DIY फॅशन

स्टायलिश लुकसाठी ट्राय करा ‘हे’ विविध प्रकारचे ट्रेंडी स्कर्ट

Trupti Paradkar  |  Apr 23, 2019
स्टायलिश लुकसाठी ट्राय करा ‘हे’ विविध प्रकारचे ट्रेंडी स्कर्ट

स्कर्टमुळे तुम्ही अगदी स्टायलिश आणि एलिंगट दिसता. स्कर्ट हा पेहराव भारतीय आणि भारताबाहेरील सर्वच महिलांचा आवडता पेहराव आहे. शिवाय स्कर्टमुळे तुम्हाला आरामदायकदेखील वाटते. प्रत्येक स्रीच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्ट हा असायलाच हवा. कारण कोणत्याही शरीरप्रकृतीची आणि कोणत्याही वयातील महिला स्कर्टमध्ये सुंदर दिसू शकते. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या लेंथ आणि ट्रेंडचे स्कर्ट उपलब्ध असतात. सिंपल, सॉफिस्टिकेटेड, सेक्सी अशा अनेक लुकपैकी कोणताही स्कर्ट तुम्ही ट्राय करू शकता. विविध कट आणि स्टाईलच्या स्कर्टमधून तुम्ही तुमच्या आवडीचा स्कर्ट नक्कीच निवडू शकता. यासाठीच आम्ही या विविध प्रकारच्या ट्रेंडी आणि स्टायलिश स्कर्टविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देत आहोत. ज्याचा तुम्हाला फॅशनेबल आणि स्टायलिश राहण्यासाठी  फायदाच होईल.

विविध प्रकारचे स्टायलिश आणि ट्रेंडी स्कर्ट-

पेन्सिल स्कर्ट

स्कर्टमध्ये विविध प्रकारची स्टाईल करता येते. कोणतीही स्त्री स्कर्टमध्ये छानच दिसते. मात्र तुमच्या बॉडीशेप प्रमाणे स्कर्टची निवड करा. जर तुम्हाला एखाद्या बिझनेस मिटींगसाठी जायचं असेल. तर कॅज्युअल लुक आणि पेन्सिल कटचे स्कर्ट तुम्हाला नक्कीच सूट करतील. मात्र तुम्ही तुमच्या स्कर्टवर कोणते फुटवेअर घालत आहात हे महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही गडद रंगाचा स्कर्ट परिधान केला असेल तर त्यावर एखादे हलक्या रंगाचे शर्ट टक करा. मातर जर तुम्हाला इतरांपेक्षा जरा  खास दिसायचे असेल तर मात्र काळ्या रंगाच्या पेन्सिल कट स्कर्टवर काळ्या रंगाचे प्लेन ब्लाऊज ड्राय करा. उन्हाळ्यात यावर एखादे फ्लॉवर प्रिंट शर्टसुद्धा धान दिसेल.

लॉंग स्कर्ट (Long Skirt)

लॉंग स्कर्ट कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अगदी स्टायलिश लुक देऊ शकतात. लॉंग स्कर्टमध्ये स्ट्रेट, प्लेअर्ड, टी लेंथ, फुल लेंथ, बॅलेरिना लेंथ असे विविध प्रकार असतात. तुमची स्टाईल आणि प्रोफाइल यानुसार तुम्ही त्यातील एखाद्या लेंथ आणि प्रकाराची निवड करा.

लॉंग स्कर्टमध्ये तुम्ही विविध प्रकारची स्टाईल करू शकता. कारण हे स्कर्ट कोणत्याही वयाच्या आणि बॉडी शेपच्या महिलांना सुट करू शकतात. लॉंग स्कर्टसोबत तुम्ही एखादे शर्ट अथवा टॉप घालू शकता. जर तुम्हाला थोडा वेगळा लुक हवा असेल तर त्यासोबत एखादे जॅकेट कॅरी करा.

स्केटर स्कर्ट (Skater skirt)

स्केटर स्कर्टमुळे तुम्हाला एक फ्लॅटरिंग लुक मिळू शकतो. बऱ्याचदा हिंदी चित्रपटात असे स्कर्ट अभिनेत्रींनी परिधान केलेले असतात. अशा स्कर्टसोबत क्रॉप टॉप घातला तर तुम्ही अगदी हॉट आणि सेक्सी  दिसाल. मात्र जर थोडा वेगळा आणि हटके लुक हवा असेल तर त्यासोबत स्लीक कार्डिअन अथवा श्रग ट्राय करा. जर तुम्हाला ऑफिस लुक हवा असेल तर या स्कर्टसोबत एखादे हलक्या रंगाचे शर्ट आणि पेस्टर रंगाचे ब्लेझर घाला. मात्र यावर ऑफिस लुकला साजेशी ज्वेलरी आणि फुटवेअर जरूर कॅरी करा. ज्यामुळे तुमचा लुक अगदी कम्पीट होईल. जर तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असेल तर या स्कर्टसोबत एखादे ग्लॅमरस टॉप आणि लेदर जॅकेट ट्राय करा.

ए-लाईन स्कर्ट (A-line Skirt)

ए-लाईन स्कर्टची फॅशन सतत जात येत असते. सध्या या स्कर्टची फॅशन पुन्हा इन आहे. त्यामुळे तरूणाईमध्ये या फॅशनची क्रेझ पुन्हा वाढत आहे. ए- लाईन स्कर्टमध्ये डेनिमचे स्कर्टदेखील फार छान दिसतात. कॅज्युअलसाठी तुम्ही ए- लाईन डेनिम स्कर्टसोबत एखादे प्रिंटेड टॉप कॅरी करू शकता. मात्र या स्कर्टवर जर तुम्हाला टक इन करून एखादे टॉप घालायचे असेल तर पातळ कपड्याचे टॉप वापरा. शिवाय जर तुमची उंची फार असेल तर गुडघ्यापर्यंत लांबी असलेले स्कर्ट ट्राय करा. ज्यामुळे तुमची उंची अधिक वाटणार नाही.

डेनिम स्कर्ट (Denim Skirt)

जर तुमच्या ऑफिसमध्ये ड्रेस कोडचे बंधन नसेल तर तुम्ही डेनिम स्कर्टसोबत प्लेन बटन डाऊन शर्ट नक्कीच घालू शकता. एखाद्या स्किनी बेल्टने तुमचा लुक कम्पीट करा. मॅचिंग टॉप घाला ज्यामुळे तुम्ही  अधिक आकर्षक दिसाल. मात्र मेकअप हलकाच ठेवा ज्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल.

हायवेस्ट स्कर्ट (High waist skirt)

सध्या जीन्स आणि स्कर्टमध्ये हायवेस्टची फॅशन आहे. मात्र या स्कर्टसोबत हायनेक क्रॉप टॉप मस्त दिसतात. हाय हिल्स कॅरी करा ज्यामुळे तुम्ही अगदी परफेक्ट दिसाल. जर तुम्ही हाय नेक पेन्सिल मिडी स्कर्ट ट्राय करणार असाल तर त्यासोबत व्ही नेकचे लॉंग स्लीव्ज  असलेले ब्लाऊज टक इन करा. सेक्सी कॉकटेल लुकसाठी ब्लश बॉडीसूट आणि हायवेस्ट क्रीम मिडी पेन्सिल स्कर्ट घाला. मात्र त्यासोबत व्हाईट हाय हिल्स आणि पेस्टल शेडचे एखादे क्लच घ्यायला मुळीच विसरू नका.

प्लीटेड स्कर्ट (Pleated Skirt)

प्लीटेड स्कर्ट ने स्टाईल करणं अगदी सोपं आहे. मात्र बऱ्याचदा अशा स्कर्टसोबत नेमके कोणते टॉप कॅरी करावे हे अनेकींना कळत नाही. प्लीटेड स्कर्टसोबत एखादे प्लेन टी-शर्ट, स्टेटमेंट नेकलेस, हिल्स ट्राय करा ज्यामुळे तुम्हाला फॅंसी लुक मिळेल. पण जर तुम्हाला  कॅज्युअल लुक हवा असेल तर एखादे लुज टैंक टॉप त्यावर घाला, गळ्यात लांब चैन घाला फ्लॅट सॅंडलमुळे हा लुक अगदी परफेक्ट दिसेल. ऑफिस लुकसाठी यासोबत एखादे बॉडी फिट ब्लेझर आणि हिल्स घाला.

मिनी स्कर्ट (Mini Skirt)

मिनी स्कर्ट घालावा असं सर्वांनाच वाटतं मात्र त्यासोबत कोणती फॅशन करावी हेच काहीजणींना समजत नाही. एखाद्या स्कीन हगिंग मिनी स्कर्टसोबत लुज टॉप घालून तुम्ही अगदी परफेक्ट दिसाल. मिनी स्कर्ट्समध्ये डेनिमची फॅशन सध्या इन आहे. मात्र डेनिम मिनी स्कर्टसोबत न्यूट्रल कलरचे शर्ट टक इन करा. दिवसा बाहेर जाणार असाल तर शूज, स्नीकर्स आणि रात्री बाहेर जाणार असाल तर हाय हिल्स घाला.

एसिमेट्रिकल स्कर्ट (Asymmetrical skirt)

उन्हाळ्यात कॅरी करण्यासाठी एसिमेट्रिकल स्कर्ट सारखे दुसरे आरामदायक कपडे नाहीत. या स्कर्टसोबत एखादे पांढऱ्या रंगाचे बॉडी फिटेड टॉप आणि ब्लेझर घाला ज्यामुळे तुमचा ऑफिस लुक परफेक्ट होईल. तुम्ही एखाद्या पार्टी अथवा कॅज्युअर डिनरसाठी देखील हा स्कर्ट घालू शकता. मात्र त्यावर पार्टीवेअर टॉप घाला आणि ब्राइट मेकअप करा.

प्लेन ब्लॅक स्कर्ट (Plain Black Skirt)

काळ्या रंगाचा प्लेन स्कर्ट तुम्ही कोणत्याही ठिकाणी परिधान करू शकता. ऑफिसला जाण्यासाठी, मित्रांबरोबर फिरायला जाताना अथवा जोडीदारासोबत डेटवर जाताना कधीही हा  स्कर्ट तुमचा लुक हटके करू शकतो.फक्त त्यासोबत टॉप, फूटवेअर आणि अॅक्सेसरीज कोणती कॅरी करता हे फार महत्त्वाचे आहे. प्रियकरासोबत डेटवर जाताना या स्कर्टसोबत जाताना सिल्क टॉप  आणि एॅंकल शूज घाला. ऑफिसमध्ये जाताना यासोबत पेस्टल कलरचा टॉप आणि ब्लेझर घाला. मित्रांसोबत फिरायला जाताना ग्राफिक टी किंवा सफेद रंगाचा एखादा टी-शर्ट कॅरी करा.

मायक्रो मिनी स्कर्ट (Micro Mini Skirt)

मायक्रो मिनी स्कर्ट कॅरी करणं तुमच्या आत्मविश्वास आणि अॅटिट्यूडवर अवलंबून आहे. शॉपिंगला जाण्यासारख्या साध्या ठिकाणी असे कपडे वापरू नका. शिवाय मायक्रो मिनी स्कर्टसोबत शेपवेअर जरूर परिधान करा. ज्यामुळे तुम्ही सुंदर दिसाल. मायक्रो मिनी सोबत शोल्डर टॉप फारच आकर्षक वाटतात. एखाद्या पार्टीसाठी मायक्रो मिनी फारच परफेक्ट लुक देऊ शकतात.

स्कर्ट खरेदी करताना काय काळजी घ्यावी-

स्कर्ट खरेदी करताना फारच सावध राहणं गरजेचं आहे. खरेदी करण्याआधी तुम्ही हे स्कर्ट कुठे परिधान करणार हे ठरवा.  कारण ऑफिसमध्ये परिधान करण्यासाठी लागणारे स्कर्ट आणि कॅज्युअल वेअरसाठी वापरण्यात येणारे स्कर्ट निरनिराळे असतात.

ऑफिसमध्ये वापरण्यात येणारे स्कर्ट गुडघ्यापर्यंत अथवा  गुडघ्याच्या खालील लांबीचे असावेत. शिवाय ऑफिसवेअर साठी पेन्सिल, क्लासिक कटचे स्कर्ट वापरावेत. ऑफिससाठी खरेदी केलेले स्कर्ट कधीच पातळ कपड्याचे नसावेत. यासाठी ते खरेदी करताना उजेडात ते पारदर्शक दिसत नाहीत याची नीट तपासणी करून घ्या. मात्र कॅज्युअल विअर स्कर्टसाठी असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे  स्कर्ट बाहेर कुठेही जाण्यासाठी नक्तीच वापरू शकता. पार्टीवेअर स्कर्ट घेताना ते तुमच्या बॉडीशेपला सूट करत आहेत का हे जरूर बघून विकत घ्या जे तुम्ही अशा खास प्रसंगी वापरू शकता.

स्कर्टचे कापड कसे निवडावे –

बऱ्याचदा स्कर्ट खरेदी करताना कापडापेक्षा त्याच्या शेपचा अधिक विचार केला जातो. जे फारच चुकीचे आहे. कारण स्कर्टच्या कापडाचा लुकवर फार परिणाम होत असतो. बाजारात सिल्क, कॉटन, लिनन, लोकर, पॉलिस्टर, डेनिम अशा विविध कापडात स्कर्ट विकत मिळतात. स्कर्टचे कापड मऊ असेल तर ते तुमच्या हिपलाईनवर चिकटते त्यामुळे तुमच्या बॉडीशेपनुसार स्कर्टचे कापड निवडा.

FAQS-

स्कर्ट खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?

स्कर्ट खरेदी करताना तुमच्या बॉडीशेपनुसार स्कर्टचा प्रकार आणि कापड निवडा. जर तुमचे पाय जाड असतील तल मिनी स्कर्ट विकत घेऊ नका. पिअरशेप असलेल्या मुलींना पेन्सिल स्कर्ट चांगले दिसतात.

स्कर्टची लेंथ किती असावी ?

खरंतर गुडघ्यापर्यंत आणि त्या खालील लेंथचे स्कर्ट नेहमीच उत्तम असतात. मिनी स्कर्ट मात्र कमी उंचीच्या मुलींनीच ट्राय करावेत. कारण उंचमुलींनी फार मिनी आणि मायक्रो स्कर्ट वापरू नयेत.

स्कर्टसोबत स्ट्राइप अथवा प्रिंट लेगिंग वापरावेत का ?

जर तुम्हाला स्कर्टसोबत लेंगिंग कॅरी करायचे असतील तर फक्त प्लेन लेंगिंंग वापरा कारण स्ट्राइप अथवा प्रिंटेड लेगिंग फारच विचित्र दिसू शकतात.

स्कर्टसोबत पेपलम टॉप कॉम्बिनेशन कसे वाटेल ?

स्कर्टसोबत जास्त प्रिंटेड,फ्रिल आणि फ्लफी टॉप घालू नका. कारण यामुळे तुमचा लुक खराब दिसेल. शिवाय यामुळे तुमच्या स्कर्टचा लुक झाकला जाईल.

स्कर्ट परिधान केल्यावर कसे बसावे ?

स्कर्ट घातल्यावर कसे बसावे फार महत्वाचे आहे. तुम्ही नी लेंथ स्कर्ट घाला अथवा मिनी, मायक्रो लक्षात ठेवा स्कर्ट घातल्यावर गुडघे जवळ ठेवूनच बसा. शिवाय पाय एकमेंकांमध्ये अडकवून अथवा पावले एकावर एक ठेऊन तुम्ही नक्कीच बसू शकता.

अधिक वाचा-

40’ हॉट आणि सेक्सी हनीमून ड्रेस (Honeymoon Dresses In Marathi)

स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे हटके डिझाईन्सचे ’10’ श्रग

ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

 

Read More From DIY फॅशन