मनोरंजन

राणू मंडल पुन्हा रस्त्यावर, चाहत्यांशी चुकीचं वागणं पडलं महागात

Trupti Paradkar  |  Mar 5, 2020
राणू मंडल पुन्हा रस्त्यावर, चाहत्यांशी चुकीचं वागणं पडलं महागात

एका रात्रीत प्रसिद्ध झालेल्या राणू मंडलवर पुन्हा रस्यावर गाण्याची वेळ आली आहे. बंगालच्या राणाघाटमधील एका रेल्वे स्टेशनवर गाणारी राणू अचानक स्टार झाली. ज्यामुळे राणूच्या गाण्याची आणि सेलिब्रेटी होण्याची चर्चा सगळीकडे सूरू झाली होती. मात्र यशाच्या शिखरावर असताना राणू मंडलच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरली आणि तिच्या यशस्वी करिअरला उतरती कळा लागली. अचानक स्टार झालेल्या राणूकडे सध्या कोणतंही काम नाही. ज्यामुळे तिला पुन्हा  पूर्वीचं जीवन जगावं लागत आहे. न झेपणारा हेव्ही मेकअप, चाहत्यांना न आवडेला तिचा लुक, पत्रकारांना दिलेली उद्धट उत्तरे, सेल्फी घेण्यासाठी दिलेला नकार यामुळे राणू मंडलवर हे दिवस पुन्हा आले आहेत.

Instagram

राणू मंडलवर का आली पूर्वीचे दिवस जगण्याची वेळ

काही महिन्यांपूर्वी राणू मंडलचा बंगालच्या रेल्वे स्थानकावर गात असलेला फोटो शेअर झाला आणि सोशल मीडियावर राणू रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या सुंदर आवाजातील या  व्हिडिओमुळे तिला थेट बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळाली. गायक हिमेश रेशमियाने तिला त्याच्या ‘हॅप्पी हार्डी अॅंड हीर’ या सिनेमासाठी प्ले बॅक सिंगर म्हणून संधी दिली. अचानक मिळालेल्या संधीमुळे राणूचे दिवस अचानक बदलले. या संधीचं सोनं करण्यासाठी गाण्यासोबत तिचं ग्रूमिंगही करण्यात आलं. राणूचं नशिब पालटलं आणि रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या राणूला बॉलीवूडची दारं उघडी झाली. मात्र हे अचानक मिळालेलं यश राणूला टिकवता आलं नाही. दैव देतं आणि कर्म नेतं अशी राणूची अवस्था झाली आहे. अचानक रंकाचा राजा झालेली ही सेलिब्रेटी पुन्हा तिचं पूर्वीचं जीवन जगत आहे. याचं कारण प्रसिद्धी मिळाल्यावर राणूने तिच्या चाहत्यांना दिलेली चुकीची वागणूक आहे. चाहते जसे एखाद्याला डोक्यावर घेतात तसं ते एखाद्याला पुन्हा जमिनीवर आदळूही शकतात हे राणूला माहीत नसावं. राणूच्या चाहत्यांनी तिच्याकडे पाठ फिरवल्यामुळेच तिच्यावर आता पुन्हा रस्त्यावर गाण्याची वेळ आली आहे. 

Instagram

राणूला टिकवता नाही आलं यश

राणूने ग्रूमिंग करण्यासाठी केलेला हेव्ही मेकअप चाहत्यांना मुळीच आवडला नव्हता. ज्यावरून राणू सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. तिच्यावर यासाठी अनेक मीम्सदेखील तयार करण्यात आले होते. याशिवाय राणूने पत्रकारांना उद्धटपणे उत्तरंही दिली होती. एकदा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राणूने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत  “तुम्ही मला काय बोलत आहात ते मला समजत नाही” असं उद्धटपणे उत्तर दिलं होतं. पुढे पुढे तर राणूचा हा उद्धटपणा अधिकच वाढू लागला होता. राणूने एका चाहतीला तर चक्क सेल्फी देण्यास नकार दिला होता. सेल्फी घेतल्याबद्दल ती तिच्यावर रागावलीदेखील होती. अशा मुजोर वागण्यामुळे चाहते राणूवर नाराज झाले आणि त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. आज या चुकीच्या वागणूकीमुळे राणूकडे एकही काम नाही ज्यामुळे तिला पु्न्हा रस्त्यावर गाण्याची वेळ आली आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

कोरोना व्हायरसची झळ बॉलीवूडलाही

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका, त्याचा परिणाम होतो वाईट – नीना गुप्ता

सैफ आणि अजयच्या वादावर काजोलने केला खुलासा

 

Read More From मनोरंजन