मनोरंजन

लॉकडाऊनमध्ये शिल्पा शेट्टीचे कुटुंब घरात राहून करत आहे धमाल

Leenal Gawade  |  Apr 29, 2020
लॉकडाऊनमध्ये शिल्पा शेट्टीचे कुटुंब घरात राहून करत आहे धमाल

लॉकडाऊनचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला थोडासा ‘शिल्पा शेट्टी कुंद्रा’ ब्रेक घेण्याची गरज आहे. आता हा नवा ब्रेक फंडा काय आहे असे विचाराल तर तुम्हाला सांगायला आवडेल की, शिल्पा शेट्टी घराबाहेर पडता येत नाही याचे दु:ख कवटाळून न बसताच घरात राहून धमाल करत आहे. आता ही मजा म्हणजे ती तिच्या सोशल मीडियावर मस्त मस्त व्हिडिओ शेअर करत असते.आतापर्यंत तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये तिचा नवरा,मुलगा, सासू, बहीण शमिता यांना पाहिलेच असेल. पण शिल्पा शेट्टीचा मुलगा सोशल मीडियावर जास्त भाव खावून जात आहे. कारण त्याची अभिनयातील चुणूक या निमित्ताने सगळ्यांना जास्त पाहायला मिळत आहे. सध्या कुंद्रा कुटुंबाचा हा नवा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच चालत आहे.

कोरोनामुळे सेलिब्रिटी लग्नंही लांबणीवर

घरचे महाभारत

सध्या टीव्हीवर जुन्या मालिका सुरु आहेत. रामायण, उत्तर रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिकांनी लोकांना पुन्हा एकदा वेड लावले आहे. कुंद्रा कुटुंबियही महाभारताचे फॅन असावे कारण त्यांनी घरातील महाभारताचा एक वेगळाच सीन रंगवला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा आणि तिचा मुलगा या व्हिडिओमध्ये भन्नाट अँक्टींग करताना दिसत आहे. आईचे गुण मुलामध्ये पूर्णपणे उतरले आहेत. हे त्याचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपोआपच लक्षात येते.  हा व्हिडिओ जरी तिने तीन दिवसांपूर्वी शेअर केला असला तरी हा व्हिडिओ सध्या सगळीकडे अधिक वायरल होत आहे. 

घरातच केली आहे शेती

आता घराबाहेर पडता येणार नाही म्हटल्यावर घरात राहून चांगला वेळ घालवायला हवा आणि मुलालाही त्यामध्ये गुंतवून ठेवत चांगल्या सवयी लावायल्या हव्यात. म्हणूनच ती घरी मुलांसोबत जास्तीजास्त वेळ घालवत आहे. तिने घरी लावलेल्या भाज्यांचीही एकदा व्हिडिओच्या माध्यमातून टूर घडवली असून मुलासोबत ती तिच्या बागेतून वांगी तोडताना दिसत आहे. त्यामुळे तिने घरीच शेती करत मुलालाही यातून धडे दिले आहेत. 

बिगबॉस विजेत्याचे लॉकडाऊनमध्ये लग्न, टेरेसवर पार पडला सोहळा

नुकतीच झाली समिशाची आई

सरोगसीच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीला हल्लीच मुलगी झाली आहे. तिने तिच्या मुलीचे नाव समिशा ठेवले असून तिचा चेहरा तिने अद्यापही कोणाला दाखवला नाही. समिशा संदर्भातील एक पोस्ट शेअर करताना तिने ही आनंदाची बातमी फॅन्सपर्यंत पोहोचवली होती. तिने या नंतरही काही फॅमिली फोटो शेअर केले पण त्यामध्येही तिने मुलीचा चेहरा दाखवणे कटाक्षाने टाळले आहे.

फिटनेस फंडा सुरु

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. आता घरात असल्यामुळे तिचा वेळ इतरांप्रमाणे मुलांना सांभाळण्यात जात आहे. पण तरीही ती घरातल्या कामांमधूनच फिटनेस करा राखायचा याच्या सोप्या टिप्सही सगळ्यांना देत आहे. त्यामुळे एकूणच तिचा वेळ मस्त सुरु आहे. 

आता जर तुम्ही शिल्पाचा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहा

शहनाजला झेलणे फारच कठीण, पारस छाबडाने केले विधान

Read More From मनोरंजन