DIY सौंदर्य

पिंपल्स असणाऱ्यांनी नेमके कोणते skin Peeling करणे चांगले

Leenal Gawade  |  Sep 1, 2021
स्किन पीलिंग

 स्किन ट्रिटमेंटबद्दल माहिती असणे हे खूप जणांना आवडते. आपल्या त्वचेसाठी काय योग्य आहे याची माहिती जाणून घेणे खूपच गरजेचे असते. कारण त्वचेसंदर्भातील समस्या या कधीही उद्धवू शकतात. शरीरात काही बदल झाले की, लागलीच त्याचा परिणाम हा त्वचेवर होऊ लागतो. अशावेळी वेगवेळ्या ट्रिटमेंट करण्याचा सल्ला दिला जातो. त्वचेसाठी काही खास पीलिंग केले जाते. यालाच Skin Peeling केले जाते. पिंपल्स आल्यानंतर त्वचेवर आलेला खडबडीतपणा, खड्डे आणि डाग कमी करण्यासाठी हे पीलिंग तुम्हाला मदत करते. वेगवेगळ्या प्रकारचे पीलिंग आणि त्याची साधारण किंमतही जाणून घेऊया

सॅलि-ग्लायकोलिक पील

त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी आणि त्वचेला आलेला डलनेस कमी करण्यासाठी एक उत्तम पील म्हणजे सॅलि- ग्लायकोलिक पील. दोन घटकांचा वापर करुन सॅलि- ग्लायकोलिक पील केले जाते.  सगळ्यात आधी त्वचेचवर सॅलिसिलिक अॅसिड लावले जाते. हे अॅसिड लावल्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्वचेवर असलेला थर जो सूर्यकिरणांमुळे किंवा प्रदूषणामुळे खराब झालेला असतो तो थर निघून जाण्यास मदत मिळेल. तर तुमच्या पिंपल्ससाठी ग्लायकोलिक अॅसिड लावले जाते. ते लावल्यामुळे तुमचे पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते. अगदी दोन-चार दिवसातच तुमच्यामध्ये हा बदल दिसू लागतो.

किंमत- 2000-3500/-  साधारण

डर्मा पीलिंग

 त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील तर तुम्हाला खूप जण डर्मा पीलिंग करण्याचा सल्ला दिला जातो.  डर्मा पीलिंग केल्यामुळे पिंपल्स कमी करण्यास मदत होते आणि पिंपल्सचे डाग जाण्यास मदत मिळते. डर्मा पीलिंग हे त्वचेवरील रिंकल्स कमी करण्यास मदत करते. चेहऱ्यावर मोठे पोअर्स झाले असतील तर या पोअर्सचा आकार कमी करण्यासाठी देखील मदत होते. तुमच्या त्वचेवर जर खूप मोठे पिंपल्स आले असतील  किंवा तुमच्या पोअर्सचा आकार मोठा झाला असेल तर हे पील मदत करते. या पीलमुळे त्वचेखाली असलेले कोलॅजन वाढण्यासही मदत मिळते. हे पील केल्यानंतर त्वचेवरील मृत त्वचा निघू लागते. 

काय आहे हॉट टॉवेल स्क्रब, जाणून घ्या फायदे

किंमत- 2000/- साधारण

लॅक्टिक केमिकल पील

 लॅक्टिक पील हे त्वचेसाठी फायदेशीर असे पील मानले जाते. यालाच Alpha Hydroxy Peel  असे म्हणतात. दुधापासून हे केमिकल्स मिळवले जाते. दूधामध्ये असलेला हा घटक काढला जातो. त्याचा चेहऱ्यावर प्रयोग केला जातो.  हे पील केल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या या  पीलमुळे दूर होण्यास मदत करते. लॅक्टिक पील केल्यामुळे काही काळासाठी जळजळ जाणवत राहते. पण नंतर ही जळजळ कमी देखील होण्यास मदत मिळते. त्वचेसाठी हे पील केल्यामुळे खूप फायदा मिळतो. 

किंमत – 1000 रुपयांपुढे

आता स्किन पीलिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे काही पर्याय निवडा

कितीही पिंपल्स आले तरी या बजेट ट्रिटमेंट देतील नितळ त्वचा

Read More From DIY सौंदर्य