशी होते आहे आणि त्यासाठी तुम्ही काय तयारी ठेवले अपेक्षित आहे हे तुम्हाला या लेखात जाणून घेता येईल. तुमच्या बाळाच्या सर्वांगीण विकासात तुम्ही कसे योगदान देऊ शकता याची कल्पना तुम्हाला हा लेख वाचून येईल . एक असहाय्य नाजूक नवजात बालकापासून ते तुरुतुरु धावणाऱ्या व बोबडे बोलणाऱ्या बाळापर्यंत तुमच्या तुमच्या बाळाचा हा सुंदर प्रवास अतुलनीय असेल आणि हे परिवर्तन होण्यासाठी फक्त 12 महिने लागतात. लहान मुले आश्चर्यकारक वेगाने वाढतात आणि त्यांच्यात दर आठवड्याला, महिन्याला काही ना काही बदल होतात. प्रत्येक महिन्यात नवीन आणि रोमांचक घडामोडी घडतात.  बाळाची वाढ कशी होते (Balachi Vadh Kashi Hote) व बाळाच्या वाढीचे टप्पे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

जाणून घ्या बाळाच्या वाढीचे टप्पे तक्ता स्वरूपात – Baby Development Month By Month Chart 

बाळाच्या वाढीचे टप्पे । Balachi Vadh Kashi Hote
बाळाच्या वाढीचे टप्पे

जन्माला आल्यानंतर प्रत्येक महिन्यात साधारणपणे बाळ कशी प्रगती करते किंवा बाळाची वाढ कशी होते याची ढोबळ कल्पना तुम्हाला खालील तक्ता वाचून येईल. पण लक्षात ठेवा की प्रत्येक बाळाचा विकास वेगळ्या पद्धतीने होतो. तुमच्या बाळाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल तुम्हाला काही चिंता असल्यास बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बेबी माइलस्टोन : 1 महिना

निपुणता कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

पालथे झोपवल्यावर डोके वर करण्याचा प्रयत्न करणे

आवाजावर प्रतिक्रिया देणे

चेहऱ्याकडे बघणे

बाळाने प्रकाशाच्या दिशेने मान वळवणे

ADVERTISEMENT

काळे आणि पांढरे पॅटर्न पाहू शकतात

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

गोष्टींचे अनुकरण करणे 

ओह-आह आवाज काढायचा प्रयत्न करणे 

ADVERTISEMENT

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुले करू शकतात)

हसणे

डोके 45 अंशाच्या कोनात वळवणे 

बेबी माइलस्टोन : 2 महिने

निपुणता कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

हळू हळू गोड आवाजात संवाद प्रतिक्रिया देणे 

चेहऱ्याजवळ आणल्यावर वस्तू आणि चेहऱ्यांचे अनुसरण करणे 

डोके वर उचलण्याचा प्रयत्न करणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

घरातील सदस्यांचा (आई -बाबांचा) आवाज ओळखणे 

हसून प्रतिसाद देणे 

डोके 45 अंशाच्या कोनात वळवणे 

उत्स्फूर्त हालचाली करणे 

ADVERTISEMENT

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

डोके स्थिर ठेवून उचलणे

पायावर वजन हाताळू शकणे 

पालथे पडल्यावर डोके आणि खांदे उचलणे (मिनी-पुश अप)

ADVERTISEMENT

बेबी माइलस्टोन : 3 महिने

निपुणता कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

डोके स्थिरपणे उचलणे

आई-बाबांचा चेहरा ओळखणे

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

मिनी पुश-अप करणे

हसणे 

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

मोठ्या आवाजाकडे मागे वळून बघणे

ADVERTISEMENT

दोन्ही हात एकत्र हलवू शकणे आणि खेळण्यांवर हात मारू शकणे

पालथे पडणे 

बेबी माइलस्टोन: 4 महिने

निपुणता कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

सतत डोके वर करणे 

ADVERTISEMENT

पायावर वजन हाताळू शकणे 

तुमच्या बोलण्याला आवाज काढून प्रतिसाद देणे 

मिनी पुश-अप करणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

पसरलेल्या हातांनी वस्तू किंवा खेळणी धरू शकणे 

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

आवाजांची नक्कल करणे, बा…बा, दा..दा असे आवाज काढू शकणे 

पहिला दात येण्याची सुरुवात होऊ शकते 

ADVERTISEMENT

पालथे पडणे 

बेबी माइलस्टोन: 5 महिने

निपुणता कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

गडद आणि स्पष्ट रंग ओळखू शकणे 

कमरेतून मागे वळू शकणे 

ADVERTISEMENT

हातपाय हलवून खेळणे व त्याचा आनंद होणे

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

नवीन आवाजांना प्रतिसाद देणे 

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

ADVERTISEMENT

काही क्षण आधाराशिवाय बसू शकणे

वस्तू तोंडात घालणे 

अनोळखी व्यक्तीकडे बघून अस्वस्थ होणे, रडणे

बेबी माइलस्टोन: 6 महिने

निपुणता कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

ध्वनी आणि आवाजांकडे बघणे 

आवाजाची नक्कल करणे, तोंडाने बुडबुडे तयार करणे 

घन पदार्थ खाण्यासाठी तयार होणे

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

गोष्टींपर्यंत सरकत जाण्याचा प्रयत्न करणे आणि वस्तू तोंडात घालणे 

पाठीवरून पालथे पडू शकणे व पालथे पडल्यावर सरळ होणे 

स्वतःचे नाव ओळखणे

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

ADVERTISEMENT

सरकत पुढे जाऊ शकणे किंवा गुडघ्यांवर रांगणे सुरू करणे 

दोन तीन अक्षरी शब्द बोलणे 

गोष्टी स्वतःकडे ओढून घेणे 

आधाराशिवाय बसू शकणे 

ADVERTISEMENT

बेबी माइलस्टोन: 7 महिने

निपुण कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

वस्तू गोळा करण्यासाठी रांगणे किंवा सरकणे 

शब्दांचे अनुकरण करणे

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

अक्षरे एकत्र करून शब्दासारखा आवाज काढायचा प्रयत्न करणे 

गुढघ्यावर रांगायचा प्रयत्न करणे 

एका हाताने वस्तू उचलणे आणि दुसऱ्या हाताने देणे 

दोन वस्तू एकमेकांवर आपटणे 

ADVERTISEMENT

आधाराशिवाय बसू शकणे 

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

काहीतरी धरून उभे राहण्याचा प्रयत्न करणे 

हात हलवून बाय-बाय म्हणणे

ADVERTISEMENT

बेबी माइलस्टोन: 8 महिने

निपुण कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

आधाराशिवाय बसणे 

दोन्ही पालकांना मम्मा बाबा पापा असे म्हणायला सुरुवात करणे 

गुडघ्यावर रांगणे 

ADVERTISEMENT

एका हातातून दुसऱ्या हाताला वस्तू घेता येणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

आधार घेऊन उभे राहणे 

गुडघ्यावर भराभर रांगणे 

ADVERTISEMENT

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

उभे  राहण्यासाठी जोर लावणे , फर्निचरच्या आधाराने हळूहळू पावले टाकणे 

वस्तू धरण्यासाठी अंगठ्याचा वापर करणे 

खाणाखुणा करून प्रतिक्रिया देणे, काय हवे आहे हे सांगणे 

ADVERTISEMENT

बेबी माइलस्टोन: 9 महिने

निपुण कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

अक्षरे एकत्र करून शब्दासारखा आवाज काढणे 

उभे राहणे आणि बसू शकणे 

वस्तू आपटणे व फेकणे 

ADVERTISEMENT

खायला देताना चमचा धरण्याचा प्रयत्न करणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

पिंन्सर ग्रास्प वापरून वस्तू उचलणे 

फर्निचर धरून चालणे 

ADVERTISEMENT

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

टाळ्या वाजवण्याचा किंवा लपाछपीचा खेळ खेळू शकणे

आईला “मामा” आणि वडिलांना “पापा”, बाबा म्हणणे  

बेबी माइलस्टोन: 10 महिने

निपुण कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

पिंन्सर ग्रास्प वापरून वस्तू उचलणे 

गुडघ्यांवर चांगले रांगता येणे

फर्निचर धरून चालणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

आईला “मामा” आणि बाबांना बाबा “पापा” म्हणणे.

याशिवाय दादा, काका, टाटा असे दोन अक्षरी शब्द बोलणे 

दूरच्या वस्तूंकडे निर्देश करणे 

नावाने हाक मारल्यावर प्रतिसाद देते आणि “नाही” म्हणण्याचा अर्थ काय आहे हे समजणे 

ADVERTISEMENT

खाणाखुणांद्वारे इच्छा किंवा मागणी व्यक्त करणे 

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

कपमधून द्रव पिता येणे 

काही सेकंद आधाराशिवाय उभे राहणे 

ADVERTISEMENT

वस्तू बॉक्स किंवा कंटेनरमध्ये ठेवता येणे 

बेबी माइलस्टोन: 11 महिने

निपुण कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

आईबाबांना मामा” आणि बाबा पापा “पापा” म्हणणे 

टाळ्या वाजवण्याचे खेळ खेळणे 

ADVERTISEMENT

काही सेकंद आधाराशिवाय उभे राहणे 

गोष्टींकडे निर्देश करता येणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

इतरांचे अनुकरण करणे 

ADVERTISEMENT

बॉक्समध्ये वस्तू ठेवता येणे 

साध्या सूचना समजतात

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

कपमधून द्रव पिता येणे 

ADVERTISEMENT

“मामा” आणि “पापा” व्यतिरिक्त काही शब्द बोलता येणे 

उभे असताना पुढे झुकणे

काही पावले चालता येणे 

बेबी माइलस्टोन: 12 महिने

निपुण कौशल्ये (बहुतेक मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

इतरांचे अनुकरण करते

शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करून बोलायचा प्रयत्न करणे 

हातवारे, हात हलवून बाय करणे आणि टाळ्या वाजवणे 

उदयोन्मुख कौशल्ये (अर्धी मुले करू शकतात)

ADVERTISEMENT

“मामा” आणि “पापा” व्यतिरिक्त काही शब्द बोलता येणे 

आधाराशिवाय काही पावले उचलता येणे 

‘इकडे ये’ यासारख्या साध्या सूचना समजणे आणि प्रतिसाद देणे 

एकदा सांगितल्यावर, बॉक्समध्ये वस्तू ठेवता येणे आणि नंतर त्या बाहेर काढता येणे 

ADVERTISEMENT

प्रगत कौशल्ये (केवळ काही मुलेच करू शकतात)

क्रेयॉन हातात धरून रेषा खरडण्याचा प्रयत्न करणे 

आधाराशिवाय चालता येणे 

“मामा” आणि “पापा” व्यतिरिक्त सोपे शब्द बोलता येणे 

ADVERTISEMENT

कार, बॉल, भूभू ,मनीमाऊ, काऊ अशा काही शब्दांचा अर्थ समजणे 

अधिक वाचा – बाळ रडण्याची कारणे आणि उपाय 

बाळाच्या वाढीचे टप्पे 1 ते 3 महिने – Baby Development: One to Three Months

बाळाच्या वाढीचे टप्पे । Balachi Vadh Kashi Hote
बाळाच्या वाढीचे टप्पे

तुमच्या सुंदर बाळाच्या जन्माबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! तुमच्या बाळाला गर्भाच्या बाहेरील जीवनाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस किंवा काही आठवडे लागू शकतात. आणि नवीन आईलाही तिच्या या नव्या दिनक्रमाशी जुळवून घेण्यास वेळ लागू शकतो. विकासाच्या या पहिल्या टप्प्यात, बाळाचे शरीर आणि मेंदू बाहेरच्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जन्मानंतर पहिले तीन महिने तुमचे नवजात बाळ बाहेरील जगाशी झपाट्याने जुळवून घेत असते. या टप्प्यावर ते आपला बहुतेक वेळ झोपण्यात आणि दूध पिण्यात घालवते. या क्षणी तुमचे बाळ फारसे काही करत नाही असे तुम्हाला वाटेल, परंतु सत्य हे आहे की ते खूप काही शिकत असते. जरी तुमचे बाळ फार लांबचे पाहू शकत नसले तरी त्याला तुमचा चेहरा बघायला आवडेल. आणि जेव्हा तुम्ही त्याला जवळ घेऊन त्याचे लाड करता तेव्हा ते तुमचा चेहरा लक्षात ठेवेल. इतक्या लहान वयातही बाळ तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमची जीभ बाहेर काढता आणि ते तुमची नक्कल करते का ते पहा.या काळात तुमच्या नवजात बाळाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न, त्यानंतर झोप होय. आई व बाळाला नियमित अन्नप्राशन करणे आणि झोपणे या नित्यक्रमात येण्यासाठी वेळ लागू शकतो. 

पहिल्या काही दिवसांत, नवजात बाळाला दिवसभर वारंवार काही तासांच्या अंतराने स्तनपान दिले जाते. तुम्हाला असे आढळेल की नवजात बाळाला दिवसातून आठ ते पंधरा वेळा थोडे थोडे दूध लागते. पहिल्या आठवड्यात किंवा नंतर, ते थोडे कमी होऊ शकते.  तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या सवयी देखील अशाच प्रकारे अनियमित असू शकतात. 24 तासांच्या कालावधीत तो कदाचित एकूण 16 ते 17 तास झोपेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला चांगली आणि दीर्घ झोप घेता येणार नाही, कारण बाळाची झोप सुमारे आठ डुलक्यांमध्ये पूर्ण होते. बाळाच्या जन्मानंतर सहा ते आठ आठवड्यांच्या दरम्यान, तुमचे बाळ आहार आणि झोपेचे वेळापत्रक पाळायला शिकते. प्रत्येक बाळ अद्वितीय आणि वेगळे असते. तुमचे बाळ स्वतःच्या गतीने त्याचे वाढीचे टप्पे गाठेल. त्यामुळे चिंता करू नका. जर ते काही गोष्टी आत्ता करत नसेल, तर पेशन्स ठेवा, थोड्या दिवसांनी नक्की करेल. 

ADVERTISEMENT

जर तुमचे बाळ प्रिमॅच्युअर असेल, म्हणजे गर्भधारणेचे 37 आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म झाला असेल तर,तुमच्या बाळाला वाढीचे टप्पे गाठायला थोडा अधिक काळ लागू शकतो. दरम्यान, तुमचे बाळ जन्मापासून पहिल्या तीन महिन्यात पुढील गोष्टी करू शकते. पहिले काही दिवस बाळ स्वतःशीच हसते. परंतु तीन महिन्यांत, ते तुमच्या हसण्याला प्रतिसाद म्हणून हसेल आणि तुमच्याकडे बघून परत हसण्याचा प्रयत्न करेल..तसेच ते कुशीवर वळण्याचा प्रयत्न करेल आणि पालथे पडण्याचा प्रयत्न देखील करेल. त्यांना पालथे झोपवल्यास ते त्याचे डोके आणि छाती वर करण्याचा प्रयत्न करेल. या काळात त्यांची दृष्टी विकसित होत असल्याने त्याच्या डोळ्यांनी वस्तू बघण्याचा प्रयन्त करेल आणि हळूहळू आय क्रॉसिंग कमी होईल. बाळ त्याच्या मुठीची उघडझाप करेल आणि  मूठ तोंडाकडे नेऊन ती चोखण्याचा प्रयत्न करेल. ते त्याच्या हातात वस्तू पकडण्याचा प्रयत्न करेल. लटकत असलेल्या वस्तूंकडे झेप घेण्याचा प्रयन्त करेल. 

अधिक वाचा – तान्ह्या बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत

बाळाच्या वाढीचे टप्पे 4 ते 6 महिने – Baby Development: Four to Six Months 

बाळाच्या वाढीचे टप्पे । Balachi Vadh Kashi Hote
बाळाच्या वाढीचे टप्पे

चार महिन्यांचे झाले की तुमचे बाळ आता त्याच्या सभोवतालच्या गोष्टी शोधण्यासाठी खूप उत्सुक होते. नवीन गोष्टी शोधण्यासाठी त्याला वेगवेगळे फॅब्रिक्स किंवा हलविण्यासाठी खुळखुळा देण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे बाळाचे लक्ष आता सहज विचलित होईल. यामुळे तुम्हाला त्याला खायला घालणे कठीण होऊ शकते.या काळात तुमच्या बाळाची दृष्टी विकसित होते आणि आता ते एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटां ओळखू लागते जसे की लाल आणि नारिंगी. आता चमकदार रंगांची छोटी हलती खेळणी आणि जिम टॉईजमुळे त्याचे लक्ष वेधले जाईल.

बाळ चार महिन्यांचे होईपर्यंत त्याचे पोटही वाढलेले असते, त्यामुळे त्याला वारंवार दूध पिण्याची गरज नसते. तो आता दिवसातून फक्त चार ते सहा वेळाच दूध पीत असेल, पण त्याचे वजन अजून वाढलेले दिसेल. तुमच्या लक्षात येईल की बाळाला दूध पाजताना बाळाचे लक्ष दुसरीकडे वळते आहे. आजूबाजूच्या गजबजाटाकडे त्याचं लक्ष वेधलं जात आहे. तुमच्या आजूबाजूला जे घडत आहे त्यावर प्रतिक्रिया देणे तुमच्या बाळाला चांगले वाटत असले तरी, अशावेळी स्तनपान किंवा बाटलीने दूध पाजणे कठीण होऊ शकते. जर तुमच्या बाळाचे लक्ष सहज विचलित होत असेल तर त्याला शांत ठिकाणी दूध पाजण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचे बाळ तुमच्या चेहऱ्याकडे आणि तुम्ही करत असलेल्या आवाजाकडे खूप लक्ष देईल. तसेच, ते तुमच्या वेगवेगळ्या आवाजांवर किंवा उच्चारांवर प्रतिक्रिया देईल.  त्यामुळे जर तुम्ही गमतीशीर आवाज काढले तर ते कदाचित हसेल. तुमच्या आवाजाच्या बदल्यात बाळही बडबड करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. संभाषणाची कला विकसित करण्याच्या दिशेने ही पहिली पायरी आहे. या काळात बाळाच्या तोंडून  “मा-मा”, “पा-पा” हे शब्द देखील येतात. 

ADVERTISEMENT

या वयापर्यंत तुमचे बाळ तुमच्या आवाजाचे अनुकरण करू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या बाळाला “बू” किंवा “टा-टा” म्हणाल तर ते पुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करू शकते. चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजांचे अनुकरण करून तुम्ही तुमच्या बाळाला प्रतिसाद देण्यास प्रोत्साहित करू शकता. जेव्हा बाळ आवाज करत असेल आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. अशा रीतीने त्याला भाषेचे महत्त्व कळेल आणि त्याचे कारण आणि परिणाम समजण्यास सुरुवात होईल. तो जे बोलतो ते खरोखर महत्त्वाचे आहे हे त्याला कळू लागेल.

बाळ पाच महिन्यांचे झाल्यावर –

बाळ साधारण पाच महिन्याचे झाले की ते स्वतःच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकते. ते तुम्हाला मिठी मारून त्याचे प्रेम दाखवेल आणि तुमच्या मांडीवर येण्यासाठी हात वर करेल. जेव्हा तुम्ही मजेदार चेहरा करता किंवा आवाज काढता तेव्हा ते कदाचित हसेल. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तुमच्या बाळाशी बोलता तेव्हा ते तुमच्याकडे  मनापासून पाहत असतो. भाषा कशी काम करते हे ते रोज शिकत असते. जर तुम्ही त्याला नावाने हाक मारली तर ते  कदाचित तुमच्याकडे बघायला वळेल. बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी 5 महिन्याच्या बाळाचा आहार व्यवस्थित असायला हवा.

या वयात तुमच्या बाळाचा शारीरिक विकास खूप वेगाने होतो. जर तुम्ही बाळाला तुमच्या मांडीवर किंवा जमिनीवर बसवले तर ते काही क्षणांसाठी आधाराशिवाय बसू शकते. बाळाला बसण्यास मदत करण्यासाठी, त्याचे पाय इंग्रजीतील ‘V’ अक्षराच्या आकारात पसरवा. असे केल्याने बसताना त्याचा तोल सांभाळला जाईल आणि पडण्याचा धोकाही कमी होईल. बाळाला या स्थितीत बसवा आणि त्याच्यासमोर खेळण्यासाठी खेळणी ठेवा. बाळाला पडण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्याभोवती उशा ठेवा.बाळाला पोटावर झोपण्यासाठी प्रोत्साहित करत रहा. यामुळे त्याच्या मानेचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हे डोक्यावर नियंत्रण मिळविण्यास देखील मदत करते, जे बसण्यास सक्षम होण्यासाठी खूप महत्वाचे आहे. या वयात तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या मांडीवर उभे करू शकता. या वयात तुमचे बाळ असंबद्ध आवाज काढत आहे आहे असे तुम्हाला वाटत असले तरी, तो प्रत्यक्षात त्याच्या भाषा कौशल्याचा सराव करत आहे आणि त्याच्या भाषेच्या संग्रहात नवीन ध्वनी जोडत आहे. या वयात, आपल्या बाळाला त्याच्या नवीन क्षमतेबद्दल इतके आकर्षण होते की ते एकच गोष्ट वारंवार करते. तुमच्या बाळाला एखाद्या कौशल्यात प्रभुत्व मिळवल्यानंतरच कदाचित नवीन कौशल्य शिकण्यास सुरुवात करावीशी वाटेल.

जेव्हा तुमचे बाळ आवाज करते तेव्हा तुम्हीही बोलून बाळाला प्रतिसाद द्या. अशा प्रकारे पुनरावृत्ती केल्याने तुमच्या बाळाला तुमचे अनुकरण करण्यास प्रोत्साहन मिळेल. जेव्हा बाळ बोलू लागते तेव्हा त्याला प्रतिसाद दिल्याने त्याला आनंद होतो की तो तुमच्याशी बोलू शकतो. या वयात बाळ स्वतःचे नाव ओळखू लागते आणि कदाचित दुरून कुणी आवाज दिल्यास त्या दिशेने बाळ बघते. जर तुम्ही तुमच्या बाळाशी बोललात आणि त्याच्या आवाजाला प्रतिसाद दिला तर त्याची भाषा कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. तुम्ही बोलत असताना ते तुमचे तोंड काळजीपूर्वक पाहील आणि तुमच्या उच्चारण शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. या वेळी तुम्हाला असे दिसून येईल की तुमचे बाळ “म” आणि “ब” सारखे आवाज करते.

ADVERTISEMENT

बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर –

बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर घन आहार घेण्यास तयार आहे का या लक्षणांकडे लक्ष द्या. या काळात तुमचे बाळ आता सहजतेने फिरण्यास सक्षम असावे. पालथे पडणे आणि सरळ होणे म्हणजे चालणे सुरू करण्याच्या दिशेने प्रारंभिक टप्पा आहे.येत्या काही महिन्यांत, तुमचे बाळ गुडघ्यांवर रांगण्यास  देखील सुरू करू शकते.या महिन्यात तुमच्या बाळाचे त्याच्या हातावर नियंत्रण झपाट्याने विकसित होते आणि ते त्याच्या बाजूला वस्तू खेचू शकते. जेव्हा बाळ खेळणी पुढे धरायला शिकते, तेव्हा तो गोष्टी एका हातातून दुसऱ्या हाताकडे नेण्याचा सराव सुरू करते.शिवाय, ते हे देखील शिकेल की हातातून एखादी गोष्ट सोडणे जितके मजेदार आहे तितकेच ते उचलण्यातही मजा आहे.तुमचे बाळ या महिन्यात दोन्ही दिशांना वळायला शिकू शकते.

या काळात बाळाचे कपडे बदलताना, एक हात बाळाच्या पोटावर ठेवा. तुमच्या बाळाला बेडवर किंवा इतर कोणत्याही उंच पृष्ठभागावर कधीही एकटे सोडू नका. बाळाचे कपडे बदलण्यासाठी खाली चटई किंवा सतरंजी घालणे कधीही सुरक्षित आहे. सहा महिन्यांचे झाल्यावर तुमचे बाळ तुमच्याप्रमाणेच जग पाहू आणि ऐकू शकते. जसजसे तुमचे बाळ वाढते आणि विकसित होते, तसतसे तो तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रडण्यासह संप्रेषणाच्या इतर पद्धती शिकेल. तुमच्या बाळाला “ब”, “म”, “ग” किंवा इतर स्वर संयोजनासारखी अक्षरे पुन्हा पुन्हा सांगण्याचा आनंदही घेता येईल. त्यात एक किंवा दोन अक्षरे जोडून तो अधिक जटिल आवाज काढू शकतो.

तुम्ही तुमच्या बाळाच्या संवादाच्या प्रयत्नांना जितका जास्त प्रतिसाद द्याल तितका तो शिकेल. म्हणून त्याला बोलून किंवा शारीरिक संकेतांद्वारे पुरेसा अभिप्राय द्या. तुमचे डोके हलवणे, तुमचे बाळ ज्या गोष्टी पाहत आहे त्याकडे निर्देश करणे, त्यांना नाव देणे आणि बोलण्याला प्रतिसाद देणे इत्यादी सर्व गोष्टी त्याच्या भाषेचे कौशल्य विकसित करण्यास मदत करतील.आता तुमचे बाळ सहा महिन्यांचे झाले आहे, तो कदाचित तुम्हाला असे संकेत देत असेल की तो घन आहार सुरू करण्यास तयार आहे. बाळ डोके वर करू शकत असेल, आधार घेऊन चांगले बसू शकत असेल, जिभेने अन्न तोंडात मागे हलवून आणि गिळत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला हळू हळू घन आहार देण्यास सुरुवात करू शकता.  जर तुमच्या बाळाला 26 आठवड्यांनंतरही घन पदार्थ आवडत नसतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. काळजी करू नका, या टप्प्यावर तुमच्या बाळाला आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्कमधून आवश्यक पोषण मिळेल.

अधिक वाचा – 6 महिन्याच्या बाळाचा आहार 

ADVERTISEMENT

बाळाच्या वाढीचे टप्पे 7 ते 9 महिने – Baby Development: Seven to Nine Months 

बाळाच्या वाढीचे टप्पे । Balachi Vadh Kashi Hote
बाळाच्या वाढीचे टप्पे

बाळ सात महिन्यांचे झाल्यावर –

सात महिन्याचे झाल्यावर तुमचे बाळ आता त्याचे हात वापरण्यास शिकेल. हे कौशल्य त्याला खाण्यासाठी उपयुक्त ठरेल, कारण तो आता दोन हातांचा कप स्वतः धरून पाणी व दूध प्यायला शिकेल.तो लवकरच टाळ्या वाजवायला शिकेल. या महिन्यात तुमच्या बाळाच्या तोंडांतून भरपूर लाळ गळू शकेल कारण या वयात अनेक बाळांचे पहिले दात फुटू लागतात. बाळाला दात येतात तेव्हा त्याला त्रास होऊ शकतो. जर तुमचे बाळ तुम्हाला किंवा खुर्चीला धरून उभे असेल, तर तो त्याचे काही वजन त्याच्या पायावर टाकू शकतो.  तुमचे बाळ आता आधाराशिवाय बसू शकते. अशा प्रकारे त्याचे हात नवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि खेळण्यांपर्यंत पोहोचण्यास मोकळे होतील. हाताचा आधार घेऊन पोटावर झोपूनही तो स्वतः उठून बसू शकतो. तुमचे बाळ हात आणि बोटांनी वस्तू पकडणे, हलवणे आणि वळवणे यात हळूहळू तरबेज होईल. या सर्वांना फाइन मोटर स्किल्स म्हणतात. फाईन मोटर स्किल्स म्हणजे अंगठा आणि बोटाने वस्तू उचलणे किंवा काहीतरी चाखणे किंवा अनुभवणे यासारख्या छोट्या क्रियांसाठी ओठ आणि जीभ यांचा वापर करणे.

या वयात तुमचे बाळ दोन्ही बाजूंनी हँडलसह सिप्पी कप पकडून पाणी व दूध पिण्यास सुरुवात करू शकते.तरीही त्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल. आता तुम्ही तुमच्या बाळाला सिपरमधून प्यायला शिकवू शकता. तुमचे बाळ सहजपणे एका हाताने खेळणी धरून ती दुसर्‍या हातात हस्तांतरित करू शकेल. ते आता दोन्ही हात एकत्र करून टाळ्या वाजवू शकेल.  बहुतेक बाळांना सहा महिन्यांच्या आसपास दात येणे सुरू होते. तथापि, दात येण्याची प्रक्रिया तीन ते चार महिने किंवा 12 महिने किंवा त्याहून अधिक वयापर्यंत सुरू राहूशकते. तुमच्या बाळाला नवीन दातांची येत असल्याने खूप लाळ येऊ शकते. बाळ आठ महिन्यांचे झाल्यावर बाळासाठी नवीन गोष्टी शोधण्याचे आणि पाहण्याचे वेगळे जग सुरू होते. अनेक मुलं या वयात गुडघ्यावर रांगायला शिकतात. लहान मुले चालायला लागल्यावर अनेकदा अडखळतात आणि पडतात. तुमच्या बाळाला सुरक्षितपणे घरात फिरता येण्यासाठी, तुम्हाला त्याच्यासाठी धोकादायक असलेल्या सर्व गोष्टी काढून टाकाव्या लागतील.तुमचे बाळ नवीन लोकांसमोर लाजू शकते किंवा कुटुंबातील सदस्य किंवा बेबीसिटर सोबत सोडल्यावर रडू शकते. सेपरेशन एन्झायटीची ही सुरुवात आहे. लवकरच बाळाला समजेल की जरी तुम्ही त्याला कुणा दुसऱ्या व्यक्तीबरोबर सोडले तरी तुम्ही त्याला परत भेटाल.

अधिक वाचा – 7 महिन्याच्या बाळाचा आहार

बाळ आठ महिन्यांचे झाल्यावर –

बाळ आठ महिन्यांचे झाल्यावर गुडघ्यावर आरामात रांगते किंवा पोटाची मदत घेऊन सरकते (कमांडो क्रॉलिंग).  तुमचे बाळ फर्निचरला धरून स्वतःहून उभे राहण्याचा प्रयत्न करू शकते. जर तुम्ही तुमच्या बाळाला फर्निचरजवळ उभे केले तर तो कदाचित त्याचा वापर करून उभे राहण्याचा प्रयत्न करेल. या काळात तुम्हाला बाळाच्या मागे राहावे लागेल जेणेकरून ते पडणार नाही. हालचाल करण्याच्या या नवीन क्षमतेचा अर्थ असा आहे की तुमचे बाळ आता अधिक वेळा पडेल. पण हे सर्व बालपणाचा अविभाज्य भाग आहे. तुमच्या बाळाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी पाहू आणि समजून घेऊ द्या आणि त्याचा आनंद घेण्याचाही प्रयत्न करा. यामुळे बाळाची शारीरिक कौशल्ये विकसित होतात.

ADVERTISEMENT

या वयात बाळ हात आणि बोटे उघडण्याचे नियंत्रण देखील शिकते. ते त्यांच्या हातात गोष्टी धरून ठेवू शकतात किंवा फेकून देऊ शकतात, आणि त्याला त्यात खूप मजा येईल. तुमच्या बाळाला पडलेल्या गोष्टी पाहून खूप आनंद होईल आणि तो आपल्या तर्जनीने त्याकडे निर्देश करेल. या काळात तुमचे बाळ भावना समजून घेणे आणि त्यांचे अनुकरण करण्यास शिकत आहे. तो प्रथमच सहानुभूतीची भावना देखील दर्शवू शकतो. उदाहरणार्थ, जर त्याने दुसरे मूल रडताना पाहिले तर तो स्वतः रडतो.

बाळ नऊ महिन्यांचे झाल्यावर –

बाळ नऊ महिन्यांचे झाल्यावर तुमच्या बाळाला बॉक्स किंवा डब्यातून खेळणी किंवा इतर वस्तू बाहेर काढणे आणि ते पुन्हा भरणे आवडेल किंवा सुव्यवस्थित पद्धतीने कप किंवा ब्लॉक्स  एकमेकांच्या वर ठेवण्यास मजा येईल. आता बाळाचा नवीन गोष्टींचा शोध यापुढे खेळण्यांपुरता मर्यादित राहणार नाही आणि बाळ “नाही” हा शब्द अधिक वेळा वापरताना दिसेल. तुमच्या बाळाला तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या आवाजाच्या टोनबद्दल अधिक समजू शकते.आता तुमचे बाळ लवकरच चालणे सुरू करेल, जरी बहुतेक बाळे एक वर्षाचे होईपर्यंत चालणे सुरू करत नाहीत. तुम्हाला दिसेल की तुमचे बाळ सरळ उभे राहून, फर्निचरला धरून चालायला लागेल.

काही नऊ महिन्यांची बाळे काही पावलेही चालू शकतात. जर तुमच्या बाळानेही असे केले तर त्याला तुमच्या पाठिंब्याची गरज असेल. तुमचे बाळ गुडघे वाकणे आणि उभे राहिल्यानंतर उठून बसणे देखील शिकत आहे. पण त्यावर प्रभुत्व मिळवणे वाटते तितके सोपे नाही. बाळ इतके मोठे झाल्यावर तुमचे घर चाइल्डप्रूफिंग करणे आता आवश्यक आहे. मोडण्यायोग्य किंवा मौल्यवान वस्तू असो, त्या बाळाच्या आवाक्याबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवायला हव्यात. घरातील स्वच्छता उत्पादने अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचे बाळ पोहोचू शकत नाही. काही गोष्टी त्याच्यासाठी नसतात हे तुमच्या बाळाला अजून समजत नसेल, त्यामुळे ज्या गोष्टींकडे तो आकर्षित होऊ शकतो अशा मोहक गोष्टी त्याच्या नजरेतून दूर ठेवणे चांगले.

अधिक वाचा – 9 महिन्याच्या बाळाचा आहार 

ADVERTISEMENT

बाळाच्या वाढीचे टप्पे 10 ते 12 महिने – Baby Development: 10 to 12 Months 

बाळाच्या वाढीचे टप्पे । Balachi Vadh Kashi Hote
बाळाच्या वाढीचे टप्पे

दहा महिन्यांचे झाल्यावर तुमचे बाळ आता सोप्या सूचना समजून घेण्यास सक्षम असेल आणि तुमच्या “नाही” म्हणण्याचा अर्थ काय ते समजेल. पण याचा अर्थ असा नाही की, तुमचे बाळ तुम्ही जे सांगाल तेच करेल! “नाही” हा शब्द फक्त तेव्हाच वापरण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुमचे बाळ असे काही करत असेल ज्यामुळे त्याला धोका पोहोचेल. 

या वयात चमकदार आणि गडद रंगांची पुस्तके तुमच्या बाळाचे लक्ष वेधून घेतील. तुमचे बाळ आता त्याच्या पहिल्या वाढदिवसापासून फक्त एक-दोन महिने दूर आहे, तो आता असहाय्य नवजात नाही. जरी त्याला तुमच्या काळजीची आणि समर्थनाची खूप गरज आहे, परंतु आता तो हळूहळू स्वतंत्र होत आहे. तो उभे राहणे, खाली वाकणे आणि बसणे शिकत आहे. तो कदाचित तुमचा हात धरून चालायला सुरुवात करेल. जर तुमच्या बाळाने अजून चालायला सुरुवात केली नसेल, तर तो लवकरच चालेल. तुमचे बाळ जसजसे जास्त फिरू लागते, तसतसे त्याला गोंगाटात जास्त रस येऊ शकतो. बाळाशी संभाषणे आता अधिक दुतर्फा होत आहेत. त्याचे नाक कुठे आहे असे तुम्ही त्याला विचारल्यास, तो कदाचित ते दाखवू शकेल. तुमच्या बाळाची समज जसजशी वाढत जाईल, तसतसे तुम्ही तिला अधिक शब्द शिकवण्यास सुरुवात करू शकता.  तुम्ही तुमच्या बाळाला त्याची खेळणी योग्य ठिकाणी ठेवण्यास मदत करण्यासाठी त्याचे मन वळवू शकता.कदाचित एक वर्षापर्यंत, बाळाच्या खेळण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. तुमचे बाळ आता वस्तू उचलू शकते आणि लहान वस्तू घेऊन फिरू शकते, त्यामुळे त्याला आणखी काही चपळ खेळ खेळायचे असतील जे त्याचे हात आणि पाय मजबूत करतात. तुमचे बाळ अजूनही काही मिनिटांसाठी शांत क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकते, परंतु त्याचे आवडते खेळ नेहमीपेक्षा जास्त गोंगाट करणारे असतील.

वस्तू ढकलणे, फेकणे आणि टाकणे किती मजेदार आहे हे तुमच्या मुलाला कदाचित समजले असेल. त्याला बॉक्स किंवा रिसेप्टॅकलमध्ये ब्लॉक्स ठेवणे आणि नंतर ते बाहेर काढणे यासारखे खेळ आवडू शकतात. त्याला भांड्यांसह असे खेळ खेळायलाही आवडेल. तो लहान भांडे मोठ्या भांड्यात ठेवू शकतो आणि भांडी एकमेकांवर आदळल्यावर त्यातून येणार्‍या मोठ्या आवाजाने तो आनंदी होईल. 

बाळाच्या पहिल्या वर्षातील शेवटचा विकास टप्पा हा एक संक्रमणाचा असतो. या विकासाच्या अवस्थेतील बाळांना “पिन्सर ग्रॅप” मध्ये प्रभुत्व मिळते. म्हणजे ते त्यांच्या अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये ओ-आकाराच्या लहान वस्तू धरू शकतात.या वयात बाळे एक दोन शब्द बोलायला शिकतात. आणि “मामा” ,काका, बाबा आणि “दादा” असे शान बाळ बोलेल आणि तुम्हाला हाक मारेल. पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळ सरासरी तीन शब्द बोलते. तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना पाहिजे असलेल्या वस्तूंकडे लक्ष द्या.या वयात बाळ चालू लागते, बाळाला दात येऊ लागतात, बाळ थोडे थोडे बोलू लागते, खेळू लागते, व्यक्त होऊ लागते. या वयात बाळाची वाढ व विकास अगदी झपाट्याने होत असतो. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – 1 वर्षाच्या बाळाचा आहार

बाळाच्या विकासाविषयी डॉक्टरांशी केव्हा बोलावे – Your Baby’s Development & Pediatrician Advice

तुमचे बाळ वाढ किंवा विकासाचे टप्पे पूर्ण करत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी आपण पालक म्हणून काय करावे, आपले कुठे चुकतेय असे प्रश्न मनात येणे अगदी साहजिक आहे. पण टेन्शन घेऊ नका. आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. आई-वडिलांना आपल्या बाळाला काही त्रास किंवा समस्या असेल तर त्याविषयी नक्कीच काही चिन्हे ,लक्षणे किंवा संकेत दिसतात. तुम्हाला खरोखर काहीतरी चुकीचे वाटत असेल तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला कारण जर काही समस्या असेल तर ती लवकरात लवकर लक्षात येणे महत्वाचे आहे. लक्षात घ्या की प्रत्येक मूल वेगळे असते. एका मुलाने जर तिसऱ्या महिन्यात पालथे पडायला सुरुवात केली तर तुमचेही मूल त्याच वेळी तो टप्पा गाठेल असे जरुरी नाही. एखादे मूल  जर आठव्या महिन्यात रांगायला लागले तर एखादे मुल नवव्या महिन्यात धरून चालायला देखील लागते. जोवर तुमचे बाळ निरोगी आहे, ऍक्टिव्ह आहे आणि आवाजाला, तुमच्या बोलण्याला प्रतिसाद देते आहे, तोवर काळजी करण्याचे कारण नाही. तो त्याच्या त्याच्या वेळेला नक्की विकासाचे टप्पे गाठेल. 

लक्षात ठेवा की तुमचे बाळ जेव्हा स्वतःहून उठून बसते किंवा त्यांचे पहिले शब्द बोलते तेव्हा ते महत्त्वाचे नसते; ते त्यांच्या विकासात पुढे जात आहे हेच महत्वाचे आहे. तुमचे मूल बदलत आहे आणि वाढत आहे हे महत्वाचे आहे. बाळाने पटापट विकासाचे टप्पे गाठणे ही शर्यत नाही. तो एक प्रवास आहे. तरीही तुमच्या मनात जर बाळाच्या वाढीविषयी शंका असेल तर तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी बोला. तसेच जर बाळ ऍक्टिव्ह राहत नसेल आणि प्रतिसाद देत नसेल तरीही त्याच्या डॉक्टरांशी बोला. 

अधिक वाचा – दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

ADVERTISEMENT

बाळाच्या वाढीविषयी पडणारे सामान्य प्रश्न – FAQ

प्रश्न – बाळाच्या वाढीच्या तक्त्यानुसार त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. मी काय करू?

उत्तर– आपल्या बाळाचा विकास योग्य प्रकारे होत नाही हा विचार खूप चिंताजनक असू शकतो. अनावश्यक काळजी टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाच्या वाढीचा तक्ता बरोबर वाचत असल्याची खात्री करा.

बाळांच्या विकासाची सामान्य श्रेणी खूप विस्तृत आहे. चार्टमध्ये सामान्य वजन 0.4 आणि 99.6 सेंटाइल रेषा दरम्यान असते. तुमचे बाळ कमी टक्केवारीत असू शकते परंतु तरीही त्याचा विकास चांगला होत आहे.बाळाचे वजन अनियमितपणे वाढणे सामान्य आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्याला विकासाशी संबंधित समस्या आहेत. लहान मुले अनेकदा असमान वाढतात, त्यामुळे त्यांनी चार्टवर कमी टक्केवारी गाठली किंवा उच्च टक्केवारी गाठली तरी काळजी करू नका.

प्रश्न – मला सांगण्यात आले आहे की माझ्या बाळाची वाढ मंद आहे. माझं काही चुकतयं का?

ADVERTISEMENT

उत्तर- बाळाचा विकास नीट होत नाही असे जेव्हा तुम्हाला सांगितले जाते तेव्हा तुम्ही काळजीत पडणे सामान्य आहे. पण लक्षात ठेवा की तुमच्या बाळाची वाढ मंद असली तरीही तुमच्या बाळाला आरोग्य समस्या असण्याची शक्यता फारच कमी आहे. बाळाच्या मंद वाढीची अनेक कारणे असू शकतात आणि त्यांचा अर्थ असा नाही की बाळ आजारी आहे. त्याला काही समस्या असू शकतात. तुमच्या बाळाच्या मंद वाढीचे कारण डॉक्टरांच्या लक्षात येत नसल्यास, ते बाळाच्या काही चाचण्या करण्याचा सल्ला देतात. या चाचण्यांमुळे बाळाला विशिष्ट आरोग्य समस्या आहेत की नाही हे कळू शकते. 

प्रश्न – 0 ते 12 महिन्यांच्या बालकांचा सामाजिक विकास दर्शविणारे मार्ग कोणते आहेत?

उत्तर – लहान मुले आनंद, राग, स्वारस्य, भीती, तिरस्कार आणि आश्चर्य यासारख्या भावनांची चिन्हे चेहर्‍यावरचे वेगळे भाव दर्शवून व्यक्त करतात. लहान मुले देखील कोणतेही स्पष्ट कारण नसताना मोठ्याने हसण्यास सुरवात करतात. लहान मुले बडबड करून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना स्वारस्य आहे अशा व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. 

प्रश्न – लहान मुलांच्या विकासाचा सर्वात महत्वाचा टप्पा कोणता आहे?

ADVERTISEMENT

उत्तर – अलीकडे मेंदूवर झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की जन्माला आल्यापासून ते पहिली तीन वर्षे ही मुलाच्या विकासातील सर्वात महत्त्वाची वर्षे असतात. याच काळात मुलांच्या मेंदूची वाढ होते. 

प्रश्न – लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी काय महत्वाचे आहे?

उत्तर – लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी योग्य पोषण, व्यायाम आणि झोप याबरोबरच सुरक्षित आणि प्रेमळ घर असणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, खेळणे, गाणे, वाचणे आणि बोलणे देखील खूप महत्वाचे आहे. 

Conclusion – 

ADVERTISEMENT

असहाय्य नवजात बालक ते सक्रिय बालक हा प्रवास बाळ पहिल्या बारा महिन्यांत पूर्ण करते. हे अतुलनीय परिवर्तन होण्यासाठी बाळाला फक्त 12 लहान महिने लागतात. बाळे आश्चर्यकारक वेगाने वाढतात व बदलतात आणि प्रत्येक महिन्यात नवीन आणि रोमांचक घडामोडी घडतात. प्रत्येक बाळाच्या आईबाबांना आपल्या बाळाच्या वाढीचे टप्पे बरोबर पडत आहेत ना ही चिंता असते. आई-वडिलांना अनेकदा प्रश्न पडतो की पुढे काय अपेक्षित आहे आणि बाळाची वाढ कशी होते ((Balachi Vadh Kashi Hote). त्यांच्या बाळाचा विकास बरोबर होतो आहे की नाही यावर प्रत्येक जागरूक पालकाचे लक्ष असते. परंतु विकासात्मक टप्पे यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याऐवजी, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सर्व मुले त्यांच्या स्वत:च्या गतीने विकसित होतात. त्यामुळे जर तुमचे बाळ ऍक्टिव्ह असेल, निरोगी असेल आणि तुम्हाला प्रतिसाद देत असेल तर काळजी करण्याची कारण नाही. पण तरीही सर्व आईबाबांप्रमाणे तुमच्या मनात काही शंका असल्यास तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी चर्चा करा. 

Photo Credit – istockphoto

अधिक वाचा – बेबी डायपर वापराचे फायदे आणि नुकसान 

25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT