मनोरंजन

अभिनेता रोनित रॉयने घरीच टी-शर्टपासून तयार केला मास्क

Trupti Paradkar  |  Apr 21, 2020
अभिनेता रोनित रॉयने घरीच टी-शर्टपासून तयार केला मास्क

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश सध्या लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करतानादेखील सोशल डिस्टंस पाळणं बंधनकारक आहे. शिवाय नागरिकांनी मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला सतत सरकारकडून दिला जात आहे. मात्र कोरोनापासून बचाव करणारे मास्कच आता बाजारात उपलब्धच नाहीत. शिवाय जे मास्क मिळत आहेत ते फारच महागडे आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला मास्क मिळणं कठीण झालं आहे. सर्वसामान्य जनतेची  मदत करण्यासाठी अभिनेता रोनित रॉय धावून आला आहे. यासाठी घरीच साध्या टी-शर्टपासून मास्क कसा तयार करायचा हे त्याने त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. 

Instagram

रोनितने टी – शर्टपासून तयार केला मास्क

या व्हिडिओच्या माध्यमातून रोनितने त्याच्या चाहत्यांना एक सुंदर संदेश दिला आहे. रोनितने दिलेला हा सल्ला चाहत्यांच्या नक्कीच फायद्याचा आहे. त्याने शेअर केलं आहे की, जर तुमच्याकडे मास्क नसेल अथवा बाजारात मास्क मिळत नसेल तर मुळीच काळजी करू नका. कारण तुमच्या घरी आता एखादं साधं टी-शर्ट नक्कीच असेल. त्या टी-शर्टचा वापर करून घरीच मास्क तयार करा. एवढंच नाही तर रोनितने टी-शर्ट कशा पद्धतीने गुंडाळून तुम्ही तुमचा नाक, तोंड आणि चेहरा झाकू शकता याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या मास्कमुळे तुमचे नाक आणि तोंडच नाही तर केसदेखील झाकले जाऊ शकतात. यातून तुमचं कोरोनापासून कसं संरक्षण होऊ शकतं याचं एक प्रात्यक्षिक रोनितने करून दाखवलं आहे. हा मास्क सर्वसामान्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. कारण बिन खर्चाचा आणि अतिशय सुरक्षित मास्क यातून त्यांना करता येणार आहे. 

सेलिब्रेटीज शेअर करत आहे मास्क करण्याच्या विविध पद्धती

काही दिवसांपासून रूमाल ,स्कार्फ, ब्लाऊजपीस यांच्या मदतीने घरीच मास्क कसा तयार करायचा हे अनेक लोक शेअर करत आहेत. ज्यामध्ये काही बॉलीवूड अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. अभिनेत्री सनी लिओन आणि विद्या बालनने यापूर्वी घरी मास्क करण्याची सोपी पद्धत चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र अभिनेता रोनित रॉयने अगदी सोप्या पद्धतीने घरी असलेल्या टी-शर्टपासून मास्क कसा तयार करायचा हे शेअर केलं आहे. कारण यासाठी तुम्हाला टी-शर्ट कापण्याची अथवा शिवण्याची मुळीच गरज नाही. शिवाय तुम्ही त्या टी-शर्टचा पुन्हा वापर करू शकता. जर या पद्धतीने मास्क तयार केला तर कोरोनापासून सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच संरक्षण मिळू शकतं. फक्त लक्षात ठेवा यासाठी वापरण्यात येणारं टी-शर्ट स्वच्छ असायला हवं. शिवाय बाहेरून पुन्हा घरी आल्यावर ते निर्जंतूक करायला मुळीच विसरू नका. कोरोनाला लढा देण्यासाठी घरातच थांबा आणि सुरक्षित राहा. गरज पडल्यास हा मास्क लावूनच घराबाहेर जा. अशा पद्धतीने स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कोरोनापासून सरक्षित राहा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नेहा कक्करची हटके फॅशन, उशीचाच तयार केला ड्रेस

आम्ही अजूनही एकत्र आहोत, करणने केला ब्रेकअपबाबत खुलासा

ट्रक ड्रायव्हर्समध्ये आजही प्रसिद्ध आहेत ही अजय देवगणची गाणी

Read More From मनोरंजन