जर तुम्हाला रोज दुपारी जेवणानंतर थोडावेळ का होईना झोपण्याची सवय असेल तर ही पुढील माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. बरेच जणांना जेवण झालं की, लगेच डुलकी काढायची सवय असते. पण हीच सवय तुमचा घात करू शकते. जेवणानंतर किमान 10-15 मिनिटं वॉक घेऊन मगच झोपा तेही कमीतकमी 30 मिनिटं का ते जाणून घ्या.
दुपारी झोपा पण…
म्हणतात ना…कोणतीही गोष्ट ठराविक प्रमाणात केल्यास ती फायद्याची असते. तसंच काहीसं आहे दुपारच्या झोपेच्या बाबतीत. वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार आठवड्यातून फक्त 1-2 दिवसच दुपारी झोपणं हृदयासाठी चांगलं असतं. यामुळे तुमचा कार्डिओव्हॅस्क्युलर रोग जसं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून बचाव होतो. पण तुम्हाला हेही माहीत हवं की, रोजरोज दुपारी झोपण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.
स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनात 35 ते 75 वयोगटातील 3462 लोकांना सामील करण्यात आलं होतं. या संशोधनादरम्यान 5 वर्ष या सर्वांच्या झोपण्याच्या सवयी आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल यांची नोंद करण्यात आली. यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, आठवड्यातून 1-2 दिवस 5 मिनिटं ते अर्धा तास झोपणं हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरच्या धोक्याला 48% टक्क्याने कमी करते. पण त्यापेक्षा अधिक झोपणाऱ्या लोकांसाठी हीच गोड झोप हानीकारक ठरते.
जी लोकं रोज जेवल्यानंतर एक तास किंवा त्यापेक्षा जास्त झोपतात. त्यांच्यासाठी ही झोप भविष्यात हानीकारक ठरते कारण अशा लोकांचं मेटाबॉलिजम कमी होतं. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. जसं काही लोकांचं वजन झपाट्याने वाढतं आणि पोटाच्या आसपासच्या भागावर चरबी जमा होऊ लागते. तर कमजोर मेटाबॉलिजम आणि कमी पचन क्षमता असणाऱ्या लोकांमध्ये वजन कमी होणे आणि पोटासंबंधींच्या इतर तक्रारी जाणवू लागतात.
दुपारी झोप घेण्याची योग्य पद्धत
दुपारी झोप काढणं हे तुमचं रूटीन असल्यास झोपण्याआधी या गोष्टी आवर्जून करा.
- जेवल्यानंतर कमीत कमी 10-15 मिनिटं वॉक करा आणि त्यानंतर कमीत कमी 30 मिनिटानंतरच झोपा.
- शक्यतो मसालेदार जेवण केल्यानंतर झोपू नका. कारण यामुळे छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
- तसंच अगदी भरपेठ जेवूनही झोपू नये, यामुळे पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते.
- 15 मिनिटं ते अर्धा तास एवढी दुपारची झोप फ्रेशनेससाठी पुरेशी आहे.
- यापेक्षा जास्त वेळ झोपल्यास जेवण व्यवस्थित पचणार नाही आणि आजार वाढतील.
- मुख्य म्हणजे कधीही जेवल्यानंतर पोटावर झोपू नये.
P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
हेही वाचा –
शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
तुम्हाला झोपायला आवडतं?, मग जाणून घ्या झोपण्याची योग्य पद्धत
दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स