धनू राशीच्या (Sagittarius) व्यक्तींचा जन्म महिना हा 22 नोव्हेंबरपासून ते 21 डिसेबरपर्यंत मानला जातो. या राशीचा स्वामी गुरू आहे. तसं तर धनू राशीच्या व्यक्तींना अगदी दिलफेक व्यक्ती असं म्हटलं जातं. पण त्याचबरोबर या व्यक्ती अत्यंत आशावादी, धाडसी आणि विसरणाऱ्याही असतात. यांच्यामध्ये हुशारी आणि प्रतिभा खूपच असते ज्यामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी असेल जर कोणी धनू राशीचे तर त्यांचेही गुण आणि दोष या लेखात दिल्याप्रमाणे जुळतात का नक्की पाहा आणि त्यांना वाढदिवसासाठी विश करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
तूळ राशीच्या व्यक्ती असतात राजकारणात माहीर, कसा असतो स्वभाव
धनू राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Sagittarius sign people Positive and Negative Characteristics in Marathi)
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका वेळी, एका विशिष्ट महिन्यात होत असतो. प्रत्येक माणसाचे वैशिष्ट्य हे वेगळं असते. या लेखातून आम्ही तुम्हाला धनू राशीच्या व्यक्तीचे गुण आणि दोष दाखवून देणार आहोत.
- धनू राशीच्या लोकांना अगदी मनापासून तरूण राहायला आवडतं. नेहमी काहीतरी नवं करण्याचा उत्साह या व्यक्तींमध्ये असतो. तसंच आपल्या सीमा ओलांडून यांना काहीतरी करायचं असतं. त्यामुळेच बरेचदा फ्लर्ट करण्यामध्ये या राशीच्या व्यक्ती पुढे असतात
- या व्यक्तींना सतत हसणे खिदळणे खूपच आवडते. लहान सहान गोष्टीतही या व्यक्ती आनंद शोधतात. तुम्ही या व्यक्तींबरोबर असाल तर तुम्हाला कधीही कंटाळवाणे वाटणार नाही याची नक्की हमी आहे. यांच्या याच स्वभावामुळे मित्रपरिवार जास्त मोठा असतो.
- कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या आयुष्यात साहस या व्यक्ती आणतातच. प्रत्येक वेळी नवा विचार, नव्या रूटीनमुळे यांचे आयुष्य कधीच कंटाळवाणे नसते. त्यामुळे अनेकांना या व्यक्तींचा हेवा वाटतो
- धनू राशीच्या व्यक्ती आपले प्रेम दर्शविण्यासाठी कधीही समोरून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जेव्हा या व्यक्ती विशेष वागणूक देत असतील तेव्हा समजून जावे की या व्यक्ती तुमच्या प्रेमात आहेत. पण कायम प्रेम प्रामाणिकपणे आणि खरेपणाने आपल्या जोडीदाराला साथ देतात
- परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर धनू राशीच्या व्यक्तींसाठी मेष राशीची व्यक्ती ही अत्यंत योग्य आहे. कारण त्यांच्या गोष्टी, स्वभाव आणि विचार एकमेकांशी पटणारे असतात. दोघांचाही दृष्टीकोन सरळसाधा आणि कोणालाही न जुमानता पुढे जाणारा असतो. तसंच सामाजिक कार्याची दोघांनाही आवड असते. यांच्या लव्हलाईफमध्ये प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्व असते. त्यामुळेच या दोन्ही व्यक्ती एकमेकांपासून कंटाळत नाहीत. आपल्या वागणुकीने आणि स्वभावाने आयुष्यात सतत मजा करत राहतात
सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव
- या राशीच्या व्यक्तींना बलशाली राशीपैंकी एक मानले जाते. पण या व्यक्ती कधीतरी आपल्या वागणुकीने स्वतःचं नुकसान करून घेतात. कारणाशिवाय राग येणे हा यांचा सर्वात वाईट दोष आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल मनात अढी करून घेतली तर समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता या व्यक्ती रोष ओढवून घेतात
- करिअरमध्ये धनू राशीच्या व्यक्ती नेता म्हणूनच पुढे असतात. बरेचदा राजकारणात या व्यक्ती पुढे दिसून येतात. त्यामुळेच यांचे करिअर हे नेता, राजकारण, चित्रपट, उद्योग यामध्ये अधिक चांगले ठरते
- या व्यक्ती जरा जिद्दी आणि आखडू स्वभावाच्या असतात. आपले व्यक्तीत्व लपवून ठेवायची यांना सवय असते. यांना एखादी गोष्ट न आवडल्यास, ती गोष्ट कधीच स्वीकार करत नाहीत. बरेचदा स्वतःची चूक असूनही मान्य करत नाहीत. त्यामुळे लोकांच्या नजरेत दोषी ठरतात
- या व्यक्तींना आपले स्वातंत्र्य खूपच आवडते. अत्यंत उत्साही आणि सतत मजेत राहणाऱ्या या व्यक्ती असतात. कोणीही यांना आपल्या नियंत्रणात ठेवणे या व्यक्तीना आवडत नाही. कोणत्याही प्रकारची बंधने यांना चालत नाहीत. आपल्या अटी आणि शर्तींवर जगणाऱ्या या व्यक्ती आहेत
- स्वभावाने जिद्दी आणि हट्टी असल्याने खूपच फटळत असतात. यांच्या गोष्टी वाईट वाटो वा चांगल्या तोंडावर सरळ सांगून टाकणे हाच यांचा स्वभाव आहे
- या राशीच्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असून हुशारही असतात. यांच्यातील प्रतिभा यांना वेगळे दर्शविते
प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या
भाग्यशाली क्रमांक – 6,16,23,60 आणि 81
भाग्यशाली रंग – पिवळा, आकाशी, गुलाबी
भाग्यशाली वार – गुरुवार, मंगळवार
भाग्यशाली खडा – पुखराज (गुरू)
धनू राशीचे बॉलीवूड स्टार्स – ट्विकल खन्ना, दिलीप कुमार, रजनीकांत, अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम, कोंकणा सेन शर्मा, दिया मिर्झा, तमन्ना भाटिया, गोविंदा, बोमन ईरानी, शर्मिला टागोर
धनू राशीचे मराठी कलाकार – अमृता खानविलकर, भरत जाधव, भूषण प्रधान
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje