चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग कोणालाही नको असतात. पिंपल्सचे हे डाग अगदी सावकाशीने घालवायला तितका वेळ आणि संयम फार कमी जणांना असतो. चेहऱ्याच्या बाबतीत तुम्हीही तितकेच आग्रही असाल तर तुम्हाला पिंपल्स करेक्टर वापरुन ते डाग घालवता येतील. तुम्ही अद्याप या प्रॉडक्टबद्दल कधीही वाचले नसतील. तर आज तुम्हाला याची माहिती देणार आहोत. तुम्हाला पिंपल्स आल्यानंतर कोणत्या प्रकारचे करेक्टर तुमच्यासाठी योग्या आहेत ते तुम्हाला कळेल.
स्पॉट करेक्टर म्हणजे काय?
स्पॉट करेक्टर हे पिंपल्सवर लावले जाते. त्यामध्ये असे काही घटक असतात की, जे पिंपल्स दाबण्यास मदत करतात. यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड असे घटक असतात. ज्यामुळे पिंपल्समध्ये साचलेली घाण निघण्यास मदत मिळते. पिंपल्ससाठी कारणीभूत असणारे घटक त्यातून बाहेर पडल्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसण्यास मदत होते. इतकेच नाही तर कालांतराने त्याचे डागही कमी होण्यास मदत मिळते.
असे निवडा तुमच्यासाठी स्पॉट करेक्टर
बाजारात अनेक कंपनीचे स्पॉट करेक्टर मिळतात. यातून तुमच्या त्वचेसाठी चांगले स्पॉट करेक्टर कसे निवडायचे असा विचार करत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात
- पिंपल्स हे शक्यतो तेकलट त्वचा असणाऱ्या व्यक्तिंना येतात. ज्यांची त्वचा कोरडी असते. अशा त्वचेवर सीबंचे प्रोडक्शन कमी असते. त्यामुळे मिश्र किंवा तेलकट त्वचा असणाऱ्यांनाच हा त्रास होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी काय शोभते याचा विचार देखील करायला हवा.
- काही प्रोडक्टमध्ये काही असे घटक असतात की ज्यामुळे काही काळासाठी पिंपल्स हे मोठे होऊ शकतात. ते अगदी काहीच काळासाठी मोठे होत असले तरी देखील ते हळुहळू कमी होऊ लागतात. पण अगदी काहीच दिवसांवर तुमचा कार्यक्रम असेल तर असे स्पॉट करेक्टर अजिबात निवडू नका.
- काही स्पॉट करेक्टर यांच्यामध्ये पिंपल्स सुकवणारे घटक असतात. ज्यामुळे अगदी काहीच तासात पिंपल्स सुकून जातात. काही जणांची त्वचा ही निघू लागते. त्यामुळे ग्लो मिळण्यास मदत मिळते.
- हल्ली काही नैसर्गिक घटक असलेले स्पॉट करेक्टर देखील मिळतात. ज्याचा त्रास त्वचेला होत नाही. अगदी नैसर्गिक पद्धतीने त्वचेचे नुकसान न करता ते काम करतात. पण असे असले तरी ते थोडासा वेळ घेतात. त्याचा वापर करायचा असेल तर तुम्हाला थोडा संयम ठेवायलाच हवा. तरच त्याचा फायदा होण्यास तुम्हाला मदत मिळेल.
- स्पॉट करेक्टरचा सतत वापर करणे हे देखील चांगले नाही. कारण असे केल्यामुळे त्याचा त्वचेवर परिणाम होणे बंद होते. त्यामुळे याचा वापर ज्यावेळी गरज असेल त्यावेळीच करा.
आता पिंपल्सला बाय बाय करण्यासाठी स्पॉट करेक्टर नक्की वापरा.