Family

नेहमी सॉरी म्हणणं तुमच्यासाठी ठरू शकतं वाईट

Aaditi Datar  |  Mar 30, 2020
नेहमी सॉरी म्हणणं तुमच्यासाठी ठरू शकतं वाईट

तुम्हीही त्या लोकांप्रमाणे आहात का, जे भांडण टाळण्यासाठी, नातं जपण्यासाठी, समोरच्याच्या ईगोला सांभाळण्यासाठी नेहमी सॉरी बोलून टाकता. जर तुम्ही असं करत असाल तर ही खूप मोठी चूक आहे. सॉरी बोलणं हे सर्वांनाच आलं पाहिजे पण प्रत्येक वेळी सॉरी म्हणणं तुमच्यासाठी नुकसानदायकरी ठरू शकतं.

Shutterstock

जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्हाला भडकवण्यासाठी किंवा टार्गेट करतो. अशा वेळी स्वतःसाठी उभं राहण्याऐवजी आपण सॉरी बोलून टाकतो. पण हे आपल्याला त्यांच्या नजरेत दुबळं असल्याचं दाखवतं. हा विचार करू नका की, सॉरी बोलल्यावर सगळं संपेल. याउलट तुमच्या अशा स्वभावामुळे समोरच्याला वारंवार वरचढ ठरण्याची संधी मिळेल. 

वारंवार सॉरी बोलणं व्यक्तीच्या आत्मसन्मानालाही धक्का पोचवतं. जर एखाद्या वेळी तुमची चूक नसेल आणि तुम्ही तरीही परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी कटू शब्द ऐका पण सॉरी बोलू नका. आपली बाजू मजबूत ठेवा आणि आत्मसन्मानासाठी लढा. 

तुम्ही भलेही विचार केला असेल की, एखादा प्रसंग टाळण्यासाठी सॉरी बोलावं, पण प्रत्येकवेळी असं नसतं. खासकरून ऑफिसमध्ये वारंवार सॉरी बोलल्याने तुमच्या शब्दाची किंमत संपेल आणि लोक याला तुमचा बचावात्मक पवित्रा वाटून तुम्हाला बेपर्वा समजतील. 

असं म्हणतात की, भांडण्यापेक्षा सॉरी बोलून नातं वाचवावं. पण ते चुकीचं आहे. समजा आपला मित्र, कुटुंब किंवा नवरा/बायको यांच्याशी एखाद्या मुद्याबाबात दुमत असेल आणि ते तुमच्या विचाराशी सहमत नसतील तर अशावेळी सॉरी बोलू नका. कारण हे पुढे जाऊन तुमच्याच फ्रस्ट्रेशनचं कारण ठरू शकतं. यापेक्षा तुम्ही तुमचं मतही त्यांच्या समोर ठेवा आणि त्यांना समजवा. 

हो, वारंवार सॉरी बोलणं तुमचा आत्मविश्वास कमी करतं. हे तुम्हाला स्वतःसाठी उभं राहण्याची संधी देत नाही. ज्यामुळे तुम्हाला करियरमध्येही पुढे जाण्यात समस्या निर्माण करू शकतं. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळतो. 

योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर

Giphy

मग पुढच्यावेळी जर तुमची चूक नसेल तर चुकूनही सॉरी म्हणू नका. कारण प्रत्येकवेळी सॉरी म्हणून माघार घेणं योग्यच असतं असं नाही.

नात्यात ‘या’ चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा!

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From Family