Oily Skin

तेलकट त्वचा असेल तर टाळावेत हे प्रोडक्टमधील हे घटक

Leenal Gawade  |  Oct 1, 2020
तेलकट त्वचा असेल तर टाळावेत हे प्रोडक्टमधील हे घटक

 

तुमच्या त्वचेचा प्रकार तेलकट असेल तर आजचा हा विषय तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण तेलकट त्वचा कितीही चांगली दिसली तरी त्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. तेलकट त्वचा असणाऱ्यासाठी मेकअप प्रोडक्ट हे फार महत्वाचे असतात. त्यांनी नेमकी कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट वापरायला हवेत आणि कोणते प्रोडक्ट टाळायला हवेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. अगदी रोजच्या मॉश्चरायझरपासून ते नाईट क्रिमपर्यंत तेलकट त्वचेने काय वापरु नये हे आता आपण जाणून घेऊया.

मॉश्चरायझर

Instagram

 

तेलकट त्वचा चमकदार दिसत असली तरी या त्वचेसाठी मॉश्चरायझर हे तितकेच गरजेचे आहे. पण तेलकट त्वचेसाठी कोणतेही मॉश्चरायझर चालत नाही त्यांनी बदाम किंवा कोणत्याही तेलाचा वापर करण्यात आलेले मॉश्चरायझर मुळीच वापरु नये कारण त्यामुळे त्यांची त्वचा ही अधिक तेलकट दिसण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मॉश्चरायझर वापरायचे असेल तर तुम्ही गाजर, तुळस, टी ट्री असे घटक असलेले मॉश्चरायझर निवडा कारण ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. 

घरात राहूनही तुमची त्वचा काळवंडण्यामागे ही असू शकतात कारणं

मेकअप क्लिनझर

 

त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी काम झाल्यानंतर दिवसाअखेरीस मेकअप काढून टाकणे हे प्रत्येकासाठी गरजेचे असते. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मेकअप क्लिनझर वापरताना त्यामध्ये ऑईल बेस असलेले मेकअप क्लिनझर वापरु नये. मिस्लेअर वॉटरमध्येही तेलाचे घटक असलेले क्लिनझर मिळतात अशा किल्नझरचा वापर करणे तुम्ही टाळायला हवे.  जर तुम्ही क्लिन्झिंग मिल्कचा उपयोग करत असाल तर त्याचाही उपयोग केल्यानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ करायला विसरु नका. कारण क्लिन्झिंग मिल्कही तेलकट असते. जर तुमची त्वचा फारच तेलकट असेल तर तुम्ही बेबी ऑईलचाही उपयोग करु नका. कारण त्यामुळेही तुमच्या त्वचेला त्रास होतो.

स्क्रबची निवड

Instagram

 

तेलकट त्वचेच्या अनेक तक्रारी असतात. या त्वचा तेलकट असल्यामुळे चेहऱ्यावर धूळ, माती चिकटते. त्यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स मोठे होतात. पोअर्स स्वच्छ ठेवायचे असतील तर तुम्ही स्क्रबचा वापरही करायला हवा. तेलकट त्वचा ही नाजूक त्वचा असते. त्यामुळे स्क्रबची निवड करताना ते स्क्रब माईल्ड असायला हवे. तुम्ही यासाठी किवी, ओटमिल, कॉफी,काकडी, टोमॅटो अशा स्क्रबचा उपयोग वापर करु शकतो. 

झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा

मेकअपचे साहित्य

 

मेकअपचे साहित्य निवडताना तेलकट त्वचेला अधिक काळजी घ्यावी लागते. तुम्ही निवडलेल्या मेकअप बेसमध्ये कोणत्याही प्रकारचे तेल असता कामा नये. तुमच्यासाठी मेकअप हा चेहऱ्यावर चमकणारा नसावा. तर तो अधिक काळासाठी टिकणारा असावा. त्यामुळे कोणतेही ऑईल बेस्ड प्रोडक्ट मुळीच निवडू नका.

नाईट रुटीन

 

तेलकट त्वचेसाठीही नाईट रुटीन फार महत्वाचे असते. दिवसभरात तुमच्या त्वचेवर साचलेली धूळ आणि तेल काढून टाकणे वेळीच गरजेचे असते. तुम्ही नाईट रुटीनचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ करुन चेहऱ्यासाठी चांगले नाईट क्रिम लावा. नाईट क्रिममध्ये तुम्ही टी ट्रि क्रिम किंवा हर्ब्स असलेले नाईट क्रिम वापरु शकता. तेलकट त्वचेवरील तेल नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. पण तरीही त्वचा नरीश ठेवणेही गरजेचे असते. त्यामुळे नाईट रुटीनमध्ये नाईट क्रिम असायलाच हवे. 

आता तेलकट त्वचा असेल तर तुम्ही प्रोडक्टची निवड करताना काही घटक टाळायला हवेत. तसंच तुम्ही तेलकट त्वचेसाठी वाईप्सचा (wipes for oily skin) वापरही करू शकता. 

 चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल

त्वेचासाठी फोम बेस्ड क्लिन्झरच्या शोधार असाल तर तुम्ही नक्की वापरुन पाहा हे क्लिनझर 

Read More From Oily Skin