बॉलीवूड

शाहिद कपूर साकारणार आता महाभारतातील ‘कर्ण’

Trupti Paradkar  |  Jan 18, 2021
शाहिद कपूर साकारणार आता महाभारतातील ‘कर्ण’

बॉलीवूडचा ‘कबिर सिंह’ आता महाभारतातील कर्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. या प्रोजेक्टसाठी शाहिद कपूरची दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरासोबत बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश ओमप्रकाश मेहरा लवकरच महाभारतातील आयकॉनिक पात्र कर्णाच्या जीवनावर आधारित एक मेगा बजेट चित्रपट तयार करणार आहेत. ज्यामध्ये शाहिद कपूर मुख्य पात्र कर्णाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कर्णाच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.  हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वात मोठा आणि बिग बगेट प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटाबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नसली तरी आता यातून शाहिदच्या अभिनयाचा एक नवा अवतार प्रेक्षकांसमोर येणार हे मात्र नक्की. 

शाहिदसाठी असणार ही आव्हानात्मक भूमिका

‘रंग दे बसंती’ फेम दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच महाभारतावर आधारित एक मोठा एक्सपरिमेंट बॉलीवूडमध्ये करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून राकेश मेहरा यांना सुर्यपूत्र कर्णावर एक चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटात महाभारत कर्णाच्या नजरेतून दाखवलं जाणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा याचं हे ड्रिम प्रोजेक्ट असेल. महाभारतात सुर्यपूत्र कर्णावर जास्त प्रकाश कधीच टाकण्यात आला नाही.  शिवाय हा एक मेगा बजेट प्रोजेक्ट असणार आहे. यासाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांना आता यासाठी निर्माता सुद्धा मिळाला आहे. ज्यामुळे या वर्षी लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा शाहीद अथवा राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आजवर कर्णावर आधारित कोणताच चित्रपट तयार झालेला नाही. त्यामुळे या चित्रपटामधून एक वेगळा दृष्टीकोण महाभारतातबाबत दाखवला जाण्याची शक्यता आहे.

महाभारतातील कर्णाची बाजू मांडणारा चित्रपट

कर्ण हा सुर्य आणि कुंतीचा पुत्र होता. कुंतीने सुर्यदेवाकडून वरदान मागून त्याला मागून घेतला होता. सुर्यपुत्र असल्यामुळे कर्माच्या अंगावर जन्मतःच अभेद्य कवच आणि कुंडले होती. मात्र कुमारी माता झाल्यामुळे कुंतीने समाजाच्या भितीमुळे त्याला लहानपणीच गंगा नदीत सोडून दिलं होतं. राधा नावाच्या एका स्त्रीने कर्णाला लहानाचा मोठा केला होता ज्यामुळे त्याला सुर्यपूत्र, कुंतीपुत्र, राधेय या नावांनी ओळखलं जातं. कर्ण दुर्योधनाचा परममित्र होता. मैत्रीमुळे त्याने महाभारतातील युद्धात पांडवाच्या विरोधात कौरवाची साथ दिली. महाभारतात कर्णाला अर्जुनाच्या बाणामुळे वीरगती प्राप्त झाली. हा एवढाच कर्णाचा परिचय या कथानकात सापडतो. मात्र कर्णाचं व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं याबाबत जास्त विचारमंथन केलं जात नाही. यासाठीच दानशूर कर्णाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.

शाहिदच्या चाहत्यांना आहे जर्सीची प्रतिक्षा

शाहिद कपूरला यंदा एका खेळाडूच्या रूपातही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कारण  त्याच्या जर्सी या चित्रपटाचं नुकतंच शूटिंग पूर्ण झालं आहे. जर्सीनंतरच शाहीद ओमप्रकाशच्या कर्णच्या शूटिंगला सुरूवात करणार अशी चर्चा आहे. जर्सी या वर्षी दिवाळीच्या शुभमुहुर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. ज्यामध्ये शाहीद एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. एक अतिशय प्रतिभावंत मात्र काही कारणांमुळे यश न मिळू शकलेल्या क्रिकेटरची ही कहाणी आहे. जो वयाच्या तिसाव्या वर्षी भारतीय क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतो. कारण त्याच्या मुलाला त्याला पुन्हा खेळताना पाहायचं असतं. विशेष म्हणजे या चित्रटात शाहिदसोबत त्याचे वडील पंकज कपूरदेएखील त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत  असणार आहेत. दिवाळीत पाच नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.  

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ह्रतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा ‘फायटर’असणार या वर्षीचा बिग बजेट चित्रपट

लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार ‘नागिन’ फेम मौनी रॉय

गंगूबाई काठियावाडीनंतर आलिया झळकणार भन्सालीच्या आणखी एका चित्रपटामध्ये

Read More From बॉलीवूड