लग्नाचा सीझन सुरु झाला की, साडी लेहंग्याचे वेगवेगळे ट्रेंड दिसू लागतात. पारंपरिक साड्या, डिझायनर साड्या, लेहंगा यामध्ये नेहमीच व्हरायटी पाहायला मिळते. फ्रेश रंग, कलाकुसरीतला बदल, वेगवेगळे पॅटर्न अशी काही विविधता यामध्ये पाहायला मिळते. 2020 चा बराचसा काळ हा लॉकडाऊनमध्ये गेला असला तरी देखील आता जी लग्न होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने एक ट्रेंड दिसून येत आहे. हा ट्रेंड आहे सिलव्हर काठाच्या साड्या आणि ऑक्सिडाईज ज्वेलरीचा. आतापर्यंत अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला असून हा नवा ट्रेंड नक्कीच ट्राय करण्यासारखा आहे असे म्हणावे लागेल.
उंची कमी असेल तर अशी करा साड्यांची निवड, दिसाल उंच
सिलव्हर काठ किंवा बॉर्डरच्या साड्या
कांजिवरम, पैठणी किंवा पारंपरिक आणि जाड काठांच्या साड्या या हल्ली सिलव्हर काठ किंवा जरीमध्ये मिळतात. या दिसायला फारच सुंदर दिसतात. चंदेरी काठाच्या साड्या या रॉयल आणि रिच लुक देतात. ज्यांना गोल्डन काठ फार गॉडी वाटत असेल तर तुम्ही या साड्या ट्राय करायलाच हव्यात. नऊवारी साड्या या अशा साड्यांमध्ये अधिक चांगल्या दिसतात. नऊवारी साड्यांमध्ये जर तुम्ही रंग निवडण्याचा विचार करत असाल तर गडद रंगाची निवड करा. कारण सिलव्हर काठ हे जांभळा, राणी, गडद पिवळा अशा रंगामध्ये अधिक चांगल्या दिसतात. खुलूनही येतात. पैठणी,नारायण पेठ आणि कांजिवरम अशा साड्यांमध्ये असा प्रकार सहज उपलब्ध आहे. याची रेंज साधारण 2 हजारपासून सुरु होते. या साड्यांवरील काठ, बुट्टी यानुसार त्याची किंमत वाढत जाते.
लग्नसराईसाठी वापरा वेलवेटचे ड्रेस आणि दिसा स्टायलिश
ऑक्सिडाईज ज्वेलरी
लग्नात सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड फारच कमी झाला आहे. लग्नासारख्या कार्यक्रमातही खरं सोनं घालायला अनेकांना आवडत नाही. त्यापेक्षा इमिटेशन ज्वेलरी घालण्याकडे अनेकांचा कल असतो. अशामुळेच कुंदन ज्वेलरीचे अनेक प्रकार लेहंगा किंवा साडीवर घातले जातात. जे साध्या साडीचाही लुक एकदम रिच करतात. पण आता सिलव्हर काठांच्या साडीवर ऑक्सिडाईज ज्वेलरी घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे सिल्व्हर दागिने हे अधिक घातले जातात. यामध्ये मिळणाऱ्या ठुशी, कोल्हापुरी साज, बाजूबंद, मेखला, पैंजण असे अधिक घातले जात आहेत आणि त्यामुळेच त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स हल्ली पाहायला मिळत आहे. ऑक्सिडाईज ज्वेलरी या तुलनेने स्वस्त असतात. शिवाय त्या नाजूकही नसतात. तुम्ही अगदी कसेही त्याला हाताळू शकता. बजेटमध्ये बसणारे आणि ट्रेंडनुसार सुंदर दिसणारे असे हे दागिने असल्यामुळे ती ते ट्राय करायलाच हवे.
अशी करा स्टायलिंग
लग्नासाठीच नाही तर तुम्ही इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी अशा साड्यांची निवड करु शकता. एखाद्या लग्नसमारंभासाठी जर तुम्ही हा लुक करण्याचा विचार करत असाल तर यावरील ब्लाऊजमध्ये व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही इव्हिनिंग लुकचा विचार करत असाल तर स्लिव्हलेस ब्लाऊज ट्राय करु शकता. जर तुम्ही नवरी म्हणून हा लुक करण्याा विचार करत असाल तर सिल्व्हर टोनला जाईल असा भरजरी ब्लाऊज निवडा. त्याच्या हातावर आणि पाठीवर योग्य पद्धतीने कलाकुसर असू द्या म्हणजे तुम्हाला तुमचा आवडता लुक साध्य करता येईल.
आम्ही तुमच्यासोबत या लुकमधील काही फोटो शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच कसा लुक हवा याचा अंदाज येईल.
डेस्टिनेशन वेडिंग बजेटमध्ये करायचे असेल तर असे करा प्लॅनिग