फॅशन

काळा रंग नेहमीच का असतो ट्रेंडमध्ये, स्टायलिश दिसण्यासाठी जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Dec 7, 2020
काळा रंग नेहमीच का असतो ट्रेंडमध्ये, स्टायलिश दिसण्यासाठी जाणून घ्या कारण

आपल्या वॉर्डरोबमध्ये काही ठराविक रंगाचे कपडे  कायम असायलाच हवेत. कारण जेव्हा कोणत्या रंगाचे कपडे घालावे हे तुम्हाला समजत नाही तेव्हा तुम्ही हे ठराविक रंगाचे  कपडे नक्कीच घालू शकता. याच कलरमध्ये टॉप लिस्टमध्ये असतो काळा रंग. कारण काळ्या रंगाच्या कपड्यात तुम्ही क्लासी तर दिसताच पण हा एक असा रंग आहे जो सर्वांवर खुलून दिसतो. सहाजिकच या रंगाचा ट्रेंड कधीच जात नाही. शिवाय काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्ही नेहमीपेक्षा स्लिम आणि फिट दिसता. यासाठीच अनेकींच्या फेव्हरेट  रंगाच्या लिस्टमध्ये काळा रंग असतोच.

या व्यतिरिक्तही अशी अनेक कारणं  आहेत ज्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घेऊ शकता. काळ्या रंगापुढे इतर रंगाचे कपडे  बऱ्याचदा फिके वाटतात. इतर रंगासोबत हा काळा रंग कॉम्बिनेशनमध्ये असेल तर इतर रंग अधिक खुलून दिसतात.यासाठी जाणून घ्या  काळा रंग तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा.

काळा रंग आहे एव्हरग्रीन

हिवाळा असो वा उन्हाळा तुम्ही कधीही काळ्या रंगाचे कपडे कॅरी करू शकता. कारण हा रंग एव्हरग्रीन आहे. अर्थातच तुम्ही आयुष्यभर म्हणजेच कोणत्याही वयात आणि वर्षभर हा रंग परिधान करू शकता. हिवाळ्यात तर शरीराला ऊब मिळावी यासाठी या रंगाला अधिक मागणी असते. मात्र थंडावा न देताही उन्हाळ्यातही हा रंग जास्त लोकप्रिय असतो. याचं महत्त्वाचं कारण या रंगात तुम्ही क्लासी दिसता. 

स्पेशल लुकसाठी काळा रंग आहे बेस्ट

जर तुम्हाला एखाद्या खास पार्टीसाठी तयार व्हायचं असेल किंवा जरा जास्तच ग्लॅमरस दिसायचं असेल तर अशा खास लुकसाठी तुम्ही काळा रंग नक्कीच निवडू शकता. काळ्या रंगात कोणतंही व्यक्तिमत्व खुलून दिसतं. संध्याकाळच्या एखाद्या  पार्टीसाठी जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घातले तर तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसता. त्यामुळे बोल्ड, हॉट आणि ग्लॅम लुकसाठी तुम्ही निशंकपणे काळा रंग वापरू शकता.

काळ्या रंगाला पर्याय नाही –

जर तु्म्ही ऑफिस मिटींगसाठी जाताय अथवा खास व्यक्तीसोबत डेटवर जाणार असाल तर यो दोन्ही ठिकाणी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता. कारण काळ्या रंगाला दुसरा कोणताच पर्याय नाही. काळ्या रंगात तुमचा कॅज्युअल, प्रोफेशनल आणि ग्लॅमरस असा कोणताही लुक मस्तच दिसतो. मात्र काळ्या रंगाचे कपडे घातल्यावर मेकअप मात्र अगदी साधा करा. ज्याममुळे तुम्ही स्टायलिश आणि एलिगंट वाटाल. एखाद्या नाईट पार्टीसाठी थोडा शिमर लुक मेकअप करण्यास काहीच हरकत नाही. मात्र त्या मेकअपमुळे तुमचा लुक हायलाईट होणार नाही याची काळजी घ्या. 

कोणत्याही रंगासोबत होतो मॅच –

काळ्या रंगाची खासियत ही की हा रंग इतर कोणत्याही रंगासोबत मॅच होतो. मग तुम्ही डेनिम जीन्ससोबत काळा टॉप घाला अथवा एखाद्या रंगीत साडीवर काळा ब्लाऊज कोणत्याही लुकमध्ये तो रंग सामावून जातो. काळ्या रंगाचे कपडे कोणत्याही साईझ आणि पॅर्टनमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही काळा टीशर्ट, काळा शर्ट, काळा ब्लाऊज, काळी साडी असे काही कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच साठवून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला काय घालावं हे समजत नाही तेव्हा हे कपडे इतर कपड्यांसोबत मिक्स मॅच करून घाला.

कोणत्याही एक्सेसरीज या सोबत वापरू शकता –

स्टायलिश दिसण्यासाठी कपड्यांप्रमाणे एक्सेसरिजबाबतही सावध असणं खूप गरजेचं आहे. पण जर तु्म्ही काळ्या रंगाचे कपडे घातले तर याबाबत फार विचार करण्याची मुळीच गरज नाही. कारण काळ्या कपड्यांसोबत कोणत्याही एक्सेसरिज खुलून दिसतात. काळ्या रंगासोबत तुम्ही तुमची कोणतीही बॅग, वॉच, ज्वैलरी मॅच करू शकता. मग ती ट्रेडिशनल असो वा पार्टी वेअर तु्म्ही त्यासोबत नक्कीच सुंदर दिसाल. 

 

 

फोटोसौजन्य – इन्टाग्राम

अधिक वाचा –

जुन्या पैठणीला द्या नवा लुक, अशा करा वापर

छोट्या केसांचा अंबाडा बांधण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

मोठ्या आकाराचे कानातले घालूनही नाही दुखणार कान, फॉलो करा या टिप्स

Read More From फॅशन