उन्हाळ्याच्या दिवसात केसांची काळजी घेणं खूपच गरजेचे आहे. त्वचा आणि केस हे दोन्ही उन्हाळ्याच्या दिवसात खराब होतात. सूर्याच्या किरणांमुळे त्वचा खराब होते आणि केसांची चमक निघून जाते. बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसात स्काल्पमधून येणारा घाम हा केसांना खराब करतो. अशावेळी केसांची अधिक काळजी घेणे गरजेचे होते. बाजारामध्ये आपल्याला केसांसाठी अनेक उत्पादने मिळतात, ज्यामुळे केसांचा विकास होतो आणि केस अधिक वाढतात असा दावा केला जातो. पण ही उत्पादने महाग असण्यासह त्याचा परिणाम योग्य होतोच असं नाही. तुम्हाला तुमच्या केसांना नैसर्गिक ट्रिटमेंट द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला घरच्या घरी एक सोप्या पद्धतीने हेअर टॉनिक कसे बनवता येते याबाबत माहिती देणार आहोत. हे हेअर टॉनिक बनवणे अत्यंत सोपे आणि याचा वापरही सोप्या पद्धतीने करता येतो.
हेअर टॉनिकसाठी साहित्य आणि पद्धत
साहित्य
- 2 ग्लास पाणी
- एक मूठभर रोझमेरी
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिले एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्या
- त्यानंतर पाण्यात मूठभर रोझमेरी टाका
- आता हे अगदी मंद आचेवर शिजू द्या. पाणी अर्धे होईपर्यंत गरम होऊ द्या
- त्यानंतर हे मिश्रण थंड करा आणि मग ते एका स्प्रे बाटलीत भरा
- तुमचे घरगुती हेअर टॉनिक वापरासाठी तयार आहे
कसा कराल हेअर टॉनिकचा वापर
- या हेअर टॉनिकचा वापर तुम्ही आंघोळीपूर्वी आपल्या केसांवर करावा. आंघोळ करण्यापूर्वी हे केसांना लावा. आपल्या स्काल्पवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा
- या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्हाला हे हेअर टॉनिक सुक्या केसांवरच लावायचे आहे. केस ओले असतील तर याचा वापर करू नका कारण याचा काहीच फायदा होणार नाही
- हेअर टॉनिक लावल्यावर साधारण 10-15 मिनिट्स केसांना तसेच राहू द्या. त्यानंतर तुम्ही केस हवे तर पाण्याने धुवा वा शँपू लावल्यासही हरकत नाही
- या गोष्टीची काळजी घ्या की, हे हेअर टॉनिक रात्रभर केसांना लाऊन ठेऊ नका. आंघोळीच्या काही क्षण आधीच हे वापरा
काय आहे या हेअर टॉनिकचे फायदे
- रोझमेरी एक वनस्पती आहे आणि केसांच्या वाढीसाठी याचा फायदा होतो. तसंच हा नैसर्गिक घटक असल्याने केसांना नुकसान पोहचत नाही
- तुम्हाला स्काल्पमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर हे हेअर टॉनिक वापरून तुम्हाला हे इन्फेक्शन नाहीसे करता येईल
- हे हेअर टॉनिक केसांना लावल्याने केसांना अधिक चमक येते. तसंच केसांमधील कोरडेपणा निघून जाण्यास मदत मिळते
- तसंच रोझमेरी स्काल्पसाठी एक क्लिंन्झरप्रमाणे काम करते. तुमचे केस खराब होत असतील आणि शँपू करणे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या हेअर टॉनिकचा नक्की वापर करा
अत्यंत सोपे असे घरगुती हेअर टॉनिक तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी आणि केस लवकर वाढविण्यासाठी आणि घनदाट केसांसाठी उपयुक्त ठरते. तुम्हीही याचा वापर करून पाहा आणि आम्हाला नक्की याबाबत कळवा. मात्र तुम्हाला कोणत्याही पदार्थाची अलर्जी असल्यास, डॉक्टरांना विचारूनच तुम्ही याचा वापर करावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक