दिवसेंदिवस Bigg Boss रोमांचक वळणावर येऊ लागले आहे. या आठवड्यात घरातून नैना सिंह बाहेर पडल्यानंतर आता घरात पुन्हा एकदा टास्कची लगबग सुरु झाली आहे. पण एका व्हिडिओ प्रोमोनंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण या व्हिडिओमध्ये राहुल वैद्य चक्क कोणाला तरी प्रपोझ करताना दिसत आहे. Bigg Boss14 सुरु होताना राहुल वैद्यने त्याच्या रिलेशनशीपबद्दल काहीच सांगितले नव्हते. पण आता त्याच्या या नव्या गोष्टीमुळे राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुल वैद्यने जिला प्रपोझ केले आहे ती टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून सगळीकडे या दोघांचीच चर्चा होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि राहुल वैद्यने कशापद्धतीने प्रपोझ केले आहे ते जाणून घेऊया.
Bigg Boss 14: कविता कौशिकची पुन्हा एकदा एंट्री, राहुलला मिळाला प्रेक्षकांचा पाठिंबा
लग्नासाठी राहुलने घातली मागणी
राहुलचे टीव्ही अभिनेत्री दिशा परमारवर प्रेम आहे. दिशा परमार ही अभिनेत्री असून दिशा परमारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याने तिला नॅशनल टेलिव्हिजन तिला प्रपोझ करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. राहुलने हातात अंगठी घेऊन गुडघ्यावर बसून दिशाला लग्नाची मागणी घातली आहे.त्याने यासाठी विशेष तयारी केली असून त्याने टी शर्टवर विल यू मॅरी मी? असे टी शर्टवर लिहिल आहे. अनेकांसाठी ही गोष्ट धक्कादायक होती.कारण या शोच्या सुरुवातीला राहुलने त्याच्या रिलेशनशीपबद्दल काहीच सांगितले नव्हते. तो प्रेमाच्या शोधात असल्याचे त्याने म्हटले होते. पण आता अचानक त्याने त्याच्या प्रेमाबद्दल नॅशनल टेलिव्हिजनवर सांगितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
राहुलचा व्हिडिओ झाला वायरल
राहुल वैद्य गेल्या काही आठवड्यांपासून Bigg Boss 14 मध्ये सतत चर्चेत आहे. टास्क असू दे किंवा भांडणं काहीही असेल तरी राहुलने त्याची अशी एक बाजू मांडून स्वत:ला नेहमीच वेगळे सिद्ध केले आहे. त्यामुळेच या खेळात राहुलला खूप वेळा घरातल्यांच्या बाहेरच्यांचा पाठिंबा मिळाला आहे. आता हा नवा व्हिडिओ अनेकांसाठी धक्कादायक असला तरी त्यांच्या अनेकांना फॅन्सना याचा आनंद झाला आहे. म्हणूनच राहुलचा हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे.
कोण आहे दिशा परमार?
दिशा परमार ही हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमधून काम केले असून स्टार प्लसवरील ‘प्यार का दर्द है मीठा मीठा’, ‘ वो अपनासा’ या मालिकांमधून लीड अभिनेत्रीचे काम केले आहे. या आधी राहुल वैद्य आणि दिशा परमारचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्यांचे रिलेशनशीप असेल असा अंदाज फार लोकांना नव्हता पण आता राहुलनेच नॅशनल टेलिव्हिजनवर जाहीर केल्यानंतर आता त्याचे रिलेशनशीप स्पष्ट झाले आहे.
अभिनेत्री इशिता दत्ताने उघड केलं बेबी बम्प दिसण्यामागचं गुपित
दिशाकडून अजून आले नाही कसलेही उत्तर
दिशाच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर अनेकांनी दिशा परमार कोण? आणि तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट शोधायला सुरुवात केली आहे. आता दिशा राहुलच्या प्रश्नाचे नेमके काय उत्तर देणार आहे याची अनेकांना प्रतिक्षा आहे.
राहुलचा हा एपिसोड अद्याप टेलिकास्ट झाला नसला तरी याची उत्सुकता अनेकांना आहे.
#Metoo नंतर आता तनुश्री दत्ताचे पुनरागमन, 15 किलो वजन केले कमी