लिंबाचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये केला जातोच. पण लिंबाचा फायदा त्वचेसाठीही होतो आणि लिंबाचा वापर करण्यात येतो. कारण यातील विटामिन सी हे त्वचेसाठी एक चांगले आणि उत्तम पोषक तत्व ठरते. वास्तविक लिंबामध्ये सायट्रिक एसिड असते, जे त्वचेला नुकसानही पोहचवू शकते. त्यामुळे डर्मेटॉलॉजिस्ट अथवा ब्युटी एक्सपर्ट्स हे लिंबाचा वापर त्वचेवर करण्यापूर्वी तुम्हाला काही आवश्यक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. त्वचेवर लिंबाचा वापर कसा करावा यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही या लेखातून देत आहोत. लिंबाच्या रसापासून ते अगदी लिंबाच्या सालांपर्यंत त्वचेसाठी उपयोगात आणण्यात येते. पण तुम्ही केवळ लिंबाचा रस वापरणार असाल तर 5 थेंबापेक्षा अधिक याचा वापर करू नका. चेहऱ्यावर लिंबाचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला याचा कशा पद्धतीने वापर करण्याची गरज आहे याची इत्यंभूत माहिती आम्ही याद्वारे देत आहोत, तुम्ही त्याचप्रमाणे वापर करावा.
फेसपॅकमध्ये लिंबाच्या रसाचा वापर
साहित्य
- 1 लहान चमचा तांदळाचे पीठ
- 5 थेंब लिंबाचा रस
- अर्धा चमचा गुलाबपाणी
बनविण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घ्या, त्यात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिक्स करून घ्या
- आता हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिट्सने चेहरा धुवा
- आठवड्यातून एक वेळा तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करून घ्या
फायदा – हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला चमक देतो आणि चेहऱ्याला आणि त्वचेला अधिक कसदार करण्यास मदत करतो. कारण तांदळाच्या पिठात चेहऱ्याला अधिक कसाव आणण्याचे तत्व असते. तर लिंबू हे त्वचेवर ब्लीचप्रमाणे काम करते आणि चेहरा अधिक चमकदार करण्यास मदत करते.
फेस स्क्रबमध्ये लिंबाचा रस
साहित्य
- 1 लहान चमचा साखर
- 1 लहान चमचा कोरफड जेल
- 5 थेंब लिंबाचा रस
बनविण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये साखर, कोरफड जेल आणि लिंबाचा रस मिक्स करा
- आता या मिश्रणाने आपला चेहरा स्क्रब करा
- 2 मिनिट्स चेहरा स्क्रब केल्यानंतर चेहरा धुऊन घ्या
- तुम्ही हा स्क्रब आठवड्यातून दोन वेळा वापरून पाहा
फायदा – तुमच्या चेहऱ्यावर असलेली डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. या स्क्रबच्या माध्यमातून ही स्किन निघून जाण्यास मदत मिळते.
फेस सिरममध्ये लिंबाचा रस
साहित्य
- 1 कप ग्रीन टी चे पाणी
- 1 विटामिन ई ची कॅप्सुल
- 5 थेंब लिंबाचा रस
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले तुम्ही चहाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि गाळून थंड करा
- आता या पाण्यात तुम्ही विटामिन ई कॅप्सुल काढून टाका
- या मिश्रणात लिंबाचा रस मिक्स करा आणि एका स्प्रे च्या बाटलीत तुम्ही हे मिश्रण भरा
- आता हे मिश्रण चेहऱ्यावर स्प्रे करा. तुमच्यासाठी एक घरगुती फेस सीरम तयार
फायदा – हे सीरम तुमच्या त्वचेला संपूर्ण दिवस अप्रतिम ठेवण्यास आणि तजेलदार ठेवण्यास मदत करते
टीप – वरती सांगण्यात आलेल्या सर्व घरगुती उपचारांचा वापर करण्यापूर्वी 24 तास पहिले तुम्ही स्किन पॅच टेस्ट (Skin Patch Test) करून घ्या. तुमच्या त्वचेला यामुळे काहीही हानी न झाल्यास तुम्ही पुढे याचा वापर करावा. तसंच यापैकी कोणत्याही पदार्थांची तुम्हाला अलर्जी असल्यास, याचा अजिबात वापर करू नका.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक