बॅग हा सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक महिलेसाठी तिची बॅगही एखाद्या मैत्रिणीसारखी असते. बॅग असेल तर खूप जणांना आधार वाटतो. अशा या बॅगमध्ये सगळेच वेगवेगळ्या वस्तू ठेवतात. काही जीवनावश्यक असतात काही या गरजेच्या नसल्या तरी कधीतरी लागतील अशा असतात. तुम्ही वापरत असलेल्या बॅगमध्ये खूप कप्पे असले की, त्या प्रत्येक कप्प्यात काय ठेवले हे कधीकधी लक्षात राहात नाही. अशावेळी बॅगमध्ये एखादे पाऊच ठेवले तर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू ठेवता येतात.बॅग चांगली दिसण्यासोबतच अशापद्धतीने पाऊच ठेवल्यामुळे वस्तू पटकन आणि सुस्थितीत मिळणे सोपे जाते.
चार्जर पाऊच
मोबाईल फोन्स, लॅपटॉप हा सध्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. फोनवर सतत सीरिज पाहणे किंवा चित्रपट पाहणे हा आपल्यापैकी अनेकांचा छंद असेल. त्यामुळे अशा लोकांकडे अगदी हमखास असायला हवे ते म्हणजे चार्जर. आता चार्जर म्हटला की, वायरीचा गुंता आला. चार्जर अशाच्या असा बॅगमध्ये टाकल्यामुळे तो तुटण्याची शक्यता असते. अशावेळी एखादे छोटे पाऊच हे केवळ तुम्ही चार्जरसाठी करा. पाऊच किंवा एखादी छोटी झीप पाऊच असलेली पिशवी तुमचा चार्जर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. चार्जर स्वच्छ राहिला तर तो अधिक काळ टिकण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही यासाठी एक खास पाऊच आणा. असे पाऊच तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवा.
मेकअप पाऊच
प्रत्येकीला कधीतरी टचअप हा करावा लागतो. तुम्हाला खूप मोठ्या मेकअप पाऊचची गरज नाही. अगदी छोटे पाऊच ज्यामध्ये तुमच एखादी लिपस्टिक, फेसवॉस, काजळ, मेकअप वाईप्स किंवा टिश्श्यू ठेवा. त्यामुळे तुम्हाला अजचणीच्या काळात पटकन फक्त मेकअप पाऊच काढून वापरता येईल. असे मेकअप पाऊच पारदर्शक असले की जास्त चांगले. त्यामुळे तुमच्या पाऊचमध्ये काय आहे ते तुम्हाला दिसायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॅगेच्या आकारानुसार असे पाऊच निवडा. इतकेच नाही तर तुम्ही बॅग बदलताना तुम्हाला एक एक वस्तू काढायची गरज नाही. तुम्ही सरळ पाऊच काढून ठेवू शकता. त्यामुळे तुमचे कप्पे स्वच्छ राहतील.
मेडिकल पाऊच
खूप जणांना अॅसिडिटी किंवा काही मेडिकल इश्श्यू असतात. अशा समस्या असतील तर खूप वेळा तुम्हाला तुमची औषध जवळ ठेवणे फारच गरजेचे आहे. डोकेदुखी, अॅसिडीटी, जुलाब, अंगदुखी,बँडेड,सॅनिटरी पॅड्स अशा काही गोळ्या आणि ऑईनमेन्ट अशा काही गोष्टी मिनिएटर स्वरुपात ठेवून द्या.म्हणजे ज्यावेळी त्या तुम्हाला लागतील त्यावेळी तुम्हाला त्याचा वापर करता येईल. मेडिकल पाऊच ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडे असायलाच हवी.
आता तुमच्या हँडबॅगमध्ये या तीन महत्वाच्या गोष्टी राहतील असे पाऊच निवडा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.