xSEO

सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती, कोट्स | Savitribai Phule Information And Quotes In Marathi

Trupti Paradkar  |  Jan 1, 2022
savitribai phule information

आज महिला पुरूषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. मात्र एक काळ असा होता जेव्हा स्त्रीला साधे शिक्षण घेण्याचे अधिकारही नव्हते. तेव्हा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ती समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांनी पतीच्या सोबतीने तेव्हा त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात स्वतःला झोकून दिले.मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई या भारताच्या पहिला महिला शिक्षक झाल्या. त्यासाठी त्यांनी ज्योतीबा फुले यांच्याकडून स्वतः ज्ञानाचे धडे घेतले. सावित्री बाईंचे या क्षेत्रातील योगदान एवढे मोठे आहे की आज प्रत्येक सुशिक्षित स्त्री आयुष्यभर त्यांची ऋणी राहिल. यासाठीच जाणून घेऊ या स्त्री शिक्षणाची क्रांती ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठीतून (Savitribai Phule Information In Marathi) सोबत सावित्रीबाई फुले यांचे विचार जे महिलांना आयुष्यभर देत राहतील प्रेरणा.

Savitribai Phule Marathi Mahiti | सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती मराठी

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षक होत्या. पती महात्मा फुले यांच्यासोहत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतःचे अवघे आयुष्य खर्च केले. शिक्षणाचे धडे देण्यासोबत त्या उत्तम कवियित्री आणि समाजसेविकाही होत्या. सावित्रीबाई दलित कुटुंबात जन्माला आलेल्या असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून समाजात असणारा भेदभाव त्यांनी अनुभवला होता. ज्यामुळे समाजसुधारणेचा वसा घेतल्यावर आयुष्यभर त्यांनी हा जातिभेद दूर करण्यासाठी, महिलांना शिक्षण देण्यासाठी, विधवा पुर्नविवाह करण्यासाठी मेहनत घेतली. 10 मार्च 1897 रोजी प्लेग झालेल्या रूग्णांची सेवा करताना प्लेगची लागण झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. 

Savitribai Phule Marathi Mahiti – सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती

सावित्रीबाई फुले जन्म आणि लग्न

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलें यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यामध्ये झाला. साताऱ्यातील नायगावमध्ये खंडोबा सिदूजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या पोटी सावित्रीबाई यांनी जन्म घेतला. खंडोजी पाटील फुलमाळी होते. सावित्रीबाई या खंडोजी पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांचे पहिलेच अपत्य होत्या. पुढे 1840 साली म्हणडे नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा समाजसुधारक ज्योतीबा फुले यांच्याशी विवाह झाला. ज्योतीबा फुले यांचे संपूर्ण जीवन दलित समाजाला वाहिलेले होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. यासाठी महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना लेखन आणि वाचन शिकवले. 

Mahatma Phule Quotes In Marathi | महात्मा फुले विचार मराठीमध्ये

स्वयंशिक्षित आणि महिला-शिक्षण मोहीम

स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या काळी मुलींना शिक्षित करणं खूप गरजेचं होतं. मात्र मुलींनी शिक्षण घेणे हे तत्कालीन समाजात निषिद्ध मानलं जात असे. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची समाजात आणि धर्मात परवानगी नव्हती. स्त्री सुशिक्षित नसल्यामुळे तिच्यावर निरनिराळ्या प्रकारे अन्याय होत होते. समाजसुधारक महात्मा फुलेंना हा अन्याय मुळीच सहन होत नसे. मुलींना शिक्षणाचा समान अधिकार असेल तर त्यांना त्यांच्यावर होणारा अन्याय समजेल आणि त्या स्वतःच हा अन्याय सहन करणार नाहीत असं त्यांना वाटत असे. यासाठीच त्यांनी आधी स्वतःच्या पत्नीला सुशिक्षित केले आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त केले. सावित्रीबाईंनीही पतीसोबत स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलं. पुढे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षक झाल्या. त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. पुढे स्वबळावर या दोघांनी मिळून पुण्यात एकूण अठरा शाळा सुरू केल्या. ज्यामध्ये दलित समाजासह मुस्लीम बांधवांच्या मुलींनाही शिक्षण दिले जात असे. सावित्रीबाई आणि ज्योतीबा फुलेंचे कार्य पाहून पुढे 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटिश सरकारनेही त्यांचा सत्कार केला होता. 

समाजाचा निषेध

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर मुलींना शिकवण्याचे कार्य करणे त्याकाळी सहज आणि सोपे नक्कीच नव्हते. कारण त्या काळी मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. अशा काळात समाजाचा विरोध पत्करत हे कार्य करताना सावित्री बाई आणि महात्मा फुलेना अनेक संकटे सहन करावी लागली. एक स्त्री असून मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करते म्हणून सावित्रीबाईंचा सतत अपमान केला जात असते. धर्माच्या विरोधात काम केले म्हणून त्यांच्या अंगावर दगड, कचरा, शेण, मानवी मलमूत्र फेकले जात असे. मात्र सावित्रीबाईंनी हा विरोध हसत हसत स्वीकारला. त्या शाळेत जाताना एक साडी सोबत ठेवत असत. ज्यामुळे खराब झालेली साडी शाळेत जाऊन बदलून त्या मुलींना शिकवण्यासाठी सतत तत्पर असत. पुढे पुढे त्यांच्या या अविरत प्रयत्नांना यश मिळत गेले. सुरूवातीला शाळेत फक्त नऊच मुली होत्या. मात्र हळू हळू मुलींची संख्या वाढू लागली. अस्पृश्य समाजातील मुलींना शिक्षणाचा समान हक्क मिळू लागला. सावित्रीबाईंच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि मुलींना शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

Savitribai Phule Marathi Mahiti

विधवा पुनर्विवाहासाठी संघर्ष

महिलांना शिक्षण देण्यासोबत सावित्रीबाईंनी समाजातील इतर अनेक अन्यांना वाचा फोडली. महिलांना शिक्षण घेण्याची मुभा तर त्या काळी नव्हतीच पण मुलींचे लहान वयात लग्न लावून दिले जात असे. मुलींसाठी निवडले जाणारे वर वयाने मोठे असल्यामुळे बऱ्याचदा मुलींना अकाली वैधव्य येत असे. अशा मुलींना आयुष्यभर विधवेचे जीवन जगावे लागत असे. त्याकाळी पती नसलेल्या स्त्रीला चांगली वागणूक समाजात मिळत नसे.  एवढंच नाही तर बऱ्याचदा विधवेला पतीसोबत सती पाठवले जात असे. मुलींची इच्छा असो वा नसो त्यांना जबरदस्ती पतीच्या सोबत चितेत ठकलले जात असे. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून लोक मुलगी झाल्यावर लहानपणीच तिची हत्या करत असत. ज्यामुळे समाजात स्त्री बालहत्येचे प्रमाण वाढले होते. एखादी विधवा गरोदर असेल तर ती पतीच्या निधनानंतर आत्महत्या करत असते. या सर्व परिस्थितीचा विचार करत सावित्रीबाईंनीहीविधवा पुर्नविवाह सुरू केले. यासाठी त्यांनी विधवासाठी खास आश्रम आणि अनाथ मुलांसाठीही आश्रम सुरु केले. 

दलित उत्थानात अविश्वसनीय योगदान

सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतीबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाज नावाची संस्था निर्माण केली होती. दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे आणि त्यांचे शोषण थांबवण्यासाठी या दोन्ही उभयतांनी आयुष्यभर प्रयत्न केले. महात्मा फुलेंच्या या समाजकार्यात सावित्रीबाईंचा खूप मोठा सहभाग होता. त्यांनी एक पत्नी म्हणून महात्मा फुलेंना नेहमीच सहकार्य केले. शिवाय त्या स्वतःही एक उत्तम समाजसेविका असल्यामुळे आयुष्यभर दलितांच्या उद्धारासाठी कार्य केले. समाजातील हा अन्याय रोखण्यासाठी सावित्रीबाईंना आयुष्यभर संघर्षाला तोंड द्यावे लागले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे निधन झाले त्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाई यांनी खंबीरपणे सांभाळली. मात्र 1897 मध्ये पुण्यात भयंकर प्लेगची साथ आली आणि त्यामध्ये प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना लागण झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. 

Savitribai Phule Quotes In Marathi | सावित्रीबाई फुले कोट्स मराठी

Savitribai Phule Marathi Mahiti

सावित्रीबाई फुलेंचे जीवन संघर्षमय तर आहेच पण सर्वांना प्रेरणा देणारेदेखील आहे. यासाठीच वाचा हे काही खास सावित्रीबाई फुले यांचे विचार (savitribai phule quotes in marathi).

1.शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार

2. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!!!

3. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा

4. शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री

5. तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देऊ नकोस फुले कारण तू तर आहेस शिक्षण घेणारी आणि देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले

6. ती लढली म्हणून आम्ही घडलो!!!

7. तुम्ही बकरी, गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दूध देता आणि तुम्हीच दलितांना साधं माणूसही समजत नाही… सावित्रीबाई फुले

8. माझ्या कविता वाचल्यावर जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रण सार्थकी लागले – सावित्रीबाई फुले

9. जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते – सावित्रीबाई फुले

10. स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

हेही वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

मग तुम्हीही येत्या 10 मार्चला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती (savitribai phule marathi mahiti) नक्की वाचा. तसंच सावित्रीबाईंचे विचार (savitribai phule quotes in marathi) ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा.

Read More From xSEO