Make Up Products

मेकअप टिकवण्यासाठी सेटिंग पावडर की बनाना पावडर कशाचा करावा उपयोग

Leenal Gawade  |  Oct 21, 2020
मेकअप टिकवण्यासाठी सेटिंग पावडर की बनाना पावडर कशाचा करावा उपयोग

मेकअप टिकवण्यासाठी सेटींग पावडर किंवा बनाना पावडर वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण या दोन पावडरमध्ये काय फरक आहे आणि तुम्ही कशाची निवड करायला हवी याचा विचार तुम्हाला कधीतरी पडला आहे. जर तुम्हाला या दोघांमधील फरक माहीत नसेल तर तुम्ही या दोघांमधील फरक जाणून घ्यायला हवा. यातील फरक जाणून घेतल्यानंतरच तुम्हाला या दोघांपैकी तुमच्यासाठी योग्य काय आहे ते कळेल. चला तर जाणून घेऊया दोघांमधील फरक, फायदे आणि तोटे.

मिल्क पावडरने मिळवा नितळ त्वचा (Milk Powder For Face In Marathi)

सेटींग पावडर आणि बनाना पावडरमधील फरक

Instagram

फरकसेटिंग पावडरबनाना पावडर
रंगसेटिंग पावडरचा रंग हा पारदर्शक असतोबनाना पावडरचा रंग हा पिवळसर असतो.
टेक्श्चरसेटिंग पावडरचे टेक्शचर हे लुझ पावडरसारखे असते.बनाना पावडरही लुझ पावडरसारखीच असते.
कोणासाठी योग्यकोणत्याही स्किनटोनसाठी सेटिंग पावडर योग्य असते.कारण याचा कोणताही रंग नसतोबनाना पावडरही पिवळसर रंगाची असली तरी त्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स मिळतात. त्यामुळे तुमच्या स्किनटोननुसार तुम्हाला याची निवड करावी लागते.
लुकपारदर्शक असल्यामुळे ती चेहऱ्याला लावली असे मुळीच वाटत नाही.याचा शेड असल्यामुळे ती चेहऱ्याला लावल्यानंतर पावडर लावल्याचा भास होतो
मेकअप टिकवणेसेटिंग पावडरही मेकअप टिकवण्यसाठीच वापरली जाते. याच्या वापरामुळे त्वचेवर तेलकटपणा येत नाही आणि मेकअप विस्कटत नाही. टिश्यूने तुम्ही चेहरा टिपला तरी पुरेसे असते.बनाना पावडर ही टिपताना त्याचे डाग किंवा त्याचे स्टेन पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ती लावल्यानंतर फिक्कट कपड्यांची काळजी घ्यावी लागते.

फायदे -तोटे

सेटिंग पावडर आणि बनाना पावडर यांच्यामधील फरक जाणून घेतल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की दोघांचे काम हे तुमच्या त्वचेवरील मेकअप टिकवणे हे आहे. पण या दोघांच्या रंगाचा विचार करता अनेक जण सेटिंग पावडर वापरणे अधिक पसंत करतात कारणही  पावडर चेहऱ्यावर लावल्यासारखी फारशी वाटत नाही. तर बनाना पावडरचा रंग थोडासा पिवळसर असल्यामुळे जर तुम्ही कन्सिलर करताना पिवळ्या शेडचा उपयोग करत असाल तर त्याला झाकणे यामध्ये अधिक सोपे होऊन जाते. कारण पिवळ्या रंगाला प्रोटेक्ट करण्याचे काम बनाना पावडर करते. अनेक प्रोफेनल हे बनाना पावडरचा उपयोग करतात. कारण त्याच्यामुळे चेहऱ्याला एक सेटल असा रंग मिळतो. पण ज्यांची त्वचा फारच उजळ असेल अशांनी याचा वापर केल्यानंतर त्यांचा चेहरा हा अधिक काळवंडलेला दिसतो. त्यामुळे तुम्ही जर घरगुती मेकअपसाठी विचार करत असाल तर तुमच्यासाठी सेटिंग पावडरच उत्तम आहे

संत्र्याची साल ठेवा जपून.. कारण संत्र्याच्या सालीचे आहेत भरपूर फायदे

 

आता या तुम्ही तुमच्या वापरानुसार करा याची निवड आणि दिसा सुंदर!

Read More From Make Up Products