आपल्या घरातील लहान मुलांचे योग्य संगोपन करणं ही घरातील प्रत्येकाची जबाबदारी असते. कारण आजकाल आईवडील नोकरी करणारे असल्यामुळे मुले आजी,आजोबा अथवा आया अथवा नॅनीकडे असतात. मात्र असं असलं तरी मुलांचे चांगले पोषण होत आहे की नाही, मुलांचा योग्य विकास होत आहे की नाही याकडे एक पालक म्हणून तुमचे सतत लक्ष असतेच. मुलांना सांभाळण्यासोबतच त्यांना योग्य वेळी जेवण भरवणं हा एक मोठा टास्क त्यांना सांभाळणाऱ्या लोकांकडे असतो. कारण लहान मुलं सतत खेळणं आणि मस्ती करणे यात दंग असतात.जेव्हा तुम्ही मुलांना जेवण भरवता तेव्हा त्यांना खाण्यात मुळीच रस नसतो. खेळताना अथवा मस्ती करताना मुलं जेवणाचा कंटाळा करतात अथवा तुम्ही त्यांना जबरदस्तीने अन्न भरवू नये यासाठी रडारड करतात. पण एक पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांच्या योग्य पोषणाची नक्कीच काळजी असते. जर तुमची मुलंदेखील जेवताना अशीच मस्ती करत असतील तर त्यांना जेवण भरवताना या टिप्स करा फॉलो.
जाणून घ्या सर्वांसमोर का हट्ट करतात लहान मुलं, करा हे उपाय
पदार्थ सजवून सर्व्ह करा
लहान मुलांना आकर्षक वस्तू अथवा एखाद्या नव्या गोष्टीबद्दल खूप कुतूहल असते. जेव्हा ते ताटात वाढलेले तेच तेच पदार्थ पाहतात तेव्हा त्यांना जेवणाचा कंटाळा येतो. म्हणूनच लहान मुलांनी व्यवस्थित जेवावं यासाठी पदार्थ थोडे डकोरेट करून त्यांना वाढा. जसं की सॅंडविज अथवा पोळीवर सॉसने स्माईली काढून द्या. त्यांच्या आवडीच्या कार्टुनचे आकार त्यांच्या पदार्थांना द्या. ज्यामुळे ते आवडीने जेवतील. मुलांचे ताट जितके रंगीत आणि आकर्षक असेल तितका त्यांना जेवणाबद्दल आनंद वाटेल.
लहान मुलांसमोर असं कधीच वागू अथवा बोलू नका, होईल चुकीचा परिणाम
खेळत खेळत जेवण भरवा
लहान मुलांना जेवण भरवण्याची सोपी युक्ती म्हणजे त्यांना एखादा खेळ खेळत भरवणे. अगदी लहान मुलांना तुम्ही काऊ, चिऊ दाखवत भरवू शकता. पण मुलं जस जशी मोठी होतात तस तसे त्यांचे खेळपण बदलत राहायला हवं. उदा. ताटातले पदार्थ हा एक गेमचा टास्क आहे आणि तो लवकर पूर्ण करणार त्याला बक्षीस मिळणार अशी युक्ती तुम्ही मुलांना भरवताना वापरू शकता. एखादं छान चित्र दाखवत, ते रंगवत तुम्ही मुलांना जेवण भरवू शकता. मुलांना छोटे छोटे गेम्स खेळायला द्या आणि त्यांचा एक टाक्स पूर्ण झाला की एक घास भरवा.
उशीरा का बोलू लागतात मुलं, उच्चार शिकवण्यासाठी या टिप्स आहेत फायदेशीर
मुलांना छान छान गोष्टी सांगा
लहान मुलांना जेवताना गप्पा मारलेल्या खूप आवडतात. त्यामुळे ही संधी तुम्ही तुमच्या मुलांसोबत संवाद साधण्यासाठी वापरू शकता. या माध्यमातून तुम्ही गोष्टी स्वरूपात त्यांना चांगल्या सवयी लावू शकता. आजकाल मुलांना भरवताना मोबाईलवर लहान मुलांची गाणी अथवा स्टोरीज दाखवल्या जातात. पण त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा स्वतःच गोष्टी सांगितल्यामुळे तुमचे मुलांसोबत चांगले बॉंडिग निर्माण होऊ शकते.
आम्ही सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट करून अवश्य कळवा. .येत्या बालदिनाच्या निमित्ताने तुमच्या मुलांना बालदिन शुभेच्छा संदेश नक्की द्या आणि त्यांच्यासाठी वरील गोष्टी नक्की करा.
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar