आज प्रजासत्ताक दिन. तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. आजचा दिवस सुट्टी आहे इतकेच माहीत असणे अपेक्षित नाही. हा दिवस मुलांना कळावा. त्यामागील महत्व कळावे यासाठी तुम्ही हा दिवस देखील साजरा करायला हवा. या दिवशी काहीतरी खास बनवून तुम्हाला मुलांना खाऊ घालता येईल आणि त्यांना प्रजासत्ताक (Republic Day) याचे महत्व देखील सांगता येईल. चला आजच्या दिवशी आपण करुया तिरंगी मेनू
चायनीज स्पेशल
मुलांना चायनीज खूप जास्त आवडते. अशावेळी तुमच्या मुलांना चायनीजचा बेत तिरंगामध्ये तुम्हाला सेट करता येतील. चायनीज स्पेशल तिरंगा करताना तुम्हाला छान शेजवाना फ्राईड राईस करता येईल. त्यानंतर तुम्हाला पांढरा रंग हवा असेल तर तुम्ही छान हक्का नुडल्स करा. हिरवा रंग तुम्हाला ग्रेव्हीमध्ये करणे शक्य नाही. त्यामुळे साधा फ्राईड राईस करुन तुम्ही त्यामध्ये थोडासा हिरवा फुड कलर घाला. जर तुम्हाला पालकाची पेस्ट घालणे शक्य असेल तर ते घातले तरी देखील चालू शकेल. पण त्यामुळे पदार्थाची चव ही नक्कीच बदलेल यात काहीही शंका नाही.
पुरी स्पेशल थाळी
खूप लहान मुलांना तळणीच्या पदार्थांमधील पुरी हा पदार्थ खूपच जास्त आवडतो. तुमच्या मुलांनाही पुरी आवडत असेल तर तुम्ही त्यांना छान तिरंगी पुऱ्यांचा बेत करु शकता. या पुऱ्यांसोबत तुम्हाला मस्त सुकी भाजी करता येते. त्यामुळे तो एक तुमचा छान ब्रंच नेमू देखील होऊन जाईल. पुऱ्यांच्या पिठांचे तीन भाग करुन त्याच्यामध्ये तुम्ही थोडा थोडा रंग घाला.जर तुम्हाला नॅचरल रंग हवे असतील तर तुम्ही केशरी रंग तुम्हाला गाजर घालून मिळू शकते. तर पालकामुळे हिरवा रंग मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही मस्त पुरीचा बेत करु शकता.
तिरंगी इडली
इडली हा प्रकार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मस्त इडली देखील करु शकता. इडली देखील तुम्हाला तिरंगी अशा स्वरुपात करता येईल. तुम्हाला यासाठी रंगाचा किंवा नैसर्गिक घटकाचा समावेश देखील करता येईल. तुम्ही मस्त इडली तयार करा. तीन रंगाच्या इडल्या आणि त्यासोबत तुम्ही तीन रंगाच्या मस्त चटणी करु शकता. त्या देखील तुम्हाला करता येतील. हा बेत एकदम मस्त आणि चांगला होतो.
तिरंगा स्वर्ल ब्रेड
तुम्हाला जर बेकिंग आवडत असेल तर तुम्ही या दिवशी मस्त स्वर्ल ब्रेड देखील बनवू शकता. हे ब्रेड बनवण्यासाठी विशिष्ट कला असावी लागते. जर तुम्हाला बेकिंग जमत असेल तर तुम्ही मस्त असा स्वर्ल ब्रेड बनवा तुम्हाला नक्कीच त्यामुळे काहीतरी वेगळे बनवल्यासारखे वाटेल. जर तुम्हाला केक बनवणे शक्य असेल तर तुम्ही तसा केकही बनवू शकता.
आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मस्त तिरंगी मेनू करा. शिवाय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीची फॅशन करायलाही विसरु नका.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade