Recipes

उरलेल्या भाताची बनवा चविष्ट कुरकुरीत भजी

Dipali Naphade  |  May 4, 2020
उरलेल्या भाताची बनवा चविष्ट कुरकुरीत भजी

उरलेल्या भाताचं करायचं काय असा नेहमी प्रश्न पडतो. बऱ्याचदा केवळ फोडणीचा भात केला जातो अथवा थालिपीठ लावलं जातं. यापलीकडे जाऊन उरलेल्या भाताचं नक्की काय करता येणार? पण उरलेल्या भाताची चविष्ट आणि कुरकुरीत भजीही बनवता येतील असं तुम्हाला सांगितलं तर? आश्चर्य वाटलं ना? पण तुम्हाला शिळ्या आणि अशा उरलेल्या भाताची चविष्ट, कुरकुरीत भजी करता येतील. तुम्हाला त्यासाठी कोणताही पदार्थ बाहेरून आणावाही लागणार नाही. स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमधनूच तुम्ही ही गरमागरम भजी करू शकता.  तसंच भातही फुकट जात नाही आणि तुम्हाला एक वेगळा नवा आणि अप्रतिम पदार्थ खायला मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भजी तयार झाल्यानंतर यात भात आहे हे कोणाला ओळखताही येणार नाही. मग वाट कसली बघताय. उरला असेल भात तर आजच्या आज ही भजी करून बघा. त्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे आणि काय आहे कृती ते आम्ही तुम्हाला या लेखात देत आहोत. 

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

भाताची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भाताची भजी बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून काही वेगळं आणायची गरज भासत नाही. स्वयंपाकघरात असणारे नेहमीचे साहित्य वापरून तुम्ही ही भजी बनवू शकता. 

तुम्हाला हवं असल्यास स्वादासाठी तुम्ही ओवा आणि जिरेही वापरू शकता. हे तुमच्या आवडीनुसार अवलंबून आहे. तुम्हाला जर याचा स्वाद नको असेल  तर केवळ वर दिलेले साहित्य वापरून भजी केलीत तरीही ती चविष्ट बनतील. पण तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर तुम्ही त्यात ओवा घातल्यास, तुम्हाला हा त्रास होणार नाही आणि त्याची चवही अप्रतिम लागेल. 

साहित्य घेतल्यानंतर याची कृती कशी करायची ते आपण जाणून घेऊया. याची कृती अतिशय सोपी आहे. तुम्हाला हे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तुम्ही अगदी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही याचा वापर करू शकता. 

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

कृती

वर दिलेले सर्व साहित्य, केवळ तळण्यासाठीचे तेल सोडून सगळे एकत्र करून मळून घ्या. बटाटे नीट मॅश करा. त्यात फोड राहू देऊ नका नाहीतर त्याचा स्वाद वेगळा लागतो. हे सर्व एकत्र करून नीट मळून घ्या. तुम्हाला गरज असेल तितकंच पाणी यामध्ये घाला. ही पेस्ट जास्त पातळ अथवा जास्त जाड करू नका. जसे कांदा अथवा कोबीच्या भजीसाठी आपण पिठ भिजवतो तितकेच याचे  प्रमाण आहे. त्याप्रमाणे भिजवा आणि त्यानंतर तेल तापायला ठेवा. व्यवस्थित तेल तापल्यानंतर हे पीठ सोडून भजीच्या आकारात तळा. तुमची चविष्ट आणि कुरकुरीत भजी तयार आहेत. हिरवी चटणी अथवा टॉमेटो सॉसबरोबर ही भजी सर्व्ह करा.  

टीप – ताज्या भाताची भजी अशी कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे प्रयोग फसेल. तुम्हाला जर अशी भजी करायची असेल तर शिळा अर्थात उरलेला भात असणंच गरजेचे आहे. 

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

Read More From Recipes