बिग बॉस

Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप

Leenal Gawade  |  Oct 26, 2020
Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप

हिंदीतील नवा रिअॅलिटी शो Bigg Boss आता अधिक रोमांचक बनत चालला आहे. या घरात साधारण तीन आठवडे घालवल्यानंतर आता अनेकांचे खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. अनेकांची मैत्री या दरम्यान तुटली तर अनेकांना नव्या व्यक्तिची साथ ही मिळाली आहे. पण आता या घरात एक नवाच मुद्दा समोर आला आहे हा मुद्दा आहे ‘नेपोटिझमचा’. या स्पर्धेमध्ये असलेला आणखी एक स्पर्धक, गायक आणि कुमार सानू यांचा मुलगा जान सानू याला नॉमिनेट करताना राहुल वैद्यने नेपोटिझमचा मुद्दा उचलला आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यापासूनच यावर अनेक प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. अनेकांनी राहुलविरोधात एक मोहीमच सोशल मीडियावर सुरु केल्याचे दिसत आहे. 

अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा बनली आई, फोटो व्हायरल

काय म्हणाला राहुल?

 बिग बॉसमध्ये देण्यात आलेल्या एका टास्क दरम्यान राहुलने जान सानूला नॉमिनेट करताना राहुलने जान सानूचे नाव घेऊन सांगितले की, जान सानू हा स्वत:च्या ओळखीने आला नाही तर तो  कुमार सानू यांच्या ओळखीमुळे आला आहेत. त्याची स्वत:ची अशी ओळख नाही. त्यामुळे तो या घरात राहण्यास पात्र नाही असे वक्तव्य राहुलने काढले. शिवाय राहुलने नेपोटिझम हा शब्द वापरला. त्याने हा शब्द वापरल्यानंतर  अनेकांनी त्याच्यावर हल्लाबोल केला.  या खेळासाठी त्याने हा शब्द वापरायला नको होता, असे अनेकांना वाटले. त्यामुळे राहुलला अनेकांनी या शब्दासाठी नॉमिनेट केले. 

गुडन्यूज: दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या घरी आला नवा पाहुणा

राहुलवर चिडली जानची आई

जानच्या आईची नेपोटिझमवर मुलाखत घेतल्यानंतर तिने राहुलच्या या बोलण्यावर दु:ख व्यक्त केले आहेत. शिवाय राहुलने असे बोलून गाण्याचा अपमान केल्याचे म्हटले आहे. घरात गायनचा झालेला टास्क जान त्याच्या आवाजामुळे जिंकला होता. त्यामुळे त्याच्यामध्ये टॅलेंट आहे याचा विसर राहुलला कसा पडू शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे. पुढे त्यांनी हे देखील सांगितले की, राहुलच्या तुलनेत माझी दोन्ही मुलं चांगली गातात. या शोमध्ये जाण्यासाठी कुमार सानू यांनी विरोध केला होता. पण आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्याने हा रिअॅलिटी शो करायचे ठरवले होते. राहुलने नेपोटिझम हा शब्द त्यासाठी वापरणे फारच चुकीचे होते, असे मत रिता सानू यांनी व्यक्त केले.

तुम्हालाही नक्कीच आवडेल अंकिता लोखंडेचं हे साडी कलेक्शन

कविता कौशिक झाली घराची कॅप्टन

Instagram

या आठवड्यात कविता कौशिक, नयना सिंह आणि शार्दुल पंडित हे तीन कलाकार स्पर्धक म्हणून आले आहेत. नवे फ्रेशर्स म्हणून त्यांची या कार्यक्रमात एंट्री झाली आहे. निशांतला कॅप्टन या पदावरुन काढल्यामुळे कविता कौशिककडे घराच्या कॅप्टन पदाची धुरा दिली आहे. घरात आल्यापासून आणि कॅप्टन झाल्यापासून कवितालाही अनेकांनी टार्गेट केले आहे. कविता एजाजची मैत्रीण असल्यामुळे रेड झोनमधून तिने एजाजला बाहेर काढले आहे. तर आता रेड झोनमध्ये राहुल, निकी, जान, पवित्रा यांना पाठवण्यात आले आहे. आता या चारपैकी घरातून कोण बाहेर जाणार? हे आता पुढच्या आठवड्यात कळेलच. पण निकी आणि राहुल यांची टिम  झाल्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल की, राहुलने वापरलेला हा शब्द फार महागात पडेल हे आता पुढच्या रविवारीच कळेल. 

पण सध्या तरी घरात नेपोटिझम वादामुळे राहुल अनेकांच्या हिट लिस्टवर आला आहे हे नक्की!

Read More From बिग बॉस