आपल्याकडे मुख्यत्वे भारतामध्ये लग्न जुळवताना माणसांची मनं जुळतात की नाही हे पाहण्याआधी पत्रिका जुळते की नाही ते पाहणं महत्त्वाचे मानले जाते. खरे तर ज्योतिषशास्त्र हादेखील अभ्यास आहे. काही बाबतीत पत्रिका जुळते की नाही हे पाहणे आवश्यक असते असे समजण्यात येते. त्याचा अभ्यास करून मगच मुलामुलीच्या आवडीला पसंती देण्यात येते. पण असं का केलं जातं त्याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत नेहमीच अनेक प्रश्न असतात. जन्मकुंडली नक्की का एकमेकांबरोबर जुळवल्या जातात असा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधीतरी मनात आलेला असतोच. बरेचसे लोक कुंडली मिलन करत नाहीत तरीही त्यांचा संसार चांगला चालतो मग कशासाठी कुंडली मिलन करायचं असाही प्रश्व विचारला जातो. पण ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार त्या व्यक्तींंचा संसार त्यांची कुंडली जुळल्यामुळेच चांगला होतो असं म्हटलं जातं. इतर अभ्यासाप्रमाणे यातही काही गणितं मांडलेली असतात. त्याचा विचार आणि अभ्यास करूनच कुंडलीचा अभ्यास करण्यात येतो आणि गुणमिलन होतं की नाही ते सांगण्यात येतं. त्यामुळे नक्की काय कारणं आहेत ते आपण जाणून घेऊया –
1. लग्न किती काळ टिकेल
दोन व्यक्तींचा स्वभाव आणि परिस्थिती सहसा कुंडलीवरून जाणून घेतली जाऊ शकते. त्यामुळे मुलगा आणि मुलीची कुंडली जर एकाच वेळी संकटं येणारी असेल तर नातं टिकत नाही असं म्हणतात. त्यावेळी एकाचे तरी ग्रह चांगले असावे लागतात. त्यामुळे लग्न किती काळ टिकेल हे पाहण्यासाठी कुंडली मिलन आहे की नाही ते पाहिलं जातं. लग्नानंतर पुरूष आणि स्त्री हे एकमेकांच्या साथीने राहणार असतात. त्यामुळे एकमेकांच्या व्यवहाराने दोघंजण संसार करत असतात. या दोघांचं एकमेकांशी पटेल की नाही हे पाहण्यासाठी पत्रिका पाहिली जाते. दोघांच्या ग्रहमानानुसार लग्न किती काळ टिकू शकतं याचा अंदाज येऊ शकतो असं म्हटलं जातं.
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती
2. नातं टिकून राहण्यासाठी
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये गुण आणि दोष असतात. लग्नाआधी ते पाहून घेतलेले अधिक चांगले. मंगळदोष अथवा अन्य काही दोष असल्यास, पत्रिकेनुसार पाहून पुढे नातं टिकेल की नाही याचा अंदाज घेतला जातो. मंगळ असलेल्या व्यक्ती या अति रागीट असल्याचं सहसा दिसून येतं. अशावेळी दोन्ही व्यक्तींना पुढे त्रास होऊ नये आणि नाते व्यवस्थित टिकून राहायला हवे यासाठी लग्न जुळण्याआधी पत्रिका जुळवली जाते. एकूण 36 गुणांपैकी साधारण 18 गुण जमणे गरजेचे आहे असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. यापेक्षा कमी गुण जुळत असल्यास, लग्न करणं योग्य नाही असंही म्हटलं जातं.
राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती
3. मानसिक आणि शारीरिक क्षमता
प्रत्येक माणसाची प्रकृती आणि स्वभाव हे दोन्ही वेगळे असतात. त्यामुळे लग्न होणाऱ्या दोन व्यक्तीचे स्वभाव आणि प्रकृती एकमेकांशी जुळतात की नाही हे पाहण्यासाठी पत्रिका बघितली जाते. दोनं मनं जुळणंही गरजेचं आहे. पण त्याचप्रमाणे त्यांची पत्रिका जुळणंही महत्त्वाचं असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानण्यात येतं.
4. कुटुंबाशी कसे राहील नाते
लग्न म्हणजे संपूर्ण कुटुंबाशी येणारा संबंध. आपण भारतात राहातो जिथे एकत्र कुटुंबपद्धती आहे. त्यामुळे केवळ एका व्यक्तीशी लग्न होत नाही तर संपूर्ण कुटुंबाशी पटवून घ्यावे लागते. त्यामुळे पत्रिकेवरून तुम्ही कुटुंबाशी कसे जमवून घ्याल. संतानप्राप्ती कशी होईल याचीही गणितं यातून कळू शकतात. एकंदरीतच या चार महत्त्वाच्या गोष्टींचं गुणमिलन होतं की नाही हे समजून घेण्यासाठी लग्नाआधी पत्रिका जुळवली जाते. त्याचं नक्की गणित काय असते ते बघूया.
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
नक्की कसे होते गुण मिलन
एकूण आठ गोष्टी असतात आणि याला वेगवेगळे गुण देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या पत्रिकेत ज्याप्रमाणे त्याचे गुण असतात त्यानुसार त्यांचे मिलन करण्यात येते. प्रत्येकाचे वर्ण, गण, नाडी, तारा या सर्व गोष्टी वेगळ्या असतात आणि गुणही वेगळे असतात. त्यानुसार ज्योतिषशास्त्र अभ्यास करून याचे गुणमिलन करतात. कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकूटचे मिलन करण्यात येते. ते गुण कसे असतात ते बघूया.
वर्ण – जातीचे मिलन – 1 गुण
वैश्य – आकर्षण – 2 गुण
तारा – अवधी – 3 गुण
योनी – स्वभाव आणि चरित्र – 4 गुण
मैत्री – एकमेकांमधील समज – 5 गुण
गण – मानसिक क्षमता – 6 गुण
भकोत – दुसऱ्याला प्रभावित करण्याची क्षमता – 7 गुण
नाडी – संतानजन्म – 8 गुण
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje