मनोरंजन

राहुल वैद्यच्या संगीतची जोरदार तयारी सुरु, व्हिडिओ झाला व्हायरल

Leenal Gawade  |  Jul 11, 2021
राहुल वैद्यच्या संगीतची जोरदार तयारी सुरु, व्हिडिओ झाला व्हायरल

 गायक आणि बिग बॉस फेम राहुल वैद्य लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने बिग बॉसमध्ये असताना अभिनेत्री दिशा परमार हिला रोमँटिक पद्धतीने प्रपोझ केलं होतं. आता त्याच्या लग्नाची तारीखही समोर आली असून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.  लग्नात संगीतचा कार्यक्रम देखील असणार आहे. या संगीत कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. कारण राहुलचे काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. संगीतची ही जोरदार तयारी पाहून प्रेक्षकांमध्ये विशेषत: त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, राहुल याचे लग्न येत्या 16 जुलै रोजी पार पडणार आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार करणार 16 जुलैला लग्न

बँड, बाजा, बरात

राहुलने प्रपोझ करुन मनातील भावना व्यक्त केल्या होत्या खऱ्या. पण आता त्याला मूर्त रुप देण्यासाठी त्याने लग्नाची तारीखही सांगून टाकली आहे. त्यांच्या लग्नाची तयारी दोन्ही कुटुंबात सुरु झाली आहे. राहुलच्या घरात पै- पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या लग्नात संगीताचा कार्यक्रमही होणार आहे त्यामुळे याची जोरदार प्रॅक्टिसही सुरु आहे. राहुल हा एक  उत्तम सादरीकरण करणारा आहे त्यामुळे त्याने अगदी पटपट सगळं काही शिकलेले या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.  राहुलला या आधीही अनेक डान्स व्हिडिओजमध्ये परफॉर्म करताना खूप जणांनी पाहिलेले आहे. आता त्यांच्या रिहर्सलचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो आणि दिशा एकदम मनमोकळे नाचताना दिसत आहे. त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राहुल कोणत्या गाण्यावर नाचणार आहे हे अद्याप एक सिक्रेट आहे. पण खूप जणांनी गाण्याचाही अंदाज नक्कीच लावला असेल 

Bigg Boss 14: राहुल वैद्य आणि दिशा करणार या महिन्यान लग्न, आईने केला खुलासा

काऊंटडाऊन सुरु

राहुल- दिशा ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते. तो दिवस अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. राहुल आणि दिशा त्यांच्या सोशल अकाऊंटवर त्यांचे हे फोटो कायमच शेअर करताना दिसतात. त्यामुळे  त्यांच्या लग्नाची तारीख ही जवळ आली हे नक्कीच कळत आहे. आता राहुलच्या या लग्नाला कोण कोण उपस्थित असतील असा प्रश्न पडणे एकदम साहजिक आहे. राहुलचा मित्र अली आणि जास्मिन हे या लग्नात अगदी हमखास दिसणार पण या व्यतिरिक्त संगीत क्षेत्रातील अनेक मातब्बर व्यक्तीही नक्की दिसतील. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरातील काही सदस्यही त्याच्या लग्नात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये राखी सावंत, अर्शी खान, देवोलिना, विंदू दारासिंग असे काही लोकंही नक्कीच दिसतील. पण या शिवाय राहुलशी जिचे कधीही पटले नाही अशी रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला हा देखील या लग्नाला दिसण्याची शक्यता आहे. 

मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार

राहुलला मिळाली प्रसिद्धी

राहुलला इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमधून अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. पण आता त्यानंतर तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे तो म्हणजे बिग बॉसमुळे. राहुल वैद्य खरा कसा आहे ते सगळ्यांना या रिअॅलिटी शोमधून दिसूनच आले. त्यामुळे राहुलच्या चाहत्यांमध्ये लाखोंच्या घरात भर झाली. सध्या राहुल वैद्य हा एक सेलिब्रिटी चेहरा म्हणून फारच प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर त्याला खतरो कें खिलाडी या कार्यक्रमातही जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे राहुल हा आता चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. 

सध्या राहुलकडे लग्नाची लगबग सुरु आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष राहुलच्या लग्नाकडे लागून राहिले आहे.

Read More From मनोरंजन