खाणंपिण आणि नाइटलाईफ

या कारणासाठी लागला होता ‘कॉर्नफ्लेक्स’ चा शोध

Leenal Gawade  |  Aug 28, 2019
या कारणासाठी लागला होता ‘कॉर्नफ्लेक्स’ चा शोध

सकाळी नाश्तासाठी दुधात कॉर्नफ्लेक्स घालून खायला अनेकांना आवडतं. पण तुम्ही खात असलेल्या कॉर्नफ्लेक्सबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? म्हणजे या कॉर्नफ्लेक्सचा शोध का लागला हे तुम्हाला माहीत आहे का? नाही का? मग आज जाणून घेऊया कॉर्नफ्लेक्सचा इतिहास. याचा इतिहास ऐकून नक्कीच तुम्हालाही आश्यचर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

असा लागला कॉर्नफ्लेक्सचा शोध

shutterstock

डॉक्टर जॉन हार्वली केलॉग यांनी 19 व्या शतकात कॉर्नफ्लेक्सचा शोध लावला. हा शोधही अपघाताने लागला. पेशाने डॉक्टर असलेले केलॉग एका रुग्णांना काय खायला द्यायचे याच्या शोधात होते. त्यांचा मोठा भाऊ आणि त्यांनी घरात शिजलेले गहू तसेच ठेऊन दिले आणि ते त्यांच्या कामासाठी निघून गेले. पण ते जेव्हा घरी परतले त्यावेळी शिजलेले गहू कडक झालेले होते. त्यांना वाटले की, टणक झालेले गहू लाटून त्याचा गोळा करता येईल. पण तसे झाले नाही. उलट त्याचे फ्लेक्स पडले. गव्हाचे हे फ्लेक्स त्यांनी त्यांच्या रुग्णांना खायला दिले. त्यानंतर त्यांनी मक्यासोबत हा प्रयोग केला जो गव्हापेक्षा जास्त फायद्याचा होता. अशा प्रकारे अपघाताने लागला कॉर्नफ्लेक्सचा शोध 

इडली-सांबार खा वजन कमी करा

कॉर्न फ्लेक्सचा शोध यासाठी

आता तुम्ही म्हणाल हा प्रयोग केलॉग कशासाठी करत होते. पूर्वीच्या काळी म्हणजे औषधांचा शोध लागण्यापूर्वी सॅन्टोरिअम ही अशी जागा होती ज्या ठिकाणी दीर्घ आजाराने झुंजणाऱ्या रुग्णांना ठेवले जायचे. शारीरिक भूक क्षमवण्यासाठी या कॉर्नफ्लेक्सची मदत व्हायची कारण या कॉर्नफ्लेक्समुळे हस्तमैथुन करण्याची इच्छा मरुन जाते. शिवाय सेक्सची इच्छाही कमी करते. त्यामुळे तुम्ही खात असलेल्या कॉर्नफ्लेक्सचा शोध हा खरंतरं या कारणासाठी लावण्यात आल्या होता. 

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट

आता एक मोठा ब्रँड

shuttrstock

 डॉक्टर केलॉग यांनी स्वत:च्या नावाने एक ब्रेकफास्ट सिरिअल सुरु केले. साधारण 1856 पासून हे बाजारात आहे. आजही केलॉग कॉर्नफ्लेक्स याच नावाने अनेक जण ब्रेकफास्ट सिरिअल ओळखतात. आता कित्येक मोठ्या ब्रँडचे कॉर्नफ्लेक्स आले असतील पण हे ओरिजनल ते नेहमी ओरिजनल असतं म्हणा. म्हणून केलॉग हा एक नवा ब्रँड झाला आहे. लोकांना फक्त याच नावाने ब्रेकफास्ट सिरिअल मिळते असे वाटते. म्हणूनच आजही बाजारात गेल्यावर ते कॉर्नफ्लेक्सची मागणी करत नाहीत तर केलॉग्स द्या असंच म्हणतात. आता तुम्हाला या ब्रँडची महती कळालीच असेल.

मांड्यांचा काळपटपणा दूर करायचा असल्यास, जाणून घ्या सोपे उपाय

आता कॉर्नफ्लेकसचे वेगवेगळे प्रकार

सध्या बाजारात वेगवेगळे ब्रेकफास्ट सिरिअल मिळतात. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हे ब्रेकफास्ट सिरिअल मिळतात. आधी फक्त प्लेन फ्लेवरमध्ये मिळणारे कॉर्नफ्लेक्स आता मात्र हनी, ऑलमन्ड, स्ट्रॉबेरी, बनाना अशा फ्लेवरमध्ये मिळतात. फ्लेवर असलेले कॉर्नफ्लेकसही अनेकांच्या आवडीचे आहेत. याशिवाय बाजारात ब्रेकफास्ट सिरिअलचे शेकडो प्रकार असतील. पण त्यामध्ये कायम उठून दिसतात ते म्हणजे कॉर्नफ्लेक्स.. दुधात साखर किंवा मध घालून कुरकुरीत आणि पोटभरीचे कॉर्नफ्लेक्स खाल्ले जातात. 

मग तुम्हाला कशी वाटली कॉर्नफ्लेक्सच्या निर्मितीची कहाणी आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या पदार्थाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे ते देखील आम्हाला नक्की कळवा…. आणि हो रोज सकाळी तुमचे कॉर्नफ्लेक्स खायला विसरु नका.

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ