बॉलीवूड

12 वर्षानंतर शिल्पा शेट्टी करणार कमबॅक… लवकरच करणार घोषणा

Leenal Gawade  |  Jun 19, 2019
12 वर्षानंतर शिल्पा शेट्टी करणार कमबॅक… लवकरच करणार घोषणा

बॉलीवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसला घेऊन नेहमीच किती जागरुक असते ते सांगायला नको. पण लग्नानंतर चित्रपटांकडे पाठ फिरवलेल्या शिल्पाने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 12 वर्षानंतर शिल्पा शेट्टी चित्रपटात दिसणार असल्याचा आनंद तिच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. पण हा नवा प्रोजेक्ट नेमका कोणता आहे. यासाठी मात्र आपल्याला शिल्पाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहेhttps://marathi.popxo.com/2019/06/pakistani-cricketer-shoaib-akhtar-wanted-to-kidnap-bollywood-actress-in-marathi/

कमबॅकबद्दल काय म्हणाली शिल्पा

Instagram

एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने चित्रपटात कमबॅक करण्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. ती म्हणाली की, माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आली असून मी ती करण्याच्या विचारात आहे. लवकरच या संदर्भातील घोषणा मी माझ्या चाहत्यांसाठी करणार आहे. असे शिल्पाने सांगितले आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी चित्रपटात पुन्हा येत आहे हे नक्की!

हा पाकिस्तानी क्रिकेटर करणार होता या अभिनेत्रीचे अपहरण

 

शिल्पाने प्रोजेक्टबद्दल पाळली आहे कमालीची गुप्तता

आता शिल्पाने तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला आहे. तिला कोणाकडून ही नवी स्क्रिप्ट ऑफर करण्यात आली आहे. याची माहिती मात्र तिने देणे टाळले आहे. पण इतक्या वर्षांनी चित्रपटात काम करण्याचा तिने निर्णय घेणे म्हणजेच तिच्याकडे एखादी तगडी स्क्रिप्ट असल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे आता हा मोठा प्रोजेक्ट असावा असे सध्या तरी वाटत आहे. पण  सध्या तरी आपल्याला वाट पाहण्यावाचून गत्यंतर नाही. 

Instagram

हा होता शेवटचा चित्रपट

शिल्पा शेट्टीने तिच्या उमेदीच्या काळात अनेक हिट चित्रपट केले आहे. 2009 साली तिने बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले आणि चित्रपटांपासून ती थोडी दुरावलीच. लाईफ इन मेट्रो नावाचा तिचा तसा शेवटचा चित्रपट त्यानंतर ती चित्रटातून दिसली नाही. पण चित्रपटातून काम  करत नसली तरी तिने हे क्षेत्र सोडले नव्हते. तिने या काळात अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम केले. सुपर डान्सर, नच बलिये अशा काही रिअॅलिटी शोमध्ये तिने जज म्हणून काम केले आहे. शिवाय ती लहान मुलांसाठी काही कुकरी शोज देखील IG टीव्हीवर करत आहे. या शोजला सुद्धा अनेकांची पसंती मिळत आहे.

या विचित्र फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरले हे सेलिब्रिटी

बिग ब्रदरची ठरली होती विजेती

Instagram

सध्या देशात सुरु असलेला सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. हा कार्यक्रम आणि त्याची कॉन्सेप्ट बिग ब्रदर या परदेशातील रिअॅलिटी शोमधून घेण्यात आली आहे. बिग ब्रदर या शोमध्ये शिल्पा शेट्टीने देशाचे नेतृत्व केले होते. हा शो ती जिंकली होती. त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक वेगळी ओळख मिळाली.

बाजीगर मधून केली करिअरला सुरुवात

Instagram

शिल्पा शेट्टीने सुपरहिट ठरलेल्या बाजीगर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा या चित्रपटातील रोल हा फार मोठा नसला तरी अत्यंत महत्वाचा होता. या चित्रपटानंतर शिल्पा शेट्टी कधीच थांबली नाही. तिने एका पेक्षा एक चांगले असे चित्रपट केले. त्यामुळे तिचे बॉलीवूडमधील स्थान अढळ आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिला फिटनेसची आवड असल्यामुळे ती तिचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे अनेक योगा व्हिडिओ परदेशातही प्रसिद्ध आहेत.

या कारणासाठी आलियाला सोडावे लागले ब्रम्हास्रचे शुटींग

Read More From बॉलीवूड