बॉलीवूड

Oscars 2022: शेरनी आणि सरदार उधम सिंह या चित्रपटांना मिळाले नामांकन

Trupti Paradkar  |  Oct 22, 2021
Oscars 2022: शेरनी आणि सरदार उधम सिंह या चित्रपटांना मिळाले नामांकन

चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 94 वा अॅकेडमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार (Oscars 2022) च्या तयारीची  जोरदार सुरुवात झाली आहे. या पुरस्कारासाठी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जवळजवळ चौदा भारतीय चित्रपट निवडले आहेत. हिंदीसह निरनिराळ्या भाषेतील चौदा चित्रपट निवडण्यात आले असून त्यामध्ये विद्या बालनचा शेरनी आणि विक्की कौशलच्या सरदार उधम या चित्रपटांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांची चर्चा सुरू झाली होती. प्रदर्शित झाल्यावरही या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळे आता या दोन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट भारताला ऑस्कर मिळवून देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित

कशी असणार निवड प्रक्रिया

ऑस्करसाठी निवडण्यात आलेल्या चौदा चित्रपटांमध्ये हिंदीसह भारतातील इतर भाषेमधील चित्रपटांचा समावेश आहे. यानंतर पंधरा सदस्यांची समिती या चौदा चित्रपटामधून एक चित्रपट निवडणार जो भारताकडून ऑक्सर नामांकनासाठी पाठण्यात येणार आहे. या वर्षी ऑस्करसाठी बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या कॅटेगरीतून चित्रपट पाठवला जाणार आहे. यासाठी शेरनी आणि सरदार उधमसह या चौदा चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. या लिस्टमध्ये फक्त त्याच चित्रपटांची निवड करण्यात आली आहे जे मार्च 2021 नंतर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे आता या कॅटगरीत निवड झालेल्या या दोन चित्रपटांमधून भारताला ऑक्सर मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Bigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम

कधी असेल ऑस्कर पुरस्कार सोहळा

मागच्या वर्षी कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता. मात्र आता 94 वा ऑस्कर पुरस्कार मार्चमध्ये आयोजित केला जाणार आहे. ज्यामुळे पुन्हा सर्वांना नेहमीप्रमाणे या पुरस्काराचा आनंद नक्कीच घेता येण्याची शक्यता आहे. भारतातून निवडण्यात येणाऱ्या चित्रपटांचे स्क्रिनिंग कलकत्तामधील बिकोली थिएटरमधून होणार आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये साजरा होणार आहे. 27 मार्च 2022 ला होण्याऱ्या या पुरस्काराचे वेध आताच प्रेक्षकांना लागलेले आहेत. मागच्या वर्षी मल्याळी चित्रपट जल्लीकट्टूला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते मात्र ऑक्सर ज्युरींच्या फायनल लिस्टमध्ये तो येऊ शकला नाही. त्यामुळे आता शेरनी आणि उधम सिंहमुळे भारतीयांच्या आशा ऑस्करसाठी पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता यापैकी कोणता चित्रपट भारताला ऑस्कर मिळवून देणार हे पाहणे उत्सुकता वाढवणारे आहे.

Bigg Boss Marathi: उत्कर्ष आणि जय खेळतात रडीचा डाव, प्रेक्षक नाराज

Read More From बॉलीवूड