आरोग्य

गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Oct 12, 2020
गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण

कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे सर्वजण लिंबू पाण्याचा माराच शरीरावर करताना दिसतात.  लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते तुमच्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर आहे. मात्र कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेतल्यास शरीरावर त्याचा दुष्पपरिणामच होतो. अगदी त्याचप्रमाणे अती प्रमाणात लिंबू पाणी पिणं देखील शरीरासाठी योग्य नाही. सकाळी उठल्यावर  एकदा कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे अथवा जेवणानंतर लिंबू पाणी पिणे यात काहीच गैर नाही. मात्र तुम्ही सतत पाण्याप्रमाणे लिंबू पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण लिंबू पाण्याच्या अती सेवनामुळेही तुम्हाला गंभीर शारीरिक त्रास जाणवू शकतात. 

Shutterstock

अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्याने शरीरावर काय परिणाम होतो –

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात यावर शोध लावण्यात आला आहे. 

दातांचे आरोग्य बिघडते –

लिंबू पाणी पिल्यानंतर दातांमध्ये आंबटपणा जाणवतो. याच कारणामुळे एका संशोधनानुसार काही महिलांमध्ये अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्यामुळे दात खराब झाल्याचे दिसून आले आहे. लिंबातील सायट्रिक अॅसिडमुळे दातांवरील आवरण खराब होत जाते. यासाठीच लिंबू पाणी प्रमाणात प्या आणि लिंबू पाणी पिल्यानंतर लगेचच दात ब्रश करा. त्याचप्रमाणे दातांचे आरोग्य राखण्यासाठी शक्य असल्यास स्ट्रॉ ने लिंबू पाणी प्या. ज्यामुळे लिंबू पाण्याचा थेट सबंध दातांसोबत येणार नाही. 

Shutterstock

सनबर्न होण्याची शक्यता –

उन्हात असताना उन्हाची काहिली कमी करण्यासाठी बऱ्याचदा थंडगार लिंबू पाणी पिणे  अनेकांना खूप आवडते. मात्र असं केल्यामुळे तुमच्या  त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. लिंबाच्या रसातील केमिकल्सचा सुर्यप्रकाशासोबत सबंध येतो आणि त्वचा काळवंडू लागते. आबंट फळे अथवा लिंबू पाणी अती प्रमाणात पिण्यामुळे त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही अनेक उदाहरणे संशोधनात सापडली आहेत. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी लिंबू पाणी बेतानेच प्या.

पोट दुखी आणि उलटी होणे –

लिंबातील व्हिटॅमिन सीचे प्रमाणात शरारात अती प्रमाणात झाले तर त्यामुळे पोटात अधिक प्रमाणात अल्मली स्त्राव निर्माण  होतो आणि अॅसिडिटीची समस्या वाढते. अशा लोकांना लिंबू पाणी पिल्यानंतर पोटदुखी, छातीत जळजळ, मळमळ, उलटी, जुलाब अशा प्रकारचा त्रास जाणवतो. गॅस्ट्रोइसोफेगेल रिफ्लक्सचा त्रास असलेल्या रूग्णांना यासाठीच लिंबू पाणी पिण्यास मनाई करण्यात येते.

Shutterstock

तोंडाचा अल्सर अथवा तोंड येणे –

तोंडात अल्सरचे फोड येणे यालाच काहीजण तोंड येणं असंही म्हणतात. अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्यामुळे तुम्हाला वारंवार तोंड येण्याचा त्रास जाणवतो. लिंबू पाण्यातील सायट्रिक अॅसिडमुळे तोंडातील त्वचापेशींना सूज आणि जळजळ जाणवते. वारंवार तोंड येणे त्रास जाणवल्याने खाण्यास आणि बोलण्यास त्रास होऊ शकतो.  

मायग्रेनचा त्रास वाढू शकतो –

जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर लिंबू पाण्यापासून दूरच राहा. कारण अती प्रमाणात लिंबू पाणी पिण्याने तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. आंबट फळांमुळे मायग्रेनचा त्रास वाढतो हे काही संशोधनात सिद्ध करण्यात आले आहे. 

लिंबू पाणी पिण्याचे योग्य प्रमाण –

तुमच्या वय आणि आरोग्य स्थितीवर तुम्ही किती प्रमाणात लिंबू पाणी प्यावे हे ठरू शकते. त्यामुळे किती प्रमाणात लिंबू पाणी पिणे योग्य हे नक्कीच सांगता येणार नाही. पण  साधापणपणे तुम्हाला वर दिलेले कोणतेही त्रास नसतील तर दिवसभरात एक किंवा दोन ग्लास लिंबू पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा – 

हे खाद्यपदार्थ एकत्र खाण्यामुळे कमी होऊ शकते प्रतिकारशक्ती, वेळीच व्हा सावध

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

त्वचेवर उठणारे पुरळ हेदेखील कोरोना संसर्गाचे लक्षण, तज्ज्ञांचे मत

Read More From आरोग्य