Skin Care Products

तुमच्या नाईट स्किन केअर रूटिनमध्ये असायलाच हवे हे ब्युटी प्रॉडक्ट

Trupti Paradkar  |  Sep 24, 2020
तुमच्या नाईट स्किन केअर रूटिनमध्ये असायलाच हवे हे ब्युटी प्रॉडक्ट

 

प्रत्येकाच्या शरीराला कमीत कमी सात ते आठ तासांची शांत झोप हवी असते. या झोपेला आपण ‘ब्युटी स्लीप’ असंही म्हणतो. ज्यामुळे तुमची सकाळ अगदी फ्रेश आणि सुंदर होते. मात्र अनेकजण ही ब्युटी स्लीप न घेता रात्री उशीरापर्यंत नेटफ्लिक्स अथवा इंटरनेटवर वेळ घालवतात. ज्यामुळे झोपायला उशीर होतो आणि सकाळी चेहऱ्यावर याचे परिणाम दिसू लागतात. रात्री चांगली झोप न मिळाल्यामुळे आरोग्य तर बिघडतंच शिवाय तुम्हाला डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, पफी आईज या त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच शांत झोप तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकते. कारण तुम्ही जेव्हा शांत झोपता तेव्हा तुमच्या त्वचेत पुरेशा कोलेजीनची निर्मिती होते. ज्यामुळे तुमची त्वचा सैल न पडता लवचिक राहते. त्वचा सैल पडल्यामुळे चेहऱ्यावर एजिंगच्या खुणाही वयाआधीच दिसू लागतात. झोप पूर्ण झाल्यामुळे तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते ज्यामुळे त्वचेवर सकाळी टवटवीतपणा आणि नैसर्गिक ग्लो येतो. यासाठीच छान झोप लागण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची योग्य निगा राखणंही गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचेला आराम मिळेल आणि तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल.

या प्रॉडक्टमुळे तुम्हाला मिळेल शांत झोप आणि त्वचा होईल फ्रेश –

 

दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीन फॉलो केलं तर त्याचा त्वचेवर चांगला परिणाम दिसून येईल. यासाठी हे प्रॉडक्ट तुमच्या नाईट स्किन केअर रूटिनमध्ये अवश्य ठेवा. 

हायड्रेटिंग नाईट टाईम फेस सीरमचा वापर अवश्य करा –

 

त्वचेला दिवसभर जशी पोषणाची गरज असते तशीच रात्रीही असते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा आणि या नाईट फेस सीरमचा वापर करा. Estee Lauder’s चं अॅडवान्स नाईट रिपेअर फेस सीरम रात्रभर तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवतं. यात असलेला हायलुरॉनिक अॅसिड हा महत्त्वाचा घटक तुमच्या  त्वचेला पाण्यापेक्षा हजारपट जास्त मऊपणा देतो. रात्रभर ते तुमच्या त्वचेवर सक्रिय राहतं आणि तरूणपणीच येणाऱ्या एजिंगच्या खुणा रोखून ठेवतं. ज्यामुळे तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला मऊ, एकसमान टोन असलेली आणि टवटवीत त्वचा मिळते.

ग्रीन टी त्वचेवर करेल अशी जादू

ग्रीन टीचा त्वचेवर खूप चांगला परिणाम होतो. कारण यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि मऊ होते. ग्रीन टी पिण्यामुळे तुम्हाला अगदी शांत आणि निवांत झोप लागते. ग्रीन टीच्या अॅरोमामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो. ग्रीन टीमध्ये थोड्याप्रमाणात कॅफेन असल्यामुळे तुम्ही ती झोपण्यापूर्वी नाही पिऊ शकत. मात्र संध्याकाळी अथवा झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी ग्रीन टी घेतल्यामुळे चांगला फायदा होतो. 

फेस शीट मास्कने व्हा रिलॅक्स –

फेस शीट मास्क लावण्यामुळे तुमची त्वचा तर चमकदार होतेच शिवाय तुम्हाला फ्रेशदेखील वाटतं. फेस शीट मास्कमध्येही त्वचेला पोषण देणारे सीरम असतात. रात्री झोपताना फेस शीट मास्क वापरल्यामुळे रात्रभर ते त्वचेत खोलवर मुरतात. मायग्लॅम्सच्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये अनेक शीट मास्क उपलब्ध आहेत. मात्र त्यातील ग्लो इरिडिसेंट ब्राईटनिंग शीट मास्क तुम्ही ट्राय करायलाच हवं असं आहे. यामुळे फक्त वीस मिनिटांमध्ये तुम्हाला चमकदार त्वचा आणि मऊपणा मिळू शकतो. 

आय क्रिम आणि नाईट क्रिम अवश्य वापरा –

 

झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली आय क्रिम लावण्यामुळे डोळ्यांना चांगला आराम मिळतो. यामुळे सकाळी तुम्हाला खूप ताजेतवानं वाटू शकतं. आपल्या डोळ्यांच्या जवळची त्वचा ही चेहऱ्याच्या इतर त्वचेपेक्षा खूप नाजूक असते. त्यामुळे या त्वचेची काळजी घेण्यासाठी आय क्रिमची खास निर्मिती केली जाते. वाढत्या वयानुसार नाईट स्किन केअर रूटीनमध्ये आपण याचा समावेश नक्कीच करायला हवा. नाईट क्रिमचे फायदे अनेक आहेत. आय क्रिमप्रमाणेच त्वचेच्या इतर भागांची काळजी घेण्यासाठी नाईट क्रिमचा वापर करावा. 

पिलो मिस्ट झोपण्यापूर्वी उशीजवळच ठेवा –

झोपण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला या पिलो मिस्टचा नक्कीच चांगला फायदा होईल. कारण यामुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरण सुंगधित आणि फ्रेश होईल. अनेकांना या मिस्टमुळे रात्री शांत झोप लागते असा अनुभव आलेला आहे. बाथ अॅंड बॉडीचे हे मिस्ट एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्ही तुमच्या बेड आणि पिलोजवळ ते स्प्रे करू शकता. यामुळे तुम्हाला पावसामुळे पांघरूणाला येणारा कुबटपणा कमी करणं  देखील सोपे जाईल.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

फेस सीरम आणि मॉईस्चराईझर यात काय आहे फरक (Facial Serum Vs Face Moisturizer)

मस्कारा लावताना होतोय त्रास, तर खास सोप्या हॅक्स

Read More From Skin Care Products