टीव्हीवरील सर्वात आवडती मालिका असणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दयाबेन ऊर्फ दिशा वाकानी काही महिन्यांपूर्वीच खऱ्या आयुष्यात आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा मालिकेत परत येणार हेदेखील सांगण्यात आलं. पण आता तारकमधील दुसऱ्या एका अभिनेत्रीलादेखील पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. तिने स्वतः आपल्या बाळाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. तारक मेहता या मालिकेतील रिपोर्टर रीटा असणारी अभिनेत्री प्रिया अहुजाने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिने ही बातमी आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरून शेअर केली असून तिला अनेक जण शुभेच्छा देत आहेत.
प्रिया अहुजा झाली आई, मुलाला दिला जन्म
प्रियाने आपण आई झाल्याचे इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत शेअर केले आहे. या फोटोमध्ये मुलाचे पाय दिसत आहेत. तर प्रियाने आपल्या मनातील काही हितगुजही आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहे. ‘आमचं घर दोन पायांनी वाढलं आहे. आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. आम्ही खूपच आनंदी आहोत. आमच्या मुलाचा जन्म 27 नोव्हेंबरला झाला असून ही गोष्ट सांगण्यास मला खूपच आनंद होत आहे.’ प्रियाने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. प्रियाने मालव राजदा यांच्याशी लग्न केलं असून तारक मेहता का उल्टा चष्माचे मालव हे दिग्दर्शक आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, दयाबेन येणार परत
ऑगस्ट महिन्यात आई होणार असल्याचं सांगितलं
प्रियाने याचवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या गरोदरपणाबद्दल सांगितलं होतं. तिने आपल्या पतीबरोबर काही स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर करत याविषयी माहिती दिली होती. यावेळी तिचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. त्याशिवाय तिने खास लिपलॉक करत ही गोड बातमी सांगितली होती. तसंच आपलं कुटुंब आता वाढणार असून चाहत्यांचंं प्रेम आणि आशिर्वाद हवं असल्याचंही तिने त्यावेळी नमूद केलं होतं. इतकंच नाही प्रियाने काही दिवसांपूर्वी प्रियाने आपले गरोदरपणातील फोटो पोस्ट करत हेदेखील म्हटलं की, ‘बाळाची वाट पाहणं हे एखाद्या एअरपोर्टवर येऊन कोणाची तरी वाट पाहण्यासारखं आहे. तुम्हाला माहीत नाह की कोण येणार आहे, कसं दिसणार आहे आणि कोणत्या वेळी फ्लाईट लँड होणार आहे’
दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका
प्रिया होती मालिकेचा महत्त्वाचा भाग
प्रिया अहुजादेखील या मालिकेतील महत्त्वाचा भाग आहे. तिची याच सेटवर दिग्दर्शक मालव राजदाबरोबर ओळख झाली आणि नंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांचं लग्न झालं. गेले कित्येक वर्ष प्रिया या मालिकेत रीटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. पण आता खऱ्या आयुष्यात आई झाल्यानंतर तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. दरम्यान प्रिया आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे याबद्दल जाणून असतात. आता लवकरच प्रिया तिच्या बाळाचा पूर्ण फोटो शेअर करणार का याकडे तिचे चाहते डोळे लावून बसले आहेत.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade