Recipes

रामनवमीच्या उपवासाला करा शिंगाड्याच्या पिठाचा हलवा

Dipali Naphade  |  Apr 19, 2021
रामनवमीच्या उपवासाला करा शिंगाड्याच्या पिठाचा हलवा

दरवेळी उपवासाला नक्की काय खायचे असा प्रश्न सर्वांनाच असतो. तेच तेच पदार्थ खायचा आणि करायचाही कंटाळा आलेला असतो. राम नवमी (Ram Navmi) म्हटलं की, अनेक जणांचे उपवास असतात. मग साबुदाणे वडे अथवा उपवासचे अनेक पदार्थ घरात बनविण्याचा घाट घातला जातो. उपाशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे म्हण आहे ती आपण नेहमीच सिद्ध करत असतो. पण या वर्षी रामनवमीच्या दिवशी तुम्ही उपवासाला आणि राम नवमीचा नेवैद्या म्हणून खास शिंगाड्याच्या पिठाचा हलवाही करू शकता. आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की, शिंगाड्याचा पिठाचा हलवा कसा करायचा? पण हा हलवा तयार करणं अत्यंत सोपं आहे.  शिंगाडा उपवासाला शिजवून खाल्ला जातो. मात्र त्याचा हलवादेखील तितकाच चविष्ट लागतो. याची रेसिपी जाणून घेऊया. 

साहित्य –

उपवासाची रेसिपी बनवा घरी, खमंग पदार्थ रेसिपी (Upvasache Recipes In Marathi)

शिंगाड्याच्या पिठाचा हलवा तयार करण्याची कृती

नवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव

शिंगाड्याच्या पिठाचे फायदे

उपवासाला खाण्यात येणाऱ्या या शिंगाड्याच्या पिठाचे अनेक फायदे आहेत. आपल्या आरोग्यासाठीही हे शिंगाड्याचे पीठ उपयुक्त ठरते. शरीराला जर त्वरीत ऊर्जा हवी असेल तर शिंगाड्याचा फायदा होतो. उपवासात आपण लंघन करतो आणि त्यामुळे काहीही न खाता पिता शरीरातील ऊर्जा कमी होतो. शिंगाड्याच्या पिठामुळे तुम्हाला दिवसभर ही ऊर्जा व्यवस्थित मिळते. तसंच यामध्ये जिंक, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम असे अनेक पोषक तत्व असल्यामुळे शरीरामधील ऊर्जा व्यवस्थित दिवसभर टिकून राहाते. म्हणूनच उपवासाला शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ खाणे उत्तम ठरते. 

शिंगाड्याच्या पिठामध्ये उच्च प्रमाणात फायबर असते. फायबर पचवायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे शिंगाड्याच्या पिठाने पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते. उपवासात भूक लागत नाही. म्हणूनच याचे सेवन करावे. शिंगाड्याचे पीठ हे विटामिनने समृद्ध असते.  तसंच या पिठामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन बी6, आयोडिन, तांबे याचाही भरणा असतो. जो आरोग्यासाठी पोषक ठरतो. यामुळे शरीरातील रक्तदाबाचे त्रास कमी होण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे तेदेखील उपवास करून शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ खाऊ शकतात. तसंच हृदयाशी संबंधित आजारांवरही शिंगाड्याच्या पिठाचा उपयोग करून घेता येतो. यामध्ये असणारे पोषक तत्व हे बहुतांशी आजारावर उपयोगी ठरतात. तसंच पचण्यास हलके असून बराच काळ पोट भरलेले राहते. त्यामुळे पोटालाही याचा त्रास होत नाही. सतत भूक लागत नाही. 

उपवास करत आहात, तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि नुकसान (Benefits Of Fasting In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes