पालकत्व

लहान मुलांना कधीच जबरदस्ती अन्न भरवू नका, जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Jul 14, 2022
लहान मुलांना कधीच जबरदस्ती अन्न भरवू नका, जाणून घ्या कारण

मुलांचे संगोपन ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. पालकांना मुलांना सांभाळण्यासोबत, त्यांच्या आहाराकडे, मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाकडे पुरेसं लक्ष द्यावं लागतं. कारण मुलं जे खातात त्याचा परिणाम त्यांच्या शरीर आणि मनावर होत असतो. मात्र बऱ्याचदा पालक यासाठी मुलांची इच्छा नसताना अथवा त्यांचे पोट भरलेलं असतानाही जबरदस्ती अन्न भरवतात.  ज्यामुळे आजकाल मुलं अति प्रमाणात लठ्ठ होताना दिसतात. मुलांना जबरदस्ती अन्न भरवण्यामुळे त्यांच्या मनावर चुकीचे परिणाम होतात. अनेक आरोग्य समस्या यातून निर्माण होतात. यासाठीच जाणून घ्या लहान मुलांना जबरदस्ती अन्न भरवण्याचे दुष्परिणाम यासोबतच वाचा मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home), 1 वर्षाच्या बाळाचा आहार | 1 Year Old Baby Food In Marathi, बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi)

मुलांना जबरदस्ती भरवण्याचे दुष्परिणाम

मुलांना भुक असेल तेव्हाच अन्न द्यायला हवं. भुक नसताना अथवा तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही मुलांना अति अन्न जबरदस्तीने भरवत असाल.  तर जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम काय होतात.

पचन क्रिया बिघडते

ज्या मुलांना जबरदस्ती अन्न भरवलं जातं त्यांची पचनसंस्था बिघडते. कारण जेव्हा तुम्ही मुलांना जबरदस्ती अन्न भरवता तेव्हा ते न चावता घास गिळून टाकतात. असं अन्न पचण्यास जड असतं, ज्यामुळे मुलांची पचनक्रिया बिघडू शकते. अशा मुलांना सतत पोटात दुखणे, अॅसिडिटी अथवा अपचनाच्या समस्या होतात. 

लठ्ठपणा

आजकाल लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसत आहे. अति खाण्यामुळे मुलं आजकाल लठ्ठ होतात. जास्त अन्न पोटात गेल्यामुळे मुलांच्या शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढते. शिवाय मुलं जर शारीरिक हालचाल जास्त करत नसतील तर त्यांना लहानपणीच अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतं. आजकाल मुलांना यामुळेच लहानपणी मधुमेह अथवा ह्रदयाच्या समस्या दिसून येतात. 

यावर उपाय काय

तुमच्या मुलांची प्रकृती ठणठणीत राहावी. निरोगी आणि सुदृढ आरोग्य त्यांना मिळावं असं वाटत असेल तर मुलांच्या आहाराकडे नीट लक्ष द्या. मुलांना जबरदस्ती अन्न भरवण्यामुळे त्यांच्या मनावर चुकीचा परिणाम होतो. यासाठी मुलांना प्रमाणात, संतुलित आणि पोषक आहार द्या. आजकाल मुलांना फास्टफूड खूप आवडतं. जे खाण्यामुळे त्यांचे मुळीच पोषण होत नाही. म्हणून मुलांना अन्नाचे महत्त्व पटवून द्या. ज्यामुळे त्यांना अन्नातून होणारे शारीरिक पोषणाचे महत्त्व समजेल आणि ते पोषक आहार घेतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व